आता लायसन्स शिवाय चालवा गाडी 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – वाहन चालकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक न बाळगताही वाहन चालवता येणार आहे. पंरतु  डिजिटल स्वरुपात (मोबाईलमध्ये) ही कागदपत्रे वाहन चालकाजवळ असणे अनिवार्य आहे. आता ही डिजिटल स्वरूपात कागदपत्रेही तुम्ही पोलीसांना दाखवू शकता.

तर पाहिलं तर विना परवाना गाडी चालवणे हे कायद्याने गुन्हा आहे आपण सर्वजण जाणतोच. कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे कारण वाहतुकीचा नियम मोडला किंवा इतर तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी कोणतेही वाहन बाजूला घेतले की पहिल्यांदा त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. त्यामुळे आजपर्यंत तुम्हाला गाडी चालविण्याचा परवाना आणि आरसी बुक अशी कागदपत्रे जवळ बाळगूनच वाहन चालवावे लागायचे.

वाहतूक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांनी मोटार वाहन कायदा १९८९ नुसार डिजीटल स्वरूपात कागदपत्रे दाखवता येतील असा अध्यादेश काढला असल्याची माहिती समोर आली आहे. आनंदाची बाब अशी या डिजीटल स्वरूपातील कागदपत्रांसाठी आता  ‘डिजिलॉकर’ सुविधेची सुरुवात करण्यात येत असल्याचेही समजत आहे. एका इंग्रजी वृत्तप्रत्रानेही सदर माहितीचे वृत्त दिले आहे. इतकेच नाही तर एखाद्यावेळी वाहतूक पोलिसांनी जर तुमची गाडी बाजूला घेतली आणि कागदपत्रांची मागणी केली तर आता तुम्ही मूळ प्रतीऐवजी मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा दाखवू  शकता. ही डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांच्या प्रतिमांसाठी आता वाहन चालकाला सदर डिजिलाॅकर वाहनचालकाच्या मोबाईललाही जोडले जाणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर जतन केलेली आपली सर्व प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमधून जगभरात कोठेही उपलब्ध होण्याबरोबरच आयुष्यभर सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे काेणत्याही प्रकारची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे गहाळ होणे किंवा खराब होण्याचा धोकाही यामुळे टळणार आहे. त्यामुळे ही सुविधा वाहन चालकांसाठी नक्कीच फायद ठरणार आहे.