मॉडेलिंगचे आमिष दाखवून 14 वर्षाच्या मुलीला विकणार होते 3 लाखांत, पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका 14 वर्षाच्या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलणा-या 2 कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. मुलीला 3 लाखात विकण्याच्या प्रयत्नात हे तिघेही असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतल्या मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये समाजसेवा शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल, मोहम्मद शेख, विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया आदीनी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा पथकाने अटक केलीय. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम मिळवून दिल्यानंतर आरोपींनी तिला वेश्या व्यवसायात आणल्याचा धक्कादायक प्रकार प्राथमिक तपासात समोर आला आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.