×
Homeक्राईम स्टोरीदुचाकीला कट मारल्याचे विचारले म्हणून मारहाण

दुचाकीला कट मारल्याचे विचारले म्हणून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीला का कट मारला असे विचारले म्हणून तिघांनी एकाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेपाचच्या सुमारास रुपीनगर येथे घडली. अक्षय सुनील साखरे (22, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश लष्करे, सुनील चव्हाण, आदेश माने (सर रा. ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास अक्षय हा दुचाकीवरून रुपीनगर येथून जात होता. त्यावेळी आरोपींनी अक्षय याच्या दुचाकीला कट मारला. काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी अक्षय याला बोलावून घेतले. त्यावेळी ‘शिवी कोणी दिली’ असे अक्षय ने विचारला असता ‘तुला लय मस्ती आली आहे का’ असे म्हणत त्याला मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गट्टू डोक्यात मारून अक्षय याला मारहाण केली. यामध्ये अक्षय जखमी झाला आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com

Must Read
Related News