‘विना पेट्रोल’ धावेल तुमची कार, ‘मोदी’ सरकार करतंय ‘हे’ काम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की, परिवहन मंत्रालय एक फ्लेक्सी इंजिन पर्याय (Flexi Engine option) योजनेवर काम करत आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांचा पसंतीचा इंधन पर्याय निवडता येईल. परिवहन मंत्री म्हणाले की, येत्या काही दिवसांत ग्राहक कार चालविण्यासाठी पेट्रोल किंवा इथेनॉल (Ethanol) मधून आपल्या मर्जीने काहीही निवडू शकतात.

इथेनॉल इंधनात वाढ करावी

या दरम्यान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी धान्याद्वारे इथेनॉल (Ethanol) बनवण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की उसामध्ये इथेनॉल बनवण्याची बरीच क्षमता आहे. यावर्षी सप्टेंबरमध्येच गडकरी यांनी वाहन उद्योगा (Automobile Industry) ला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पर्यायी इंधन यंत्रणा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतात फ्लेक्स-फ्युएल इंजिन (Flexi Engine) सुरू करून ऑटोमोबाईल उद्योगाला प्रोत्साहित केले जाईल.

ऑटोमेकर्स स्वतःचा इंधन पंप देखील स्थापित करू शकतील

वैकल्पिक इंधनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ऑटोमेकर्सना स्वतःचा इंधन पंप (Fuel Pump) स्थापित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, बशर्ते ते ग्रीन फ्यूल (Green Fuel) देखील ठेवतील. गडकरी म्हणाले की कार उत्पादक ब्राझील, अमेरिका आणि कॅनडाच्या बरोबरीने फ्लेक्स इंजिने सहज बनवू शकतात. गडकरी म्हणाले की, भारताला ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र बनविण्यासाठी आणि पर्यायी इंधनाला चालना देण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 7 लाख कोटी रुपयांची कपात केली जाईल.