Cardamom Benefits | विविध गुणधर्मांनी युक्त वेलचीचे फायदे जाणून घेतले तर आजपासूनच खायला कराल सुरुवात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cardamom Benefits | वेलची (Cardamom) चा वापर आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारे करतो. काहीवेळा ती पदार्थांची वाढवण्यासाठी वापरली जाते. वेलचीतील गुणधर्म शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. वेलचीच्या या फायद्यांविषयी जाणून घेवूयात… (Cardamom Benefits)

 

वेलची खाण्याचे फायदे

1. अँटीमाइक्रोबियल गुण (Antimicrobial Ability) –
वेलचीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. एका अभ्यासानुसार, वेलचीच्या तेलामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन नष्ट करण्याचा गुणधर्म देखील आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत वेलचीच्या तेलाचे सेवन न करण्याच्या सूचनाही संशोधकांनी दिल्या आहेत.

 

2. मेटाबॉलिक सिंड्रोम (Metabolic Syndrome) –
काही अभ्यासानुसार, वेलची मेटाबॉलिक सिंड्रोम बरा करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम हा खरं तर हेल्थ कंडिशनचा एक समूह आहे ज्यामध्ये हृदयरोग आणि टाइप 2 डायबिटिजचा देखील समावेश आहे. या अंतर्गत लठ्ठपणा, हाय शुगर, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल या आजारांचा ग्रुप येतो. (Cardamom Benefits)

3. हृदयाचे आरोग्य (Heart Health) –
काही प्राण्यांवरील संशोधनातून असे दिसून आले आहे की हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी वेलची प्रभावी ठरते. परंतु, याबद्दल पूर्णपणे खात्री होण्यासाठी आणखी अभ्यासाची आवश्यक आहेत. उंदरांवर केलेल्या संशोधनानुसार वेलची हृदयविकाराचा झटका रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट अ‍ॅक्टिव्हिटी हेल्थ फंक्शन सुधारण्यास मदत करू शकतात.

 

4. ओरल हेल्थ (Oral Health) –
वेलचीचा माउथ फ्रेशनर म्हणून वापर केला जातो. वेलचीच्या सेवनाने तोंडात वाढणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते, ज्यामुळे तोंडात दुर्गंधी येते.

 

5. लिव्हर हेल्थ (Liver Health) –
अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही वेलची वापरली जाते. वेलचीच्या सेवनाने लिव्हरला चांगले काम करण्यास मदत होते, लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

 

Advt.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Cardamom Benefits | cardamom benefits elaichi ke fayde read in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर

Diabetes & Egg | डायबिटीजच्या रुग्णांनी अंडे खावे का? जाणून घ्या तत्ज्ञांचा सल्ला

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य