केस मधून वाचवतो म्हणत रक्‍कम मागत एकाला मारहाण, शिरुर पोलिस स्टेशन मध्ये तिघांविरूध्द FIR दाखल

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे एकास बलात्काराच्या केस मधून वाचवतो असे म्हणत पैसे मागितले आणि पैसे न दिल्याने तिघांनी जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या व्यक्तीने शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये आरोपी रवींद्र चालशा भोसले, कोल्ह्या चालशा भोसले (दोघे रा. गणेगाव दुमाला), संभाजी पवार, (रा. तांदळी ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतीत मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी हा तांदळी म्हसोबाफाटा चौकातून मोटरसायकलवरून घराकडे जात होता. तिघेही आरोपी पाठीमागून मोटारसायकलवर आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मोटारसायकलला त्यांची मोटारसायकल आडवी लावली. आणि बलात्काराच्या केसमधून तुला सुटायचे असेल तर दोन लाख रुपये दे आम्ही तुला मदत करतो. त्यावेळी फिर्यादी याने माझ्याकडे 2 लाख रुपये नाहीत, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी याला हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या बाबतीत शिरुर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पुढिल तपास पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहेत.