Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

जम्मू : वृत्तसंस्था – Cardiac Arrest | नाचता-नाचता मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. अगोदर उत्तर प्रदेशातील बरेली येथे वाढदिवसाच्या पार्टीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनी मैनपुरीमध्ये हनुमानाच्या भूमिकेत नाचणार्‍या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आता जम्मूमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तो व्यक्ती माता पार्वतीच्या भूमिकेत नाचत होता. नाचता-नाचता तो पडला आणि उठलाच नाही. (Cardiac Arrest)

 

मंगळवारी जम्मूच्या बिश्नेह तहसीलमध्ये जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगेश गुप्ता नावाचा व्यक्ती माता पार्वतीच्या भूमिकेत नाचत होता. बराच वेळ नाचल्यानंतर तो तरुण अचानक जमिनीवर पडला आणि उठलाच नाही. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले आहे. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (Cardiac Arrest)

 

 

20 वर्षीय योगेशचा नाचता-नाचता मृत्यू
जम्मू जिल्ह्यातील बिश्नेह तालुक्यात गाव कोठे सैनिया येथे जागरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कलाकार देवी-देवतांच्या भूमिकेत नाचत होते. दरम्यान, रंगमंचावर शिवपार्वतीच्या लीला रंगल्या होत्या, ज्यामध्ये माता पर्वतीच्या भूमिकेत सतवारी, जम्मू येथील रहिवासी योगेश गुप्ता हा 20 वर्षीय कलाकार शिवस्तुतीवर नृत्य करत होता.

 

नाचताना योगेश गुप्ता पडला. थोडा वेळ कोणाला काहीच समजले नाही. त्यानंतर भगवान शंकर बनलेल्या कलाकाराने योगेशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. योगेशला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याचा मृत्यू झाला.

बर्थ डे पार्टीत 45 वर्षीय प्रभातचा मृत्यू
यापूर्वी बरेलीमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (IVRI) लॅब टेक्निशियन असलेले प्रभात प्रेमी (45 वर्षे) हा त्याचा मित्र विशाल उर्फ मनीषच्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित होता. शहरातील एका हॉटेलमध्ये या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीदरम्यान प्रभात डीजेच्या तालावर नाचू लागला.

 

यावेळी पार्टीत उपस्थित लोक त्याच्या डान्सचे व्हिडिओ बनवत त्याचा उत्साह वाढवत होते.
दरम्यान, प्रभात अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.
यानंतर प्रभातला तातडीने खुशलोक रुग्णालयात पाठवण्यात आले,
मात्र तेथे डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही त्याचा श्वास सुरू झाला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

हनुमान बनलेल्या व्यक्तीचाही नाचता-नाचता मृत्यू
या घटनेच्या काही दिवसांनी मैनपुरी येथील गणेश पंडालमध्ये नृत्य करताना कलाकार रवी शर्मा यांचा मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी शेकडो लोक तेथे उपस्थित होते.
हनुमानाची वेशभूषा परिधान केलेला कलाकार अचानक स्टेजवर पडला. लोकांना वाटले की तो अभिनय करतोय.
काही वेळ त्याची हालचाल झाली नाही, मग लोकांनी जवळ जाऊन त्याला पाहिले.

रवी शर्माला बेशुद्ध अवस्थेत तातडीने मैनपुरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या आठवडाभरात नाचताना मृत्यू होण्याची तिसरी घटना जम्मूमध्ये घडली आहे.

 

Web Title :- Cardic Arrest | jammu youth named yogesh gupta who was performing the role of maa parvati during died cardiac arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधवांविरोधात FIR

 

Wonder Drinks Mixture | रोज प्या दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक, आयुष्यासाठी वरदानपेक्षा नाही कमी

 

Pune Police | 12 वर्षानंतर परदेशातून आलेली महिला सुखरुप घरी, पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी