Cash Management | सॅलरी घेणार्‍यांसाठी ‘कॅश मॅनेज’ करणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या सर्वात प्रभावी ‘या’ 10 पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cash Management | पैशांना तुमचे जीवन चालवायला देऊ नका, पैशांना (Cash Management) आपले जीवन चांगल्या पद्धतीने चालवण्यात मदत करा. Financial आणि marketing expert John Rampton चे हे म्हणणे जवळपास सर्व सॅलरीड व्यक्तींवर लागू होते.

एक पगारदार व्यक्ती (salaried person) आपल्या महिन्याच्या खर्चासाठी सॅलरीवर अवलंबून असतो. आपण दर महिन्याला मिळणार्‍या पगाराच्या आधारावर आपल्या जीवनाचे बजेट तयार करतो. मात्र, असे असू नये. जर तुम्ही योग्यप्रकारे cash inflows and outflows ची योजना बनवली तर समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

यासाठी रोकड व्यवस्थापन (cash management) शिकावे लागेल. ही एक अशी कला आहे ज्यामध्ये एकदा निपुणता मिळवली की ती तुम्हाला दूर घेऊन जाईल. रोकड व्यवस्थापनाचे सोनेरी नियम जाणून घेवूयात…

1) Budgeting –
कॅश फ्लो मॅनेज करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल बजेट बनवणे आहे, म्हणजे कॅश फ्लो प्लान. वर्तमान स्थितीचा विचार करा. नंतर सर्व खर्चाची वेगवेगळ्या गोष्टीत विभागणी करा. जसे – मनोरंजन, शिक्षण आणि इतर खर्च. यात खर्चाची प्राथमिकता ठरवण्यात मदत होईल. एक बजेट नेहमी रोड मॅपप्रमाणे काम करते. निरोगी रोकड व्यवस्थापनासाठी हे महत्वाचे आहे.

2) Check the flow of your money –
क्रेडिट विरूद्ध डेबिट. हे या गोष्टीचे प्रमाण आहे की तुमच्याकडे काय आहे, विरूद्ध काय देणे बाकी आहे. ही पद्धत आपेल उत्पन्न आणि खर्चामध्ये एक संबंध विकसित करण्यास मदत करेल. यातून तुम्हाला असेट निर्माण करणे आणि उधारी कमी करण्यात मदत मिळेल.

3) Set Ambitious but realistic goals –
पल्या कॅश फ्लोची योजना बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ती आहे लक्ष्य ठरवणे. टार्गेट सेट करण्याची सर्वात चांगली पद्धत ही आहे की तुम्हाला जिथे पोहचायचे आहे ते लिहून ठेवा. नेहमी असे लक्ष्य ठरवा जे सतत चांगल्या कामगिरीची मागणी करेल. आपल्या प्रगतीची वेळोवेळी तपासणी करा. लक्ष्य ठरवण्यापूर्वी खालील कारकांचा विचार करा.

वय (Age)

आरोग्य (Health)

उत्पन्न – (Income)

अल्पकालिन जबाबदारी – (Short term obligations)

दीर्घकालिक जबाबदारी – (Long term obligations)

इतर आर्थिक बांधिलकी – (Any other financial commitments)

जेव्हा तुम्ही ठराविक लक्ष्य प्राप्त करण्यासाठी बांधले जाता तेव्हा पैशांच्या सवयी बदलण्याची प्रेरणा मिळते.

4) Manage your surplus –
चांगल्या कॅश फ्लो मॅनेजमेंटचा अर्थ आहे की, तुमची पुढील सॅलरी क्रेडिट होण्याच्या पूर्वी तुमच्याकडे सरप्लस पैसे शिल्लक राहिलेले असणे. रोकड प्रवाह व्यवस्थापनासह शिल्लक पैसे कुठे गुंतवायचे हे देखील ठरवले पाहिजे. आपल्या पैशाचा वापर करा, हे विसरू नका अतिरिक्त उत्पन्न हे केकवरील एका चेरीसारखे आहे जे सर्वांना आवडते.

5) Structure your monthly expenses around the payday –
वेतन मिळाल्यानंतर दुसर्‍या दिवशी फिक्स खर्चाची यादी तयार करा. जसे भाडे, नोकराचा पगार, मासिक किराणा सामान. हे तुम्हाला त्या पैशांची योजना बनवण्यात मदत करेल जे वाचवता येऊ शकतात किंवा गुंतवले जाऊ शकतात किंवा मनोरंजनावर खर्च केले जाऊ शकतात.

6) Track your expenses –
खर्चावर नजर ठेवा. कधी-कधी छोटी खरेदी अचानक वाढते आणि ही मोठी रक्कम होते. अशी देखील शक्यता असते की एखादी अज्ञात आपत्ती येईल जी तुमच्या खर्चाचा मोठा भाग गिळंकृत करेल.

जर तुम्ही वेळेवर खर्च ट्रॅक आणि नोट केले नाही तर नेहमी आपल्या बजेटपेक्षा जास्त खर्च करता. नेहमी खर्चाचे वर्गीकरण करा आणि विश्लेषण करा की, खर्च नियंत्रित करणे कुठे अवघड आहे. फोनमध्ये कोणतेही अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करून खर्च ट्रॅक करू शकता.

7) Commitment to new expenses –
कोणताही नवीन आणि अनावश्यक करू नये. जरी वेतन यासाठी पात्र ठरवत असेल.
काही लोक वास्तविक आवश्यकतेशिवाय अनावश्यक कर्ज घेताना दिसतात.
तुम्ही तुमच्या वेतनामुळे कर्ज योग्य ठरवता. एक आर्थिक संस्था केवळ वेतन आणि क्रेडिट रिपोर्ट लक्षात ठेवते.
तुम्ही याचे पेमेंट करू शकता किंवा नाही, हे तुमच्या बजेटच्या आधारावर ठरते.
यासाठी जोपर्यंत आवश्यक नसेल कोणत्याही मासिक खर्चासाठी साइन अप करू नका.

8) Limit the credit card use –
जेव्हा आपल्याकडे पैसे संपतात तेव्हा आपण सहजपणे क्रेडिट कार्डवर स्विच करतो.
हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्यक्षात क्रेडिट कार्ड आणि त्याच्या सेवेशी संबंधीत व्याज भरण्याची आवश्यकता आहे का?
त्या गोष्टी खरेदी करण्याच्या आवश्यकतेचे मुल्यांकन करा ज्या पुढील पगाराची वाट पाहू शकतील.
खुप गरज पडली तरच क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे. यामध्ये अनावश्यक खर्च टाळला पाहिजे.

9) It’s a process –
जसे रोम एका दिवसात तयार झाले नव्हते,
तसेच कॅश मॅनेजमेंट सारख्या गोष्टी शिकणे आणि अशाप्रकारच्या सवयी विकसित करण्यास वेळ लागतो.
कॅश मॅनेजमेंट शिकणे एक प्रक्रिया (process) आहे आणि ती हळुहळु ट्रॅकवर येईल.
हेल्दी आर्थिक सवयींचा विकास करा.
या सवयी रोकड प्रवाह चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात मदत करतील.

10) Make the most out of your money –
आपल्या पैशांचा बुद्धीने वापर करण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही सूट, कूपन, विक्री आणि ऑफर सारखे पर्याय शोधू शकता ज्यांचा उपयोग खरेदी करताना केला पाहिजे.
तुमच्या पैशावर कमाल रिटर्न आदर्श वाक्य असावे.

Web Titel :- Cash Management | cash management it is very important for the salary people to manage cash know the most effective ways

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 140 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 197 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | चिंचवडगावतील सुप्रसिद्ध नाना हस्ताक्षर वर्गाचे संचालक विजयकुमार मेंडजोगी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन