धक्‍कादायक ! पत्नी, सासरच्या मंडळीकडून होणार्‍या जाचाला कंटाळून जावायाची आत्महत्या

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून होणार्‍या जाचाला कंटाळून विवाहीत पुरूषाने आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार पुण्यातील वाकड परिसरात घडला आहे. सासूच्या नावावर असलेली शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पत्नी पतीला वेळाेवेळी शारिरीक व मानसिक त्रास देत होती तर मेहुण्याने पैसे घेवुन कर्जबाजारी केले होते. विवाहीत पुरूषाच्या आत्महत्येनंतर न्यायालयाने आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी पत्नी आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुनिल महादेव नवले (२५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सुमन महादेव नवले (५५, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिवांजली सुनिल नवले (२३), महादेवी रामदास चौरे (४५), सत्यवान रामदास चौरे (२४), शिवराज रामदास चौरे (२३) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुनिल यांची आई सुमन यांनी जमिन खरेदी केली होती. ती जमिन आपल्या नावावर करून घेण्यासाठी सुनिल यांच्या पत्नी शिवांजलीने त्यांच्याकडे तगादा लावला तसेच त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. दरम्यान, शिवांजलीचे भाऊ सत्यवान आणि शिवराज हे सुनिल यांच्याकडून वेळावेळी पैसे घेत होते. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. होणार्‍या त्रासाला कंटाळून सुनिल यांनी दि. ११ जून २०१६ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर सुमन यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.