2 ट्रान्सजेंडरांनी धोक्यानं युवकाचा ‘प्रायव्हेट’ पार्ट चक्क कापला, नशेचा दिला डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे बरेच लोक आपल्या घरी आनंदाच्या प्रसंगी नपुंसकांना बोलावणे शुभ मानतात आणि नपुंसकांची पूजा करतात. तर दुसरीकडे पंजाबमधील गुरदासपूर येथे दोन नपुंसकांनी एका तरूणाला आपल्या जाळ्यात अडकवले आणि कित्येक महिने त्याच्याकडून काम करून घेतले आणि नंतर फसवणूक करून त्याचा खासगी भाग कट केला. युवकाच्या आईला हे कळताच आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन नपुंसकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांना पकडण्यासाठी छापा टाकण्यास सुरवात केली. याबाबत माहिती देताना पीडित युवकाने सांगितले की तो गुरदासपूर येथे माताच्या जागरणात काम करून घर चालवीत असे. जागरणामध्येच त्याचा संपर्क सोनिया नावाच्या नपुंसकाशी झाला. सोनिया किन्नरने पहिल्यांदा त्याच्याशी मैत्री केली आणि नंतर सोनिया त्याला घरी देखील घेऊन जात असे.

बर्‍याच वेळा तिने त्याला तिच्याबरोबर प्रोग्राम करायला नेले, त्यानंतर सोनियाने त्याचा संपर्क गुरु परवीन किन्नर याच्याशी करून दिला आणि नंतर तो अनेक महिन्यांपर्यंत परवीनच्या घरी काम करत राहिला. अनेक महिने काम केल्यानंतर सोनिया किन्नर त्याला घरी जाऊ देत नव्हती आणि तिने त्याला मारहाण देखील करणे सुरु केले. एके दिवशी सोनिया किन्नर त्याला मादक पदार्थ देऊन अमृतसरला घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर त्याचा खासगी भाग कट करण्यात आला आणि त्याला परवीन किन्नरच्या घरी सोडण्यात आले. दोन दिवसांनी तो तेथून पळून गेला आणि घरी आला आणि त्याने संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. पोलिसांकडे तक्रार करून त्यांनी या दोघांनावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

त्याच वेळी पीडितच्या आईने सांगितले की तिने आपल्या मुलाबद्दल मोठे स्वप्न पाहिले होते की त्या त्याचे लग्न करतील आणि त्याचा वंशही पुढे जाईल, परंतु या दोन्ही किन्नरांनी त्याच्या मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य नरकमय केले आहे. या प्रकरणात एसएचओ गुरदासपूर जबरजित सिंह म्हणाले की, पीडितच्या आईची विधाने नोंदविण्यात आली आहेत ज्यात तिने सांगितले आहे की तिच्या मुलाचा परवीन किन्नर आणि सोनिया किन्नर यांनी फसवणूक करून खासगी भाग कापला आहे. या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम 326, 342, 328, 506, 120 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यासाठी छापा टाकण्यात येत आहे. सध्या दोघेही घरून फरार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like