मोदी सरकार 2.0 मधील केंद्रीय मंत्र्याचा मुलगा, पुतण्याकडून गोळीबार, मारहाणीत पोलिस कर्मचारी जखमी

भोपाळ : वृत्तसंस्था – मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा आणि पुतण्याने दबंगगिरी करत दोन युवकांना मारहाण केली. त्यानंतर मात्र तेथे आलेल्या पोलिसांवरही त्यांनी गोळीबार केला. त्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक तरुण दोघे जखमी झाले आहेत. हा प्रकार मध्य प्रदेशातील नरसिंहपूर च्या गोटेगाव मध्ये घडला.

काय घडलं ?

नरसिंहपुर येथील गोटेगावमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबल पटेल आणि पुतण्या मोनू या दोघांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान प्रबल पटेल याने गोळीबार केला. त्यात एक तरुण जखमी झाला. त्याच्या खांद्याला गोळी लागली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांवरही गोळीबार

घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यानी पोलिसांनाही सोडले नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला जबलपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

मंत्र्यांचा मुलगा-पुतण्यासह २१ लोकांवर गुन्हा

पोलिसांनी कारवाई करत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा प्रबल पटेल, पुतण्या मोनू पटेल यांच्यासह १३ ज्ञात आणि ८ अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

 

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

Loading...
You might also like