मालेगाव : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत माजी आमदाराने घेतली सभा ; शेख यांच्यासह 2 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहेत. यामुळे राज्य शासनाने अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली असून पण येथील मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी रौनकाबाद येथे रात्रीच्या वेळी जाहीर सभा घेतली. या सभेला अनेक कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सच्या नियमाला धुडकावणी देत शासनाच्या नियमाची पायमल्ली केल्यामुळे माजी आमदार शेख यांच्याबरोबर दोन कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारवाडी पोलीस ठाण्यात सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २०१४ साली आसिफ शेख हे मालेगाव मध्य येथून कॉंग्रेसकडून निवडून आले होते. परंतु २०१९ साली त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत होते. मात्र पक्षाकडूनच हवा तसा प्रतिसाद येत नव्हता. म्हणून त्यांनी गेल्या महिन्यात कॉंग्रेस पक्षाला सोडून दिले. त्यानंतर शहरात बैठका घेत कोणत्या पक्षात जायचं यासाठी प्रयत्न करत होते. म्हणून त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत शहराच्या हितासाठी १५ अटी शर्ती मान्य झाल्या तरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पूर्वीच पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असून, आणि आणखी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने. शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तरीही माजी आमदार आसिफ शेख यांनी नियम मोडून ही जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये अनेक लोंकाच्या तोंडाला मास्क नव्हता. परवानगी दिलेली नसताना सुद्धा जाहीर सभा घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.