Pune : Goldman सनी वाघचौरेवर पत्नीला मारहाण करून गर्भपात केल्याचा आरोप ! FIR दाखल

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन (Goldman) म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरे (Sunny Waghchaure)याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसंच गर्भपात केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल्डमन सनीच नव्हे तर त्याच्यासह कुटुंबातील इतर 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी नाना वाघचौरे (31), आशा नाना वाघचौरे (56), नाना वाघचौरे (60), नीता गायकवाड (36) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरेसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करत गर्भपाताची औषधं देऊन गर्भपात केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत असाही उल्लेख आहे की, फिर्यादीच्या आईवडिलांकडे गृहपयोगी वस्तूंची मागणी वाघचौरेनं केली होती. बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवून फिर्यादीस माराहण आणि शिवीगाळ करून धमकी दिली आणि गर्भपाताचं औषध देऊन गर्भपात केला असंही पीडित पत्नीनं म्हटलं आहे. तक्रारीत तिनं पती सनी, सासू, सासरे आणि नणंद यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचं म्हटलं आहे. पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सनी वाघचौरे कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) मित्र आहे. हे सर्वांनाच माहित आहे. हिंदी सिनेसृष्टीतील देखील अनेक दिग्गज कलाकरांसोबत ग्लोडमॅन सनीची ओळख आहे. तो अनेकदा कलाकारंसोबतचे फोटो सोशलवर पोस्ट करताना दिसत असतो.

You might also like