Casting Couch | ‘चित्रपटात काम करायचं असेल तर तुला चार दिवस या चार लोकांसोबत…’मराठी अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेमांना (Marathi Movies) चांगले दिवस आले आहे. त्यातच चित्रपटाचे बजेट वाढल्याने इंडस्ट्रीत ग्लॅमर आलं. याच ग्लॅमरला भुलून अनेक निर्माते (Producers), तंत्रज्ञ (Technician), कास्टिंग डिरेक्टर्स (Casting Director) मराठीत आले. ही इंडस्ट्रीची लख्ख बाजू असली तरी याला एक काळी किनारही लाभली आहे. हिंदीसह इतर भाषांत असलेला कास्टिंग काऊचचा (Casting Couch) प्रकार आता मराठी इंडस्ट्रीत (Marathi Industry) डोकावू लागला आहे. यापूर्वी कास्टिंग काऊचवर (Casting Couch) उघड बोललं जात नसली तरी आता अनेक नाईका यावर उघडपणे बोलत आहेत.

 

मीटिंग्जना मिळणाऱ्या हिंट्स, नको त्या अपेक्षा बाळगून असलेल्या नजरा या नायिका बरोबर ओळतात. ही झाली आजची गोष्ट. पण (Casting Couch) हे सर्व गेल्या काही वर्षात सुरु झालं असं नाही. मराठी सिनेसृष्टीतील एक अनुभवी आणि प्रसिद्ध अभिनेत्रीनं बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक वाईट अनुभव शेअर केला आहे.

 

विविध कलाकृतीमधून प्रत्येक घरात पोहचलेला चेहरा म्हणून अभिनेत्री सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) यांची ओळख आहे. सध्याच्या काळाबरोबर चालण्याच्या हेतूनं त्यांनी यूट्यूब चॅनल सुर केलं. त्यांच्या ‘दिल के करीब’ (Dil ke Kareeb) या कार्यक्रमामधून मनोरंजनविश्वातील कलाकारांचा त्यांचा संघर्ष, प्रवास याची माहिती प्रेक्षकांना समजते. या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री अर्चना नेवरेकर (Actress Archana Newrekar) यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत अर्चना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. तसेच सिनेमा सिनेसृष्टीत त्यांना आलेले चांगले-वाईट अनुभव त्यांनी मुलाखती दरम्यान शेअर केले.

अर्चना यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत कामाला सुरुवात केली. सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी मालिका, मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या पण त्यांना हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. याची त्यांना खंत वाटत नाही, असं त्या स्वत: म्हणतात. हे सांगत असतानाच त्यांनी त्यांना आलेला एक कटू अनुभवही सांगितला.

 

या चार लोकांसोबत चार दिवस रहावं लागेल
मुलाखतीत अर्चना यांनी सांगितले की, एका मोठ्या हिंदी सिनेमासाठी (Hindi Cinema) निवड झाली होती.
सिनेमाचं नाव सांगता येणार नाही, कारण आता त्याचे वाईट परिणाम होतील. या चित्रपटासाठी दोन मुलींची निवड करण्यात आली होती.
त्यातली मी एक होते. या सिनेमात मी भूमिका करणार हे नक्की झालं होतं. तुमचं काम पाहिलंय, फोटोही छान आहेत,
तुम्ही हा सिनेमा करतायत, असं मला सांगण्यात आलं होतं. पण तुम्हाला या चार लोकांसोबत चार दिवस राहावं लागेल,
अशी अट त्यांनी माझ्यासमोर ठेवली होती, असा धक्कादायक खुलासा अर्चना यांनी सांगितले.
ही ऑफर मी नाकारली असंही त्या म्हणाल्या. माझ्या सोबत दुसरी मुलगी होती तिनं त्यांची ऑफर स्वीकारली होती.
आपल्या बॅचमधील ती आज टॉपला आहे, असाही खुलासा अर्चना यांनी केला.

 

Web Title :- Casting Couch | marathi actress archana nevrekar talks about casting couch in sulekha talwalkar dil ke kareeb

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli Crime | तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 महिलांना सक्तमजुरी

 

Udayanraje Bhosale On Ajit Pawar | उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान; म्हणाले – ‘हिंमत असेल तर समोरासमोर या..’

 

Swiggy-Zomato 1 जुलैपासून डिलिव्हर करणार केवळ ‘क्वालिटी फूड’, FSSAI ग्राहकांच्या हितासाठी लागू करत आहे नवीन नियम