LPG सिलिंडर ‘असा’ करा बुक अन् मिळवा 800 रुपयांचा ‘कॅशबॅक’, ऑफर 30 एप्रिल पर्यंत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दहा रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर आता मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 कोलोचा गॅस सिलिंडर 809 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही घरासाठी गॅस बुकिंग करणार असाल तर सिलिंडर बुकिंगवर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते. त्यामुळे तुमचा फायदा होईल. कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा गॅस सिलिंडर पेटीएमच्या माध्यमातून बुक करावा लागेल. पेटीएमवरुन गॅस बुक केला तर तुम्हाला 800 रुपयापर्यंतचे कॅशबॅक देण्यात येत आहे. जाणून घ्या काय आहे ही विशेष ऑफर.

कसा मिळेल कॅशबॅक ?

1. सर्वात आधी फोनमध्ये पेटीएम सुरु करा. लक्षात ठेवा की ॲपमध्ये लॉग इन करावे लागेल.
2. यानंतर ॲपच्या डिस्प्लेवर तुम्हाला माय पेटीएम वर लिहिलेल्या सर्व सेवा दिसतील. त्यावर क्लिक करा.
3. सर्व सेवा टॅप केल्यानंतर तुम्हाला रिचार्ज व पे बिल विभागात जायचे आहे.
4. यामध्ये तुम्हाला बुक सिलिंडर असा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
5. बुक सिलिंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅस प्रदाता भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून पर्याय निवडावा लागेल.
6. गॅस प्रदाता निवडल्यानंतर, एलपीजी आयडी किंवा गॅस एजन्सीमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि पुढे क्लिक करावे लागेल.

पेटीएमवर सूचीबद्दल केलेल्या ऑफरनुसार ही ऑफर पेटीएम ॲपच्या माध्यमातून प्रथम गॅस सिलिंडर बुकिंगवर लागू होईल. ऑफर अंतर्गत तुम्हाला 800 रुपयापर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. ज्यावेळी तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून प्रथम गॅस सिलिंडर बुक करता त्यावेळी ही ऑफर ॲटोमॅटिक लागू होते. ही ऑफर किमान 500 रुपयांच्या बिल पेमेंटवर लागू होईल आणि या ऑफरचा फायदा एकदाच घेता येईल. ही ऑफर केवळ 30 एप्रिल पर्यंत लागू आहे.

कॅशबॅक साठी तुम्हाला पेमेंटनंतर एक स्क्रॅच कार्ड मिळेल. यामध्ये तुम्हाला 10 ते 800 रुपयापर्यंतचे कोणतेही स्क्रॅच कार्ड मिळू शकते. पेमेंट केल्यानंतर आपण स्कॅच कार्ड उघडले नाही तर कॅशबॅक आणि ऑफर्स विभागात जाऊन आपण ते उघडू शकता. प्रत्येक स्कॅच कार्ड 7 दिवसानंतर एक्स्पायर होईल. त्यामुळे स्कॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे. स्क्रॅच कार्ड स्क्रॅचिंगच्या 48 तासात आपल्याला कॅशबॅक मिळेल.

टीप – पेमेंट करण्यापूर्वी ऑफरशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या.