Case filed against Chief of Samast Hindu Aghadi Milind Ekbote | समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे, पुण्येश्वर पुननिर्माण समितीचे कुणाल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | परवानगी न घेता पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) गेटसमोर आंदोलन करणाऱ्या समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे यांच्यासह चार जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case filed against Chief of Samast Hindu Aghadi Milind Ekbote). हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते पाच या दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या मुख्य बिल्डींग प्रवेशद्वाराजवळ घडला होता. (Case filed against Chief of Samast Hindu Aghadi Milind Ekbote)

समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे, पुण्येश्वर पुननिर्माण समिती कसबा पेठ कुणाल सोमेश्वर कांबळे (Kunal Someshwar Kamble), किरण चंद्रकांत शिंदे (Kiran Chandrakant Shinde), विशाल दिलीप पवार (Vishal Dilip Pawar) यांच्यासह इतरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 141, 142, 143, 153, 109, 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे (Puneshwar Temple Pune). याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ज्ञानेश विष्णु माने यांनी (रविवारी दि. 24) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News) (Case filed against Chief of Samast Hindu Aghadi Milind Ekbote)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे, कसबा पेठ पुण्येश्वर पुननिर्माण समितीचे कुणाल सोमेश्वर यांच्यासह इतर आरोपींनी 4 सप्टेंबर रोजी पुणे महापालिकेच्या मुख्य बिल्डींग प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले होते. मात्र, त्यांनी आंदोलन करण्याची परवानगी न घेतली नव्हती. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केले. आंदोलनामध्ये कार्यकर्ते जमवून चिथावणी देणारी भाषणे करुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी भाषणे केली. तसेच आदेशाचा भंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विधी अधिकारी (वर्ग-1) पोलीस आयुक्त कार्य़ालय पुणे यांनी अभिप्राय मिळवुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड