‘कॅट’ने म्हटले – ‘खराब रेकॉर्ड असलेल्या अधिकार्‍यांची वेळेपूर्वी सेवानिवृत्ती योग्य, सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब’

नवी दिल्ली : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) ने खराब रेकॉर्ड आणि भ्रष्ट अधिकार्‍यांना वेळेपूर्वी अनिवार्य पद्धतीने सेवानिवृत्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवले आहे. कॅटच्या मुख्य पीठाने माजी प्राप्तीकर आयुक्त प्रमोद कुमार बजाज यांची सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.

सरकारने कठोर निर्णय घेत मागच्या वर्षी प्राप्तीकर विभागातील खराब रेकॉर्ड असलेल्या अधिकार्‍यांसाठी अनिवार्य सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला होता. कॅटने सरकारच्या या निर्णयावर शिक्कमोर्तब केले होते. मूलभूत नियम 56 (जे) च्या अंतर्गत अनिवार्य सेवानिवृत्त करण्यात आलेल्या 85 अधिकार्‍यांमध्ये बजाज यांचा सुद्धा समावेश होता. जस्टिस एल नरसिंह रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील कॅटच्या मुख्य पीठाने बाजाज यांची याचिका फेटाळली. पीठात सदस्य (प्रशासन) अराधना जौहरी यांचाही समावेश होता.

पीठाने म्हटले – बजाज यांच्या याचिकेत कोणतीही पत्रात नव्हती
पीठाने म्हटले, आम्हाला मूळ अर्जात कोणतीही पात्रता दिसत नाही आणि त्यानुसारच तो फेटाळण्यात येत आहे. पीठाने सरकारच्या बाजूवर सुद्धा सहमती दर्शवली की, मूलभूत नियम 56 (जे) लागू करत मंजूर आदेशात हस्तक्षेप करण्याची जास्त शक्यता राहात नाही.

बजाज यांच्याविरोधात कठोर टिप्पणी
पीठाने याचिकाकर्त्याच्या (बजाज) विरोधात कठोर टिप्पणी केली. पीठाने म्हटले, त्यांचा रेकॉर्ड त्यांच्याबाबत सर्वकाही सांगत आहे. त्यांना नोकरीत ठेवणे विभागाच्या हिताचे सुद्धा नव्हते. कारण त्यांचे वैयक्तिक जीवन वादग्रस्त होते, तसेच त्यामुळे विभागाची सुद्धा बदनामी झाली. हे सर्व याचिकाकर्त्याने मिळवले होते, आणि अशावेळी विभागासमोर नियम 56 (जे) लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या नियमात त्या अटी आहेत, ज्याअंतर्गत एखाद्या अधिकार्‍यांला वेळेपूर्वी सेवानिवृत्त केले जाऊ शकते.

बजाजवर भ्रष्टाचार आणि एकापेक्षा जास्त विवाहांचा आरोप
सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारे बजाज यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवण्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, त्यांनी कथित प्रकारे तीन-तीन विवाह केले आहेत. आपल्या पासून वेगळ्या राहणार्‍या पत्नीला त्यांनी दिल्लीतील अशोक विहारमध्ये एक फ्लॅट खरेदी करून दिला होता आणि नियमानुसार विभागाला याची माहिती सुद्धा दिली नाही. कथित प्रकारे बजाजने रेणू नावाच्या महिलेशी विवाह केला, त्यानंतर राखी नावाच्या महिलेशी विवाह केला आणि आपली पत्नी सपनाला घटस्फोट सुद्धा दिला नाही, अशाप्रकारे त्यांनी द्विविवाह केला.