सावधान ! ईयरफोनच्या जास्त वापराने पडाल आजारी, ‘या’ 9 प्रकारे घ्या काळजी, जाणून घ्या

ईयरफोनच्या जास्त वापरल्याने कानांमध्ये वेदना आणि ऐकण्याची समस्या होऊ शकते. अशा स्थितीत ईयरफोनचा वापर करणार्‍यांना यासंबंधिची माहिती असणे खुप आवश्यक आहे. काही बचावाचे मार्ग अवलंबून तुम्ही याच्या वाईट परिणामांपासून स्वताला वाचवू शकता. हे मार्ग कोणते आहेत ते जाणून घेवूयात…

हे लक्षात ठेवा

1 मेंदूवर वाईट परिणाम
ईयरफोनच्या अतिवापराने मेंदूवर नकारात्मक परिणाम पडतो. ईयरफोनमधून निघणारे चुंबकीय तरंग मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम करतात. यामुळे डोकेदुखी, झोप न येणे तसेच कान आणि मानदुखी यासारख्या समस्या होतात. यासाठी ईयरफोनचा आवाज खुप कमी ठेवा.

2 स्वच्छतेकडे लक्ष द्या
ईयरफोनवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. तुम्ही जेव्हा तो कानात लावता तेव्हा या बॅक्टेरियामुळे कानात संसर्ग होऊ शकतो. यासाठी ईयरफोन स्वच्छ ठेवा.

3 शेयर करू नका ईयरफोन
अनेकदा मित्रांसोबत ईयरफोन शेयर केला जातो, पण असे करू नका. कारण यामुळे संसर्ग तुमच्या कानापर्यंत पोहचू शकतो आणि नुकसान होऊ शकते.

4 कमी ऐकू येण्याची समस्या
जास्त प्रमाणात याचा वापर केल्याने कानांची ऐकण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. कानांची सामान्यपणे ऐकण्याची क्षमता 90 डेसिबल असते, सतत ऐकल्याने ती हळुहळु 40 ते 50 डेसिबलपर्यंत कमी होते. तर काही प्रकरणात बहिरेपणासुद्धा येऊ शकतो.

5 जास्त वापर टाळा
संगीत ऐकण्याची आवड असेल तर 2 तासापेक्षा जास्त वेळ कानात ईयरफोन लावू नका. काही वेळाने कानांना आराम देत राहा. अन्यथा कानांचे नुकसान होऊ शकते.

6 यावेळी वापर टाळा
रस्त्यावरून चालताना, गाडी चालवताना यांचा वापर करू नका.

7 ब्रेक घ्या
कामासाठी याचा जास्तवेळ वापर करावा लागत असेल तर एका तासादरम्यान अनेकदा 5-10 मिनिटांचा ब्रेक जरूर घ्या. यामुळे कानांना आराम मिळेल.

8 दर्जा तपासा
चांगल्या क्वालिटीच्या ईयरफोनचा वापर करा.

9 फ्रिक्वेन्सी
मल्टीपल फ्रिक्वेन्सीसचा टोन टाळा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like