व्यावसायिकाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न प्रकरण; मयत दिप्ती काळेचा साथीदार निलेश शेलारला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  व्यावसायिकाची (businessman) जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक (arrest) करण्यात आली आहे. नीलेश उमेश शेलार (Nilesh Umesh Shelar) (वय ४०, रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरूड) असे अटक (arrest) आरोपीचे नाव आहे.

Case of attempt to grab the land of a businessman; Mayat Dipti Kale’s accomplice Nilesh Shelar arrested

या प्रकरणी मयत दीप्ती काळे (Dipti Kale) तसेच नितीन मनोहर हमने ( Nitin Manohar hamne ) (वय ३१, कात्रज) याच्यासह आणखी दोघांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा दाखल आहे. मंगळवार पेठेत राहणा-‍या एका महिलेने या बाबत फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambag Police Station) दाखल गुन्ह्यांत पोलिसांनी शेलार (Nilesh Umesh Shelar) याला अटक (arrest) केली होती. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेत पोलिसांनी गुरुवारी (ता.१७) न्यायालयात हजर केले. आरोपीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यासाठी, गुन्ह्यांत वापरलेले पिस्तूल आरोपीने कोणाकडून आणले याचा तपास करण्यासाठी तसेच पिस्तूल जप्त करण्यासाठी त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर (Public Prosecutor Surekha Kshirsagar) यांनी केली. शेलार याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

काळे (Dipti Kale) हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. तसेच काळे हिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी 35 लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता.खेड) येथील तीन कोटी रुपयांची 42 गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली 58 गुंठे जमीन नावावर करून दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. आरोपी नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून 58 गुंठे जमीन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या फिर्यादीच्या पतीस जीवे मारू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Wab Title :-Case of attempt to grab the land of a businessman; Mayat Dipti Kale’s accomplice Nilesh Shelar arrested

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज