भारतात इथं कांद्या-बटाटयापेक्षा स्वस्त आहेत काजू, दिल्लीपासून फक्त एवढया अंतरावर आहे ‘हे’ ठिकाण

नवी दिल्ली : काजू एक महागडा सुकामेवा आहे. तो नियमित खाणे खरोखरच सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. सामान्यपणे लोक काजू खाणे आणि खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. कारण आहे काजूचे मोठे दर. आजूच्या परिसरात आणि दिल्लीत काजूचे दर 800 रुपये प्रति किलोच्या जवळपास आहेत. परंतु, दिल्लीपासून अवघ्या 1200 किलोमीटर दूर असलेल्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये काजू खरेदी करू शकता. तुम्ही असे म्हणू शकता की कांदे, बटाट्यांच्या दरात काजू खरेदी करता येतील. झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात काजू 10 ते 20 रुपये प्रति किलो विकले जातात. जामताडाच्या नालामध्ये सुमारे 49 एकर परिसरात काजूच्या बागा आहेत.

झारखंडच्या जामताडाच्या नालामध्ये 49 एकरमध्ये काजूच्या बागा आहेत. या बागा जिल्हा मुख्यालयापासून 4 किमी अंतरावर आहेत. हा भाग डाडर केवलजोरियापासून भंडारकोलपर्यंत सुमारे 5 किलोमीटरमध्ये पसरलेला आहे.

बागांमध्ये दरवर्षी हजारो क्विंटल काजू येतात. परंतु, देखरेखीच्या अभावामुळे स्थानिक लोक आणि जाणारे-येणारे ते खातात. आजूबाजूच्या महिला आणि मुले कच्ची काजू फळे तोडून कांदे बटाट्यापेक्षाही स्वस्त 10 ते 20 रुपये किलो दराने विकतात.

नालास काजूचे नगर बनवण्याचे स्वप्न
माजी उपायुक्त कृपानंद झा यांनी नाला या ठिकाणाला काजूचे नगर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या उपक्रमात निमाई चन्द्र घोष अ‍ॅण्ड कंपनीला केवळ तीन तीन लाख रूपये देऊन तीन वर्षांसाठी बागांची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर काजूच्या बागांची स्थिती जशीच्या तशी आहे. तेव्हापासून यावर सरकारी महारथींची वक्रदृष्टी पडली आहे.

काजू प्रोसेसिंग प्लँट लावण्याची मागणी
सीओने यासाठी नव्याने सुरूवात करण्याबाबत म्हटले आहे. स्थानिक आमदार नालामध्ये काजू प्रोसेसिंग प्लँट लावण्याची मागणी करत आहेत. त्यांनी सांगितले की, अनेकदा सरकारचे लक्ष या काजू बागांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु काहीही उपयोग झाला नाही.