मुंबईकरांनी उडवल्या लॉकडाऊनच्या चिंधड्या, सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरस महामारीने वेग पकडला आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 45000 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आतापर्यंत सापडले आहेत. यामुळे लोकांना सतत सावधगिरी बाळगण्याचे आहवान केले जात आहे. परंतु, लोकांना ना कोरोनाची भिती आहे, ना सरकारच्या आवाहनाचा परिणाम.

मुंबईत कोरोनाची प्रकरणे इजिप्त आणि बेल्जियमच्या बरोबरीने आहेत. परंतु, लोक याबाबत बेफिकीर आणि बेपर्वा आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर हजारो लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर हजारोच्या संख्येने लोक सकाळी फिरताना दिसून येत आहेत.

हे लोक सरकारच्या निर्देशांचे पालन करताना दिसत नाहीत आणि त्यांना कोरोनाची भिती असल्याचेही दिसत नाही. मरीन ड्राइव्हवर मॉर्निंग वॉक करताना या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या अक्षरक्ष: चिंधड्या उडवल्या. मरीन ड्राइव्हवर लोकांची गर्दी पाहून सोशल मीडियावर लोकांनी राग व्यक्त केला आणि क्लास घेण्यास सुरूवात केली.