सावधान ! बँक खात्यात वर्षभरात ‘लिमीट’पेक्षा अधिक रक्‍कम काढल्यास भरावा लागणार ‘टॅक्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही बँकेतून सतत कॅश काढत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने अर्थसंकल्पात एक नवीन नियम आणला आहे. एका रकमेनंतर अधिक कॅश बँकेतून काढले तर त्यावर बँक २ टक्के टीडीएस कापून घेणार आहे. हा नियम कोणत्या ठराविक खात्यासाठी नसून यात सर्व प्रकारच्या खात्यांचा समावेश असणार आहे. या नवीन नियमानुसार आपण बँकेतून वर्षभरात १ करोडपेक्षा अधिक पैसे काढले तर त्यावर २ टक्के टीडीएस बँकेला द्यावा लगणार आहे.

Cash withdrawal limit How much SBI HDFC PNB ICICI Bank customers withdraw

हा नियम करण्यामागे सरकारने आपला हेतूही स्पष्ट केला आहे. रोजच्या व्यवहारातील आणि काळ्या धंद्यांना आळा बसावा, कॅश व्यवहार कमी करने, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे वर्षभरात १ करोडपेक्षा कॅश बँकेतून काढले तर त्यावर २ टक्के टीडीएस द्यावा लागेल. मात्र या नियमाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. तर सरकारने अर्थसंकल्पात विचार करून या नियमात सर्व बँक खात्यांचा समावेश करून अनेक खाते धारकांवरही एकत्रित हा नियम लागू केला आहे.

Cash withdrawal limit How much SBI HDFC PNB ICICI Bank customers withdraw

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर संसदेत स्पष्टीकरण दिले आहे. काही कंपन्या मोठ्या प्रमाणात कॅशने व्यवहार करतात. त्यांच्या या प्रवृत्तीला रोखण्यासाठी मोठ्या सरकाने एका सीमित रकमेपेक्षा अधिक कॅश काढल्यास त्यावर २ टक्के कर आकारण्यात येणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

बड़ी खबर! बैंक से साल में एक लिमिट से ज्यादा कैश निकालने पर देना होगा टैक्स, लोकसभा में पास हुआ बिल

दरम्यान, यंदा अर्थसंकल्पात अनेक नवनवीन बदल करून सरकारने अनेक नियम बनवले आहेत. त्यात कर आकारण्या संदर्भात नवीन नियम केले असून हा नियम काळा पैश्यावर बंधन आणणारा आहे. त्यामुळे अनेक करापासून वाचण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या कॅश व्यवहार करत असतात. या नियमामुळे अशा कंपन्यांच्या या व्यवहारांवर बंधन येतील.