कार्डिओ एक्सरसाइजसाठी उत्तम पर्याय ‘स्पॉट रनिंग’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कमी वेळात शरीराला सुडौल, निरोगी करायचे असेल तर स्पॉट रनिंग चांगला पर्याय आहे. स्पॉट रनिंग करण्यासाठी एका जागी उभे राहून जॉगिंग करा. मध्येच पंजांवर जोर देऊन उडी मारा आणि टाचा जमिनीवर टेकवून ठेवा. या व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग केल्यास जलद फायदा होतो. मधुमेहावर नियंत्रण, मेटाबॉलिझम वाढतो, अस्थमात उपयोगी, रक्तदाबावर नियंत्रण राहतो, प्रतिकारशक्तीत वाढ होते, असे अनेक फायदे यामुळे होतात.

स्पॉट रनिंगमुळे धमण्या मोकळ्या आणि संकुचित होतात. यामुळे धमण्यांचाही व्यायाम होतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे कमी रक्तदाब, उच्च रक्तदाबात फायदेशीर आहे. हा व्यायाम नियमितपणे केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे आजारापासून बचाव होण्यास मदत होते. यामुळे इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया सुधारते आणि शरीरात रक्ताच्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे दुखापत होण्याची शक्यताही कमी करण्यास मदत करते. स्पॉट रनिंग हाय इंटेन्सिटी वर्कआउटच्या श्रेणीतील आहे. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो आणि कॅलरी वेगाने जळतात. या व्यायामामुळे फुप्फुसे मजबूत होतात. दररोज केल्यास श्वसनाची क्रिया सुधारते. अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नक्की करावा. हा यकृतासाठीही फायदेशीर आहे.

स्पॉट रनिंग दररोज १ तास केल्यामुळे ७०० कॅलरी जळतात. मात्र हा व्यायाम करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. या व्यायामादरम्यान जमिनीवर जोरात पाय आपटू नका. यामुळे पायांमध्ये वेदना होऊ शकतात. या व्यायामाला वेगाने करू नका. यामुळे शरीरावर अनावश्यक दबाव पडतो आणि लवकर थकवा येऊ शकतो.