लोकलमध्ये जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ

विरार : पोलीसनामा ऑनलाईन

विरार येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर दुपारी 4 वाजून 03 मिनिटांची विरार-दादर ही लोकल उभी होती. याच लोकलच्या डब्ब्यात एक प्लास्टिकची पिशवी असल्याची माहिती एका प्रवाशाने विरारच्या रेल्वे सुरक्षा दलाला दिली. यानंतर बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये काडतूस आढळून आले.

 [amazon_link asins=’B075ZZ79KB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01f48798-9a1a-11e8-935e-37e30f018d79′]

प्रशासनाला माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने सामानाची पिशवी कार्यालयात नेली आणि पिशवीची तपासणी केली.  पिशवीत जिवंत काडतूस सापडले, यावेळी पिशवीत बॉम्ब असल्याची अफवा उडाली. यानंतर आरपीफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, श्वान पथक यांच्यासह बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली असता, बॉम्ब नसल्याचे सांगितल्याने मोठा गोंधळ टळला. पोलिसांकडून ही पिशवी कोणी ? ठेवली कधी ठेवली ? याचा तपास सुरु आहे.