ATM कार्ड घरी विसरलं ‘नो-टेन्शन’, तुम्ही काढू शकता पैसे, बँकेनं सुरू केली ‘ही’ सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशात आता ATM शिवाय रोख रक्कम काढणे अधिक सोपे झाले आहे. SBI नंतर आता बँक ऑफ इंडियाने ही सुविधा सुरु केली आहे. आता बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करुन ATM मधून पैसे काढू शकतात. त्यासाठी UPI च्या माध्यमातून क्यूआर कोडचे नवे फीचर जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान लवकरच AGS Transact Technologies द्वारे मिळणार आहे. ज्यासाठी एंड टू एंड कॅश आणि डिजिटल व्यवहार यावर काम करण्यात येत आहे.

अशा प्रकारे मिळते SBI ची देखील सेवा –
1. यासाठी ATM किंवा पिनची आवश्यकता भासणार नाही. परंतू या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही 2000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. ही सेवा SBI देखील देते. एसबीआयच्या या सेवेचे नाव योनो कॅश आहे.
2.या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला SBI चे अ‍ॅप योनो हे मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागेल.
3. यानंतर नेट बँकिंग यूजर ID आणि पासवर्ड किंवा मोबाइन बँकिंग पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर टाकून लॉगिन करावे लागेल.
4. याशिवाय https://www.sbiyono.sbi/ या वेबसाइटच्या माध्यमातून रक्कम काढण्याचा प्रक्रिया सुरु करु शकतात. या सेवेत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे.
5. ट्रांजेक्शनसाठी 6 अंकी कॅश पिन, जो तुम्हाला YONO अ‍ॅपमध्ये टाकावा लागेल. 6 अंकी रेफरेंस नंबर जो तुम्हाला SMS च्या माध्यामातून मिळेल. हा नंबर तुम्हाला ATM मध्ये टाकावा लागेल.
6. कार्ड शिवाय रक्कम काढण्याची प्रक्रिया 30 मिनिटात पूर्ण होईल. जर 30 मिनिटात प्रक्रिया पूर्ण करु शकला नाहीत कर रेफरेंस कोड एक्सपायर होईल.
7. डेबिट कार्डच्या माध्यमातून SBI ATM मधून सिंगल ट्रांजेक्शनमधून किमान 500 रुपयांपासून ते 10000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात.
8. दिवसाभरात 20,000 रुपये काढू शकतात, सध्या SBI च्या 16,500 ATM मध्ये कार्डलेस सेवा सुरु करुन देण्यात आली आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –