‘या’ कारणाकरिता रविना टंडनविरोधात मुझफ्फरपूर कोर्टात खटला

पाटणा : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन एका कार्यक्रमासाठी मध्ये गेली होती. तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांनी तुंबळ गर्दी केली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अभिनेत्री रविना टंडनविरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. रविनामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याचा दावा एका वकिलाने केला आहे.

रविना टंडन 12 ऑक्टोबरला मुझफ्फरपूरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आली होती. त्यावेळी जमलेल्या गर्दीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, असं याचिकाकर्त्या वकिलाने म्हटलं आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’840c95ad-d10c-11e8-b24d-3598810725ce’]

तक्रारीमध्ये रविना टंडनसह हॉटेलचे मालक असलेल्या प्रणव कुमार आणि उमेश सिंग या पितापुत्राच्या नावाचाही समावेश आहे. या कार्यक्रमामुळे आपण दीर्घ काळासाठी ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याचं वकिलाने म्हटलं आहे. कोर्टाने 2 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

90 च्या दशकात रविना टंडनची भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले होते. गोविंदासोबत तिने अनेक विनोदी चित्रपट केले आहेत. गेल्या दहा वर्षांत मात्र रविनाचे फारसे चित्रपट चमकदार कामगिरी दाखवू शकलेले नाहीत. याशिवाय रविना सामाजिक कार्यात देखील सहभाग घेते.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B077RTXJ66′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4036a96-d10c-11e8-8faf-d95176994cfb’]