मार्केटमध्ये गेल्यावर ‘डेबिट’ कार्ड घरी राहिल्याचं लक्षात आलं तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ पद्धतीनं काढा ATM मधून ‘कॅश’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा तुम्ही पैसे काढायला जाता आणि अचानक लक्षात येते की तुंम्ही तुमचे डेबिट कार्ड घरीच विसरला आहात. मग अशा वेळी काय करायचे याच उद्देशाने एसबीआय बँकेने कार्डलेस सेवा सुरु केली होती ज्यामध्ये तुम्ही काही ठराविक एटीएम मधून कार्ड शिवाय पैसे काढू शकणार होतात. आता आयसीआयसीआय या खाजगी बँकेने देखील अशाच प्रकारची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
SBI ATM साठी कार्डलेस कॅश विड्रॉल
एसबीआय अकाउंट होल्डर योनो अँपमध्ये लॉगिन करू शकतात. इंटरनेट लॉगिन आणि पासवर्डच्या मदतीने सहा अंकी mPIN सेट करावा लागेल. यानंतर योनो कॅश वर क्लिक करावे लागेल. यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जाऊन जेवढी रक्कम तुम्हाला काढायची आहे त्याबाबतची माहिती द्या. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ट्रॅन्जेक्शन क्रमांक येईल. या नंबर आणि तुमच्या कार्डच्या पिनच्या साहाय्याने तुम्ही एसबीआय एटीएम मधून कॅश काढू शकता. मात्र तुम्ही केवळ अशा एसबीआय एटीएम मधूनच पैसे काढू शकता ज्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना कार्डलेस ट्रान्झॅक्शनचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, योनोचे कॅश डिटेल द्यावे लागेल. यामध्ये हे देखील लक्षात ठेवावे लागेल की एसबीआय कार्डलेस व्यवहाराद्वारे किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढता येतात.
ICICI बँकेने देखील सुरु केली कार्डलेस सेवा
नुकतेच आयसीआयसीआय ने आपल्या ग्राहकांसाठी कार्डलेस सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक देशभरातील पंधरा हजार एटीएममधून बिना डेबिट कार्ड पैसे काढू शकणार आहेत. यासाठी युजरला आयसीआयसीआयच्या आय मोबाईल अँपमध्ये लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर सर्विस पर्यायामध्ये जाऊन कॅश विड्रॉल चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत याची माहिती द्यावी लागेल. पुढील स्टेपमध्ये आपल्याला 4 अंकी पिन तयार करावा लागेल, ज्याच्या मदतीने तुम्ही कार्डलेस पैसे काढू शकता.
तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमणकावर एक ओटीपी पाठवला जाईल. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या आयसीआयसीआय एटीएममध्ये जाऊन कार्डलेस कॅश विड्रॉलचा पर्याय निवडाल. यानंतर मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी देखील टाकावा लागेल. तसेच यामध्ये एका दिवसासाठी तुम्ही केवळ वीस हजार रुपाए इतकीच रक्कम काढू शकता.
- फेसबुक पेज लाईक करा –
- वाढत्या वयात महिलांना होतात ‘या’ 6 समस्या ; असा करा बचाव !
- ‘ब्रेन स्ट्रोक’ टाळण्यासाठी करा ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या 12 लक्षणे
- ‘बॉडी डिटॉक्स’ म्हणजे काय ? बिघडले तर ‘हे’ 5 परिणाम होतात शरीरावर
- काय आहे ‘हर्निया’ आजार ? या 8 पद्धतीने घ्या काळजी
- भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर !
- ALERT थंडीत वाढते वजन ! ‘या’ 6 उपायांनी ठेवा नियंत्रणात, ‘ही’ आहेत 5 कारणे