अभिनेत्री तनुश्री दत्ता विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता विरोधात पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.४) गुन्हा नोंदवण्यात आला. मनसेच्या महिला शहर अध्यक्षा अॅड.रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तनुश्री दत्ता हिच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17bc3ac6-c8a9-11e8-9553-41a830bab2e4′]

अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत. त्याबरोबरच मनसे अध्यक्षांना ‘गुंड आणि नालायक’ असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गुंड असून नेहमी तोडफोड करीत असतात असे खोटे बिनबुडाचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व पक्षाच्या कार्यर्त्यांची बदनामी केली.

मनसेच्या महिला शहराध्य अॅड.रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुरुवारी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने अभिनेत्री तनुश्री दत्ता विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1caf038d-c8a9-11e8-879a-492c1d504e63′]

तनुश्री दत्ताचे आरोप
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्यावरही तोफ डागली. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो असा खळबळजनक आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला होता.

PUNE : शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळुन 3 ठार ; 7 गंभीर जखमी