Cardamom To Control BP | ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी प्रभावी आहे वेलची, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cardamom To Control BP | उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार (Diet) महत्त्वाची भूमिका बजावतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जेवणात असे पदार्थ खावेत, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात (Blood Pressure Control) येईल. रक्तदाब हा एक असा आजार आहे ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास स्ट्रोक (Stroke), हार्ट अटॅक (Heart Attack) आणि किडनी सुद्धा निकामी (Kidney Failure) होऊ शकते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची काळजी (Cardamom To Control BP) घेणे गरजेचे आहे.

 

जास्त खारट (Salty), गोड (Sweet) आणि चरबीयुक्त पदार्थ (Fatty Food) उच्च रक्तदाब वाढवू शकतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants), पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium) आणि मॅग्नेशियम (Magnesium) यांसारख्या पोषक घटकांचा आहार घ्यावा, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीचे (Cardamom) सेवन खूप गुणकारी आहे.

 

2009 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, सुमारे 12 आठवडे सतत 3 ग्रॅम वेलची खाल्ल्याने रक्तदाब कमी (Cardamom To Control BP) होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

 

वेलचीचे गुणधर्म (Properties Of Cardamom) :
औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) समृद्ध, वेलची एक उत्कृष्ट माउथ फ्रेशनर (Mouth Freshener) आहे.

स्वयंपाकापासून अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये वेलची वापरली जाते.

वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट (Carbohydrate), डाएट्री फायबर (Dietary Fiber), कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न (Iron) आणि फॉस्फरस (Phosphorus) प्रामुख्याने असते, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीचा वापर खूप प्रभावी ठरतो. वेलचीचे सेवन (Cardamom Intake) केल्याने रक्तदाब कसा नियंत्रित राहतो.

 

वेलचीच्या सेवनाने शरीराला होणारे फायदे (Benefits To The Body From Consumption Of Cardamom) –

रक्तदाब नियंत्रित करते वेलची (Cardamom Regulates Blood Pressure)
कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने युक्त वेलचीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. आयर्न आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेली वेलची ही रक्तदाबाच्या रुग्णांसाठी सुपरफूड आहे.

हृदयाचे आरोग्य राखते वेलची (Cardamom Maintains Heart Health)
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी (Anti-oxidant Properties) युक्त असलेली वेलची हृदयाच्या आरोग्याचीही (Heart Health) काळजी घेते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे सिस्टोलिक (Systolic) आणि डायस्टोलिक (Diastolic) दोन्ही रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

 

लघवीच्या समस्येवर वेलची उपयोगी (Cardamom Is Useful For Urinary Problems)
ज्यांना लघवीची समस्या (Urinary Problem) आहे त्यांनी वेलचीचे सेवन करावे. अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध, वेलची वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर उपचार करते.

 

सर्दी-तापावर प्रभावी (Effective On Cold-Fever)
बदलत्या हवामानात सर्दी-तापाचा (Cold-Fever) त्रास होत असेल तर वेलची खा.
वेलची सेवन केल्याने इम्युनिटी (Immunity) मजबूत होते, तसेच सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळते.

 

भूक कमी लागत असेल तर वेलची खा (Eat Cardamom If You Feel Less Hungry)
वेलची खाल्ल्याने भूक वाढते. काहींना भूक कमी लागते, असे लोक वेलची खातात,
याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म (Metabolism) ठीक राहते, तसेच पचनक्रिया (Digestion) व्यवस्थित होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cardamom To Control BP | try cardamom to control high blood pressure know other benefits also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘संजय पांडेंना ‘या’ बोलीवर मुंबई पोलीस आयुक्त केलं?’ – देवेंद्र फडणवीस

 

Nitesh Rane | बाळासाहेब ठाकरेनंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

 

Devendra Fadnavis | फडणवीसांनी टाकला ठाकरे सरकारवर ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’, ‘या’ नेत्यांच्या नावाचा उल्लेख (व्हिडिओ)