Caste Validity Certificate | जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Caste Validity Certificate | शैक्षणिक, सेवा, निवडणूक आदी कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. 2021-22 या वर्षात त्रुटीअभावी प्रलंबीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे आणि अर्जदारांचे नुकसान होवू नये यासाठी शासनाच्या निर्देशान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute – BARTI) सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Caste Validity Certificate)

 

या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्रुटी असलेल्या प्रकरणात त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास कळवण्यास
तसेच त्यांच्या प्रकरणांतील त्रुटींची मुदतीत पूर्तता करुन घेण्याबाबत कळवण्याच्या सूचनाही समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. (Caste Validity Certificate)

 

 

जात वैधता प्रमाणपत्र त्रूटीअभावी प्राप्त झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी,
अन्य अर्जदारांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे आणि
मूळ कागदपत्रांसह 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत संपर्क साधावा,
असे आवाहन बार्टीचे (BARTI) महासंचालक तथा राज्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याचे मुख्य समन्वयक महाधम्मज्योती गजभिये यांनी केले.

 

 

Web Title :- Caste Validity Certificate | Special drive till 28th February for verification of caste validity certificate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियावर लावली आग, स्टायलिश लूकमध्ये दिल्या जबरदस्त पोज

 

Menstrual Pain Home Remedies | मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांमुळं त्रस्त झाला आहात? तर जाणून घ्या काही खास टिप्स

 

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दर महिना 5000 रुपयाची करा गुंतवणूक, जाणून घ्या किती मिळेल फंड आणि फायदा

 

Cheslie Kryst Suicide | 60 मजली इमारतीवरून उडी मारून ‘या’ प्रसिद्ध मॉडेलनं केली आत्महत्या, टोकाचं पाऊल उचलण्यापुर्वी केली होती सोशल मीडियावर पोस्ट

 

Sangli Crime | तासगाव-भिलवडी रोडवर छोटा हत्तीची तिघांना धडक; RTI कार्यकर्ता संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू