केअर टेकरच निघाला चोरटा, चोरले दीड लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केअर टेकर असणाऱ्या दोघांनीच जेष्ठ महिलेच्या डेबिट व क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन पेटीएमद्वारे पावणे दोन लाख रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दोघांना अटक केली आहे.

संदीप हांडे आणि मिथुन जगताप अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७८ वर्षीय जेष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सुखवस्तू आहेत. त्या बाणेर परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी या दोघांना नोकरीस ठेवले आहे. दरम्यान दोघांना देखील त्यांच्या बँक खात्याबाबत माहिती होती. तसेच त्यांना लागणारे वस्तू आणून देत असल्याने फिर्यादीचा विश्वास बसला होता. मात्र या दोघांनी फिर्यादीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन पेटीएमद्वारे फिर्यादीच्या खात्यावरून १ लाख ८७ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. तपासात दोघांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पकडले. याप्रकणी अधिक तपास चतुःश्रुंगी पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com