ओबीसींची (OBC) जातनिहाय जनगणना झाली पाहिजे : प्रा. श्रावण देवरे

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – या देशामध्ये कुत्रा, मांजर, शेळी, कोंबडीची जनगणना सरकार करते, परंतु ओबीसीची जनगणना किंवा जातनिहाय जनगणना करत नाही. त्यामुळे या देशात ओबीसीच्या लोकसंख्येचा आकडा निश्चित होत नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रात ओबीसीवर अन्याय होत आहे. त्यामुळे ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास सरकारला भाग पाडावे लागेल, असे प्रतिपादन प्रा. श्रावण देवरे यांनी केले.

भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी २२ डिसेंबर रोजी शिव पार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे पार पडले यावेळी प्रा. श्रावण देवरे बोलत होते. यावेळी विशेष अतिथी लाभलेले आ. हरिभाऊ राठोड म्हणाले की, ओबीसी समाजाने न्याय, हक्क, अधिकार मिळवण्यासाठी सतत संघर्ष करून सरकार समोर जनरेटा उभा करावा लागेल, तरच ओबीसींच्या विविध समस्या सुटतील. तसेच येणाऱ्या जानेवारी महिन्यात ओबीसीसाठी देशभरामध्ये जनआंदोलन करण्यात येणार असल्याचेही आ. राठोड यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मनराज शास्त्री हे होते. प्रा. गुरूदयालसिंघ, प्रा. सुशिला मोराळे, राजबीरसिंघ, बालाजी शिंदे, बालाजी ईिबतदार, सुरेंद्रकुमार जयस्वाल, लालाराम यादव, पी. कुंभार, आर. के. पाल, ॲड. दामोधर गोप, प्रा. नंदलाल चव्हाण, ज्ञानेश्वर गोरे, धनीप्रसाद निशाद, राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार यांची विचारपीठावर उपस्थिती होती.

या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता रविवारी होणार असून ते यशस्वी करण्यासाठी गोविंद फेसाटे, गोविंदराम सुरनर, नामदेवराव आईलवाड, बळीराम राऊत, रवी बंडेवार, प्रल्हाद राठोड, प्रा. श्रीमंत राऊत, दत्ता चापलकर, प्रा. मारोती लुटे, सुभाष हिवरे, संदीप जिल्हेवार, दत्ता नांदेडकर, नामदेव पांचाळ, विनोद सुत्रावे, संजय पेठकर, सुभाष हिवरे, प्रदीप कल्याणकर, नागभूषण दुर्गम, व्यंकट चिलवरवार, उमेश पांचाळ, राजेश विजापुरे, योगेश पार्डीकर, राजेश चिटकूलवार, आकाश शेंडे, पी.एम. कदम, प्रा. दिलीप काटोडे, संतोष तेलंग, बालाजी चक्रधर, बालाजीराव नारे, नागनाथराव चिटकूलवार, डॉ. श्रावण रॅपनवाड, सुरज आडे, धनराज राठोड तसेच भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रदीप राठोड आदी परिश्रम घेत आहेत.