काय सांगता ! होय, राजाच्या ‘बनावट’ मृत्युपत्रानुसार बनवलं ‘ट्रस्ट’, 25 हजार कोटींची आहे ‘संपत्ती’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबच्या फरीदकोट पोलिसांनी राजघराण्याच्या सुमारे 25000 कोटी रुपयांच्या मालमत्तेबद्दल महाराजा हरिंदर सिंह बरार यांनी बनावट मृत्युपत्र तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी मालमत्तेची देखभाल करत असलेले महारावल खेवा जी चे विद्यमान अध्यक्ष जयचंद मेहताब, उपाध्यक्ष निशा खेर, मुख्य कार्यकारी अधिकारी जंगिर सिंह सरन, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विद्यमान अध्यक्ष नगर सुधार ट्रस्ट ललित मोहन गुप्ता, कायदेशीर व प्राप्तिकर सल्लागार, ट्रस्टशी संबंधित व्यवस्थापक आणि कर्मचार्‍यांसह एकूण 23 जणांच्या विरोधात फसवणूक, बनावट, गुन्हेगारीचा कट रचणे अशा विविध कलमांखाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा महाराजा हरिंदर सिंह बरार यांची मुलगी आणि चंदीगड येथील रहिवासी राजकुमारी अमृत कौर यांच्या तक्रारीच्या आधारावर प्राथमिक तपास करून कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर दाखल करण्यात आला आहे. महाराजाच्या मृत्युपत्राच्या आधारे कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची देखभाल महारावल खेवा जी ट्रस्ट करीत आहे आणि यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षाची जबाबदारी महाराजाची दुसरी मुलगी स्वर्गीय राजकन्या दीपिंदर कौर मेहताब यांचा मुलगा जयचंद मेहताब आणि उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांची मुलगी निशा खेर सांभाळत आहे.

या मृत्युपत्रात महाराजाने बेदखल केलेल्या राजकन्या अमृत कौरने या मृत्युपत्रास न्यायालयात आव्हान दिले होते आणि काही दिवसांपूर्वी 1 जून 2020 रोजी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने महाराजाच्या मृत्युपत्रास रद्द केले होते आणि त्यांच्या संपत्तीचा हक्क त्यांच्या मुलींना देण्यासंबंधी खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या निर्णयानंतर राजकुमारी अमृत कौर यांनी त्यांच्या वडिलांचे बनावट मृत्युपत्र तयार केल्याप्रकरणी जिल्हा पोलिसात तक्रार दाखल केली, त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.