स्वरा भास्करला देशविरोधी आणि प्रक्षोभक वक्तव्य पडलं महागात, तक्रार दाखल

कानपुर : वृत्तसंस्था – बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. मागच्या काही दिवसांपासून तिच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. यामुळे काही लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही केले आहे. स्वराच्या कथित वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

देशविरोधी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोपाखाली कानपुर कोर्टात तिच्यावर खटला (याचिका) दाखल झाला आहे. या प्रकरणी 20 मार्चला सुनावणी होणार आहे. यामुळे स्वरासाठी येत्या काही दिवसात सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह महागात पडू शकते. कारण ती नेहमीच विविध पोस्ट सोशल मीडियावर लिहित असते.

अभिनेत्री स्वरा भास्करच्या विरूद्ध आज कानपुर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विजय बक्षी यांनी स्वरा भास्कर विरोधात दाखल केलेल्या या याचिकेत समाजात द्वेष पसरवणे, जाती धर्म आणि समुदायात विभाजन करण्यासोबतच अविश्वास निर्माण करण्याचा आरोप केला आहे. विजय बक्षी यांनी म्हटले आहे की, स्वरा भास्कर फिल्म अभिनेत्री असतानाच प्रसिद्ध व्यक्ती आहे. परंतु, वेळोवळी ती आपली वक्तव्य, भाषणे आणि ट्विटद्वारे भारत सरकार, सर्वोच्च न्यायालय, सुरक्षा यंत्रणांच्या विरूद्ध समाजात जाती, धर्म, समुदाय आणि समुहांमध्ये भेदभाव निर्माण करत आहे. यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. सोबतच अंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिकदृष्ट्याही नुकसान करण्याचा प्रयत्न तिच्याकडून केला जात आहे. कोर्टाने या याचिकेला 20 मार्च तारीख दिली आहे.

याचिका दाखल करणार्‍यांचे वकिल तुषार कुमार यांचे म्हणणे आहे की, स्वरा भास्कर यांचे वक्तव्य खुपच चुकीचे आहे. यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे.