सावधान : कोरोनामुळं चुकूनही करू नका ‘सेक्स’, पडू शकतं महागात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या सर्वांना माहित आहे की, सेक्स आज मानवी जीवनासाठी खूप महत्वपुर्ण आहे. प्रत्येकाला हा क्षण आनंदाने जगायचा असतो. पण सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सगळ्यांमध्ये एक भिती निर्माण झाली आहे. याबाबतीत तज्ञांचे म्हणणे आहे की, या व्हायरसमुळे लैंगिक संबंधात काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये सेक्स केल्याने तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शक्य तितके सेक्स करणे टाळा.

कोरोना व्हायरस मानवाच्या केसांपेक्षा 900 पट पातळ असतो. म्हणूनच, सहजपणे कोरोना व्हायरसची लागण व्यक्तीला होऊ शकते. भारतात कोरोना व्हायरसने मृत्यू झालेली संख्या वाढून 4 झाली आहे. बुधवारी कोरोना व्हायरसचे 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व लोक इटलीमार्गे भारतात परतले आहे. आरोग्य तज्ञांनी कोरोना व्हायरसचा प्रसार कसा होतो हे सांगितले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन हा व्हायरस पसरतो का ?
आरोग्य तज्ञ म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कोरोना व्हायरसची लागण होईल की नाही हे 4 गोष्टींवर अवलंबून आहे. प्रथम, आपण त्या रुग्णाच्या किती जवळ जाता. दुसरे म्हणजे, खोकताना किंवा शिंकताना त्या रुग्णाचे थेंब तुमच्या अंगावर पडले की नाही. तिसरे, आपण आपल्या तोंडावर हात ठेवत आहात का. चौथे, आपण किती निरोगी आहात किंवा आपण किती वयस्कर आहात कारण वृद्ध लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते यामुळे ते लवकर याचे बळी पडतात.

You might also like