‘मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली’, महिलेनं केलं ६ व्या पतीला ‘ब्लॅकमेल’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या महिलेवर नागपूरमधील जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेगवेगळ्या तरुणांशी विवाह करून ही
महिला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ब्लॅकमेल करत असे. शिक्षक, डॉक्‍टर, गुंड आणि राजकीय नेत्यांचा या महिलेच्या टोळीत समावेश आहे. फसवणूक करणारी ही महिला पेशाने शिक्षक असून तिने आतापर्यंत पाच तरुणांची फसवणूक केली आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शिक्षक महिला मोमीनपुरा येथील इस्लामिया हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकवत आहे. यापूर्वी तिची पाच लग्ने झाले असून यावेळी ती सहाव्या लग्नाद्वारे तरुणाला फसवण्याच्या तयारीत होती. यापूर्वी देखील तिच्या नावावर मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरवेळी नवीन ओळख सांगून ती या तरुणांची फसवणूक करत असे. यापूर्वी २०१० साली तिचे भिवंडीमधील इमरान अंसारीसोबत लग्न झाले होते. तिचे नवऱ्याशी न पटल्याने तिने घटस्फोट घेतला. २०१३ मध्ये दुसऱ्या तरुणाशी विवाह केला. नंतर तिने त्याला देखील सोडले.

ऑनलाईन साईटवर एका तरुणाशी ओळख झाल्यानंतर तिने त्याच्याशी विवाह केला. मुद्दस्सर मोमीन असे त्या तरुणाचे नाव होते. या तरुणाने आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर या महिलेचे बिंग फुटले. प्रत्येकवेळी तिने तरुणांची फसवणूक करताना हा आपला दुसरा विवाह असल्याचे सांगत असे. त्याचबरोबर तिने सर्वच तरुणांना गंडा घालत मोठ्या प्रमाणात पैशांची लूट देखील केली आहे. तसेच शाळेतून पगारी रजा मिळावी म्हणून तिने आपला गर्भपात झाला असताना देखील तो लपवून ठेवत गर्भपात झाला नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे तिने त्यासंबंधी खोटे प्रमाणपत्र तयार करून शासनाची देखील फसवणूक केली. कामठी येथी डॉक्टरांकडून तिने हे खोटे प्रमाणपत्र बनवून घेतले.

नेते आणि गुंडाचा टोळीत सहभाग

वेगवेगळ्या नावांनी तरुणांची फसवणूक करणाऱ्या या महिलेच्या टोळीत राजकीय नेते, तोतया पोलिस, शिक्षक आणि गुंड असून हे तिने लग्न केलेल्या तरुणाला धमकी देत. त्याचप्रमाणे त्याने ऐकले नाही तर मारून टाकण्याची देखील धमकी देत असत. त्यामुळे त्यांच्या जीवावरच ती हे सगळे गुन्हे करत असे. त्याचबरोबर या टोळीतील तोतया पोलिसांनी तिने फसवणूक केलेला तिसरा तरुण मुद्दस्सर याला धमकी देत त्याच्याकडून ७५ हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने पैसे न दिल्याने या टोळीतील तिघांनी त्याला मारहाण केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने  घालवा राग आणि तणाव