‘कॅशलेस’च्या दुनियेत मंदिरात नोटांचा ‘पाऊस’, महिलेनं दान केली सव्वा कोटीची ‘कॅश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्तोडगड जिल्ह्यात मंडफिया भागातील सांवलिया सेठ यांच्या दरबारात एका महिलेद्वारे कुबेरच्या रुपात येऊन पैशांचा पाऊस पाडणारे दृश्य लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. यात जवळपास सव्वा कोटी रोख रक्कम असल्याची शक्यता आहे. कॅशलेस इंडियाच्या जमान्यात कोट्यावधी रुपयांचे रोख दान ही गंभीर बाब समजली जात आहे.

महिलेने कोट्यावधी रुपये टाकले दान पेटीत
जलझूलनीच्या यात्रेत आज शेवटच्या दिवशी सांवलिया सेठ यांची देवता बाहेर विराजित करण्याची तयारी सुरु होती, या दरम्यान एका भविक महिला एक बॅग घेऊन मंदिरात पोहचली आणि सांवलिया सेठ यांचे दर्शन घेऊन बॅगेतील रोख रक्कमेची पाकिटं एक एक करुन दानपेटीत टाकले. महिला दानपेटी एवढे पैसे टाकत असल्याचे पाहून सर्वच आश्चर्य चकित झाले. जवळपास 50 पेक्षा जास्त पाकिटं त्या महिलेने दानपेटीत टाकली.

ही महिला कोण होती याची ओळख पटू शकली नाही.  ही महिला इंदोरमधील असू शकते असे मानले जात आहे. या महिलेने सव्वा कोटी रुपयांचे रोख रक्कम दान केली. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भगवान श्री सांवलिया सेठ यांच्या संबंध मीराबाईशी जोडला जातो. दंत कथेनुसार, सांवलिया सेठ मीरा बाईचे गिरिधर गोपाल आहे, ज्यांची येथे पूजा केली जाते. व्यवसायात प्रगती होण्यासाठी लोक त्यांची पूजाअर्चा करतात.

 

Loading...
You might also like