‘लव जिहाद’साठी धर्म बदलला, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील अजमेरमध्ये लव जिहादचे पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. येथील केकडी भागामध्ये हे प्रकरण समोर आले असून पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरवाड येथे राहणारी अल्पवयीन पीडितेने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन शेजारील गावात राहणाऱ्या सद्दाम नावाच्या युवकावर या प्रकरणात आरोप केले आहेत. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर फोटो दाखवून तो वारंवार बलात्कार करत राहिला.

उत्तरप्रदेशमध्ये केले धर्मपरिवर्तन

पीडितेने आरोप केला आहे कि,आरोपीने उत्तरप्रदेशला नेऊन बळजबरी मला धर्मपरिवर्तन केले आणि माझ्याशी लग्न केले. लग्नानंतर पीडित गर्भवती राहिली असता त्याने तिचा गर्भपात देखील केला.
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी सद्दाम याच्या विरोधात धर्म परिवर्तनाच्या गुन्ह्यामध्ये पोक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेची वैद्यकीय तपासणी
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com