वादग्रस्त विधान भोवले ! आझम खान यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझम खान यांनी एका कार्यक्रमात रामपूरच्या जिल्हा प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता.

काय म्हणाले होते आझम खान

“मुस्लिमांची मते मिळू नयेत म्हणून त्यांना मतदान करण्यास जाऊ नये यासाठी धमकावले जाते” असा आरोप केला होता. एका कार्यक्रमात रामपूरच्या जिल्हा प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. आझम खान यांचे वक्तव्य आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानून जिल्हा प्रशासनाने आझम खान आणि इतर दोन जणांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आझम खान यांच्या विरोधात नूकताच जयाप्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अली-बजरंगबली वादाप्रकरणी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या अगोदर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मायावती यांच्या विरोधात देखील आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत. एवढेच नाही तर जया प्रदा यांच्याबाबत पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून त्याला देखील ‘तुझ्या बापाच्या मैताला आलो आहे‘ असे बेताल वक्तव्य केले होते.