Casting Couch | अंकिता लोखंडेपासून तर दिव्यांका त्रिपाठीपर्यंत ‘या’ 6 अभिनेत्र्या झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार; जाणून घ्या त्यांचे अनुभव

पोलीसनामा ऑनलाईन टीम – इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करायचा असेल तर अनेक कलाकारांना कास्टिंग काऊच सामोरं जावं लागतं. तसेच अनेक दिग्गज कलाकार कास्टिंग काऊचला (Casting Couch) बळी पडले आहे. छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेपासून (Ankita Lokhande) ते दिव्यांका त्रिपाठीपर्यंत (Divyanka Tripathi) अनेक प्रसिद्ध अभिनेत्र्यानी आपल्या कष्टाने आणि अभिनयानं इंडस्ट्रीमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र या अभिनेत्रींनासुद्धा कास्टिंग काऊचला बळी पडल्या होत्या. जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्रींना कास्टिंग काऊचच्या (Casting Couch) या वाईट अनुभवाला सामोरे जावं लागलं.

 

· अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) :
सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडे सतत चर्चेत पाहायला मिळते. अंकिता लोखंडेनं बॉलीवूड बबलमधील मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, तिला एकदा नव्हे तर दोनदा कास्टिंग काऊचचा (Casting Couch) अनुभवाला सामोरं जावं लागलं. साऊथमधील एका दिग्दर्शकांनी रोल बदली तिला एक रात्रीची ऑफर केली होती. नंतर अंकिता दिग्दर्शकासोबत भांडून निघून गेली. तेव्हा ती फक्त 20 वर्षाची होती. तसेच तिला अजून एका अनुभवसुद्धा सामोरे जावे लागले होतं.

 

· आराधना शर्मा (Aradhana Sharma):
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आराधना शर्मा. आराधनानं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये आणि ‘स्प्लिट्सविला’ मध्ये काम केला आहे. तिनं ‘टाइम्स ऑफ इंडियाच्या’ मुलाखतीमध्ये सांगितलं, एकदा स्क्रिप्ट वाचत असताना एका मुलानं तिच्यासोबत चुकीची हरकत केली होती. त्यामुळे ती कॅमेरा पासून पळून गेली.

 

· मदालसा शर्मा (Madalsa Sharma):
मदालसा शर्मानं ईटाइम्स मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मुलगी असल्यामुळे तिला अनेकदा कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं. परंतु तिनं नेहमीच यातून बाहेर जाण्याचा रस्ता निवडला.

 

· किश्वर मर्चंट (Kishwer Merchant):
सुप्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंट सोशल मीडियावर सध्या झळकत असली तरी, एकेकाळी तिला चित्रपटांमध्ये काम दिल्याबद्दल मुख्य हिरो सोबत रात्र काढण्यास सांगितलं होतं.

 

· दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi):
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित नाव म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांकानं सुद्धा तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊच बद्दलचा एक वाईट अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली, तिला एक चांगला रोल मिळाला होता. परंतु त्या बदल्यात दिग्दर्शकांनी तिला सोबत राहण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी तिला पैशांची उणीव असून देखील दिव्यांकानं या ऑफरला लाथ मारली होती.

 

· स्नेहा जैन (Sneha Jain):
‘साथ निभाना साथिया 2’ ची अभिनेत्री स्नेहा जैननं चर्चेत तिच्या अनुभवाबद्दल सांगितलं. एका दिग्दर्शकांने तिला म्हटलं होतं, मी तुला रोल देईल. परंतु त्याबद्दल तुला माझ्यासोबत हैदराबादमध्ये पूर्ण दिवस सोबत राहावे लागेल आणि मी जे म्हणेल ते करावे लागेल, स्नेहा म्हणाली.

 

 

 

Web Title :- Casting Couch | ankita lokhande madalsa sharma to divyanka tripathi listen to the experience of these tv actresses who went through the casting couch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 Blood Sugar | कोणते पदार्थ वाढवतात ब्लड शुगर आणि कोणते कमी करतात? येथे पहा यादी

 

PMC Draft ward Structure | पुणे महानगरपालिका : प्रभाग रचनेचा नकाशा अधिकृतरित्या जाहीर, अनेकांच्या नगरसेवकपदाच्या ‘आकांक्षा’वर ‘पाणी’?; जाणून घ्या 58 प्रभागांतील मतदार संख्या

 

PMC Draft ward Structure | 34 गावांचा समावेश आणि त्रिसदस्यीय प्रभागामुळे अनेक विद्यमान ‘डेंजर झोन’ मध्ये