‘कॅश फॉर व्होट’ हे काम काँग्रेसचं’ : पेमा खांडूंचा पलटवार

नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील एका कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. असा दावा करत तसा व्हिडीओ देखील काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला होता. हा सर्व प्रकार म्हणजे कॅश फॉर व्होट घोटाळा आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला होता. यानंतर आता या भाजापाचे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. “हे सर्व चुकीचे आहे. ‘कॅश फॉर व्होट’ हे काम काँग्रेसच आहे’ असे म्हणत पेमा खांडू यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पेमा खांडून म्हणाले की, “”हे सर्व चुकीचे आहे. ‘कॅश फॉर व्होट’ हे काम काँग्रेसच आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की, भाजपा उमेदवाराच्या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सर्व काही समोर येईल.” असे पेमा खांडू यांनी म्हटले आहे.

आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त केल्याचे व्हिडीओ प्रसिद्ध केले. भाजाप पैसे देऊन मत विकत घेत आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता. यावेळी बोलताना रणदीपसिंह सुरजेवाला यांनी हा सर्व प्रकार म्हणजे कॅश फॉर व्होट घोटाळा आहे असा आरोप केला होता. शिवाय हा काळा पैसा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा होती. या सभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठीच ही 1.80 कोटींची रक्कम वापरण्यात येणार होती असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. यावेळी सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधत टीकाही केली होती. चौकीदाराची चोरी आता पकडण्यात आली आहे असा घणाघात सुरजेवाला यांनी केला होता.