अयोध्या : बाबरी मशीदीचे पक्षकार इकबाल अन्सारीवर दाखल होणार देशद्रोहाचा खटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद प्रकरणातील पक्षकार इकबाल अंसारी समवेत पाच जणांवर मंगळवारी देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू वार्तिका सिंह हिची याचिका दाखल करून घेत जिल्हा दंडाधिकारी देवेंद्र प्रताप सिंह यांनी हे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या अधिव्यक्त्या  संगीता सिंह आणि लखनऊ बेंचचे अधिवक्ता राजेश त्रिपाठी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रायचंदपूर येथे राहणारी नेमबाजपटू वार्तिका सिंह हि 3 सप्टेंबर रोजी आपला मामे भाऊ  प्रभु दयाल सिंह यांच्या बरोबर रामजन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी राममंदिर निर्माणाविषयी  काही लोकांशी चर्चा देखील झाली होती. त्यानंतर काही लोक त्यांना इकबाल अन्सारी यांच्या घरी घेऊन गेले.

यावेळी त्यांच्या घरी तीन महिला, एक मुलगा आणि एक सुरक्षारक्षक उपस्थित होता. त्यावेळी वार्तिका यांनी इकबाल अन्सारी यांना म्हटले कि, आपण मंदिर मस्जिदीसाठी का लढत आहोत. त्यावेळी अन्सारी यांनी म्हटले कि, पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेत राहण्यासाठी या गोष्टीचे राजकारण करत आहेत. ते लोकांना भरकटवण्याचे काम करत आहेत. त्यांच्यात इथे राम मंदिर बाधंण्याची हिंमत  नाही. हे लोक मुसलमानांना प्रचंड घाबरतात. देशाच्या कायद्याविषयी देखील इकबाल अन्सारी यांनी अपशब्द वापरले. त्याचबरोबर राम मंदिराच्या प्रकरणावर कोणतेही न्यायालय निकाल देऊ शकत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

न्यायालयाने जर या खटल्याचा निकाल दिला तर पाकिस्तानमधून माणसे आणून देशातील एकेक व्यक्तीवर गोळ्या झाडेल आणि अयोध्येला दुसरा पाकिस्तान बनवेल असे देखील त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देखील त्यांनी अपशब्द वापरले. त्याचबरोबर वार्तिका यांना देखील मारण्याची धमकी दिली. भगवान रामाविषयी देखील त्यांनी अपशब्द वापरले. त्याचबरोबर तेथील महिलांनी आणि नागरिकांनी देखील वार्तिका यांच्याशी गैरवर्तन केले.

दरम्यान, याप्रकरणी वार्तिका यांनी 6 सप्टेंबर रोजी याची तक्रार आयोध्याचे पोलीस अधीक्षक,पोलीस महाअधिक्षक, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती. मात्र काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी अखेर आपल्या महाधिवक्ताच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने सुनावणीनंतर अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

visit : Policenama.com