शिवसेनेचे खा. रवी गायकवाड यांच्याकडून ‘या’ सेनेच्याच उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या उस्मानाबादमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबद्दलची एक क्लीप व्हायरल झाली. त्यात ओमराजे यांनी अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करत चारित्र्य हनन केल्याचा आरोप करत रवींद्र गायकवाड यांनी तक्रार दिली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात रवींद्र गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६, ६७ आणि भादंवि ५००, ५०१, ५०२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचं लोकसभा निवडणूकीत तिकीट कापण्यात आलं आहे. दरम्यान यामुळे ते नाराजही होते. परंतु ओमराजे निंबाळकर यांनी एक आक्षेपार्ह क्लीप तयार करून ती व्हाटस अपवर व्हायरल केल्याचा आरोप रवींद्र गायकवाड यांनी केला आहे. यामुळे आपली बदनामी झाली असून राजकिय प्रतिमाही मलीन करण्यात आली आहे. असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loading...
You might also like