×
HomeशहरपुणेCast India | कास्ट इंडिया : माध्यम क्षेत्रातील उद्योजक आणि सर्जनशील व्यावसायिक...

Cast India | कास्ट इंडिया : माध्यम क्षेत्रातील उद्योजक आणि सर्जनशील व्यावसायिक यांना एकत्र आणणारे स्टार्टअप व्यासपीठ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Cast India | चित्रपट, टेलिव्हिजन, जाहिरात,जनसंपर्क आणि इव्हेंट अशा माध्यम क्षेत्राशी निगडित उद्योजक आणि या क्षेत्रात काम करू इच्छीणारे सर्जनशील व्यक्ती यांना एकत्र आणत त्यांच्यातील दरी साधण्यासाठी पुण्यातील कास्ट इंडिया (Cast India) हे स्टार्टअप (Pune Based Startup) सज्ज झाले आहे.

या व्यासपीठाच्या माध्यमातून हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले जाण्यास मोठी मदत होणार आहे. हे एक बहुउद्देशीय व्यासपीठ आहे, ज्यामुळे माध्यम क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती आणि सर्जनशील व्यकतींना कामाची संधी उपलब्ध करून देणारे उद्योजक हे एकाच वेळी सहजपणे अनेकांशी जोडले जाऊन, त्यामाध्यमातून कामाच्या विविध संधी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. या माध्यमातून माध्यम क्षेत्राची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक संसाधन निर्मितीला चालना मिळणार असल्याची भावना कास्ट इंडिया स्टार्टअपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Founder and CEO, Cast India) प्रद्युम्न बापट (Praddyuman Bapat) यांनी व्यक्त केली. (Cast India)

प्रद्युम्न यांनी आपल्या करिअरची सुरवात एक जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून केली. चित्रपट आणि टेलिव्हिजन या माध्यमाबद्दलच्या कुतुहुलातून एखाद्या व्यक्तीला उद्योगक्षेत्रात मोठे होण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून स्वतःला प्रमोट करणे महत्वपूर्ण असल्याचे त्यांना उमगले.

 

cast india

 

कास्ट इंडिया’चे उद्दिष्ट (Purpose of Cast India)

सर्वसामान्यपणे असे दिसून येते की, भारतातील प्रत्येक तरुणांमध्ये काही न काही कौशल्ये असतात. मात्र या कौशल्याचा वापर करून आपले करिअर कसे घडवायचे याची जाणीव प्रत्येकाला नसते. आजच्या तरुणाईला इंटरनेटच्या जगताचे अमर्यादित प्रवेश मिळाला आहे, मात्र अनेकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही. केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातीलही अशा कौशल्यपूर्ण व्यक्तींपर्यंत पोहचून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यचा कास्ट इंडिया’चा मानस आहे. जेणेकरून जगभरातील नागरिक या तरुणाईच्या कौशल्य गुणांना पाहू शकतील.

 

 

सुमारे दशकभराच्या कामाच्या अनुभवावरून बापट यांना हे जाणवले की, स्वतः ची टीम तयार करताना, एखादा योग्य उमेदवार शोधणे हे खरोखरच कठीण काम आहे. उमेदवाराची निवड करण्यासाठी उपलब्ध व्यासपीठ या क्षेत्रातील कौशल्याच्या सादरीकरणाशी निगडीत नव्हते, तर ते भरती अथवा अथवा कास्टिंग एजन्सी होत्या. बापट यांच्या पूर्वीच्या पिढीतील व्यावसायिकांनी ज्या अडथळ्यांचा सामना केला होता, त्यांनाही त्याच अडचणींना सामोरे जावे लागले आणि आजही त्याच समस्या भेडसावत आहेत. हे केवळ माझ्याच क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर विविध क्षेत्रांमधील व्यवसायिकांशी चर्चा केल्यानंतर त्यानांही हीच समस्या असल्याचे मला जाणवले. ही गोष्ट समजल्यानंतर मला जाणवले की, सध्याच्या काळात एक सर्वसमावेशक व्यासपीठाची सर्वाधिक गरज आहे, ज्याठिकाणी एखादी व्यक्ती काम मिळवू शकते, देऊ शकते, अथवा विविध प्रकल्प राबवू शकते. केवळ नोकरी देणे आणि घेणे इतके मर्यादित स्वरूप न ठेवता या ठिकाणी नागरिक आपल्या आवष्यकतेनुसार एकमेकांशी संवादही साधू शकतात, असे बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले,” माझ्या करिअरच्या सुरवातीच्या काळात जेव्हा जेव्हा मला अडचणी आल्या, त्या त्यावेळी माझ्या आसपासच्या लोकांनी नेहमीच चांगली मदत केली. आपणही समाजासाठी काहीतरी चांगले काम करून, त्याची परतफेड करावी, असे मला नेहमी वाटत होते. चांगली लोकं ही एखाद्या प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी अधिक महत्वपूर्ण असतात,असे मला वाटते.”

ज्याप्रकारे मला माझ्या संघर्षाच्या काळात चांगली मदत मिळाली, त्याचप्रमाणे या व्यासपीठाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रातील नागरिकांनाही योग्य ती मदत मिळेल, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली.

 

 

बापट यांचे सहकारी आणि कास्ट इंडिया’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सिटीओ) पुलकित जैन (Pulkit Jain) म्हणाले,” कास्ट इंडिया हे एक सेवा केंद्रित व्यासपीठ आहे. जे प्रत्यक्ष आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमातून सेवा प्रदान करेल. तसेच स्थानिक नागरिकांमधील कौशल्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे अमचे उद्दीष्ट आहे.”

सांख्यिकी

सांख्यिकी विश्लेषणानुसार, आगामी दोन वर्षात म्हणजेच २०२४ पर्यंत जाहिरात क्षेत्र हे ११%, माध्यम,
चित्रपट आणि टेलिव्हिजन हे ९% तर जनसंपर्क क्षेत्रात तब्बल १०.५० टक्यांनी आणि इव्हेंट क्षेत्रात सुमारे ११ टक्यांनी वृद्धी होईल.
आणि या वाढीमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
कास्ट इंडिया हे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच
या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
यामाध्यमातून आम्ही माध्यम क्षेत्रातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

भविष्यातील वाटचाल

आगामी काळात कास्ट इंडिया हे स्वतःचे एक अप्लिकेशन विकसित करणार आहे.
ज्यामुळे वापरकर्ते हे त्यांना हव्या असलेल्या संधीशी थेट आणि कोणत्याही किचकटी शिवाय जोडले जाऊ शकतील.
त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध चित्रीकरणांचे नियोजन, पोर्टफोलिओ विकसित करणे,
प्रशिक्षण देणे आणि स्टोक इमेजसाठीची बाजारपेठ तयार करणे, व्हिडिओज,
ग्राफिक्स यांच्याशी निगडित कामांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले जाईल,
असे बापट यांनी सांगितले.

 

Web Title : Cast India: This Startup Is Building India’s Largest Creative Network

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News