ऊसतोड मुकादमांची बैठक भोवली, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह 70 जणांविरुद्ध FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन – जमावबंदी आदेश लागू असतानाही ऊसतोड मुकादमांची बैठक घेऊन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह 70 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी यांनी शिरूर येथे मुकादमांची बैठक घेऊन साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असे स्पष्ट केले होते.

बैठकीमध्ये आमदार धस यांनी मागणी मान्य झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. मात्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही बैठक घेतली म्हणून धस यांच्यासह त्यांचे चिरंजीव जयदत्त धस, गणेश भांडेकर, अरुण भालेराव, प्रकाश बडे, शिवाजी पवार, बाबुराव केदार, दशरथ वनवे, प्रकाश देसारडा, रामदास हंगे, सुरेश उगलमुगले, कल्याण तांबे, अजय कुचेरीया, रामदास बडे, अन्वर शेख, ज्ञानेश्वर उटे यांच्यासह 70 जणांविरुध्द शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही जिल्ह्याची सीमा ओलांडून ऊसतोड कामगारांना मदत केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.