ब्लॉग – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Mon, 08 Jul 2019 11:52:08 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 ब्लॉग – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 #HumanStory : पॉकेटमनीसाठी ‘स्पर्म डोनेशन’ला केलं सुरू नंतर पुढं झालं असं काही, स्वतः ‘स्पर्म डोनर’नं सांगितली संपुर्ण ‘स्टोरी’ https://policenama.com/human-stories-human-story-of-a-sperm-donor-in-delhi/ Mon, 08 Jul 2019 11:52:08 +0000 https://policenama.com/?p=139001 Sperm-Doner
Sperm-Doner

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तु्म्ही स्पर्म डोनेशनबद्दल ऐकलंच असेल. स्पर्म डोनेशन ब्लड डोनेशनपेक्षा थोडं वेगळं आहे. फेसबुकवर प्राऊड स्पर्म डोनरचा फोटो क्वचितच पहायला मिळेल. अनेक प्रकारची भीती त्यांचा पाठलाग करत असते. सतत काय चालू असतं एका स्पर्म डोनरच्या डोक्यात? हेच सांगणारी ही गोष्ट…. “आतापर्यंत मी १०० हून अधिकवेळा स्पर्म डोनेट केलं आहे. आधी डायरीत […]

The post #HumanStory : पॉकेटमनीसाठी ‘स्पर्म डोनेशन’ला केलं सुरू नंतर पुढं झालं असं काही, स्वतः ‘स्पर्म डोनर’नं सांगितली संपुर्ण ‘स्टोरी’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Sperm-Doner
Sperm-Doner

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तु्म्ही स्पर्म डोनेशनबद्दल ऐकलंच असेल. स्पर्म डोनेशन ब्लड डोनेशनपेक्षा थोडं वेगळं आहे. फेसबुकवर प्राऊड स्पर्म डोनरचा फोटो क्वचितच पहायला मिळेल. अनेक प्रकारची भीती त्यांचा पाठलाग करत असते. सतत काय चालू असतं एका स्पर्म डोनरच्या डोक्यात? हेच सांगणारी ही गोष्ट….

“आतापर्यंत मी १०० हून अधिकवेळा स्पर्म डोनेट केलं आहे. आधी डायरीत दिवस आणि वेळ लिहायचो. परंतु आता हिशोबच नाही. पॉकेटमनी साठी याची सुरुवात केली होती. विचार केला तर जरा विचित्रच वाटतं. यावेळी देशातील अनेक भागात माझ्या शरीराचे अनेक हिस्से रहात असतील.

२०१४ साली कॉलेजला होतो. एकदा मित्रांना आपापसात खुसुर-पुसुर करताना पाहिलं. मी गेल्यानंतर सगळे गप्प झाले. मी विचारणा केली तरी कोणी काही बोलले नाही. एका खास मित्राने नंतर सांगितले की, आम्ही स्पर्म डोनेट करायला जात आहोत. मी थोडा चकित झालो. मोबाईलवर व्हिडीओ पाहणं, चेष्टा मस्करी करणं ठिक होतं परंतु स्पर्म डोनेशन ! मी त्याला समजावून सांगत होतो आणि तो मला.

‘दोन महिन्यानंतर स्पर्म बँकमध्ये होतो. एसी रिसेप्शनवर घामाघूम झालेलो’

मी स्पर्म बँकमध्ये रिसेप्शनपाशी बसलो होतो. नंतर मला आत बोलावलं गेलं. समजावलं गेलं. मला केवळ सँपल द्यायचं होतं. तपासणी केल्यानंतर क्वालिटी चांगली असेल तरच पुढे बोललं जाणार होतं. पुढे एचआयव्ही आणि हेपेटाइटिसची टेस्ट होणार होती. यानंतर सगळं ठिक असेल तरच मला डोनरचं कार्ड मिळणार होतं. स्पर्म बँकेत हे कार्डच माझी ओळख असणार होतं.

‘आणि माझ्या हातात एक सँपल बॅग होती’

डॉक्टर(स्पर्म बँक मॅनेजर) मला समजावून सांगत होते आणि मी ऐकत होतो. बोलणं झाल्यानंतर त्यांनी खांद्यावर हलकेच थाप दिली. विश्वासात घेतलं. यात घाबरण्यासाखं काहीच नाही. मी होकारार्थी मान हलवली. मी रस्ता शोधत होतो की, काहीही करून इथून पळ काढू. ५ मिनिटांनंतर मी कलेक्शन रूममध्ये होतो. रुममध्ये हिंदी, इंग्रजी मॅगेझिन्स होत्या. अशा ज्यांना मी कधी हातही लावला नव्हता. काही फोटोही होते. मी एकटाच होतो माझ्या हातात एक रिकामी सँपल बॅग होती.

‘पुढील काही मिनिटांत माझ्या नशीबाचा निर्णय होणार होता’

मी त्या मित्राला दुषणं देऊ लागलो, ज्याने पॉकेटमनीसाठी मला हा रस्ता सुचवला होता. स्वत:लाही दोष देऊ लागलो की, मी तिथून पळ का काढला नव्हता. परंतु आता काहीच होऊ शकत नव्हतं. एक सँपल माझं भविष्य ठरवणार होतं. थोड्या वेळाने बाहेर पडलो. बॅग दिली आणि जोरात बाहेर पळून गेलो. त्यानंतर अनेक दिवस विचार करण्यातच गेले. काय होईल जर कॉलच नाही आला तर. याचा अर्थ असा तर नसेल की, मी पुढे जाऊन बाप होऊ शकणार नाही. किंवा मला काही आजार निघाला तर! बोर्ड रिजल्टची वाट पाहतानाही एवढी भीती वाटली नव्हती. पहिल्यांदा प्रेमात पडल्यानंतरही इतकी अस्वस्थता नव्हती. अखेर कॉल आला आणि मला पुढील व्हिजिटसाठी बोलावण्यात आलं.

आता सर्व भीती संपली होती. भीती एकच की, कुटुंबियांकडून हे कसं लपवू ?

पप्पा सरकारी नोकरीला होते. दिल्लीतील जामियानगर भागात कुटुंब रहात होतं. तिथेच कॉलेजमध्ये माझे खूप सारे मित्र होते. साधं शिंकलं तरी आवाज सर्वांपर्यंत पोहोचत होता. अशात स्पर्म डोनेशनसारखी गोष्ट कशी लपवणार होतो. आम्ही मित्रांनी एकी केली. मी सर्वात नवीन होतो. त्यामुळे सर्वांनी माझी मदत केली. सर्व काही दोनदा तीनदा समजावलं गेलं. कॉलेजात माझ्या गैरहजरीत सर्व काही सांभाळून घेतलं जाईल असा विश्वासही दिला गेला.

‘पहिल्यांदा कलेक्शनसाठी स्पर्म बँकेत जाताना असा तयार झालो जसा काय सिक्रेट मिशनवर आहे.’

मी वेळेत पोहोचलो. सगळ्या टेस्ट झाल्या. काही दिवसांनंतर माझ्याकडे डोनर कार्ड होतं. मी ऑन कॉल स्पर्म डोनर झालो होतो. वेळोवेळी कॉल यायचा आणि मी तिथे हजर व्हायचो. स्पर्म बँकेतील ती थंडगार रूम, त्या मॅगेझिन्स, आणि फोटोंसोबत माझी ओळख झाली होती. अनेकदा रंजक अनुभव यायचे. एकदा मी गेलो होतो तेव्हा रिसेप्शनवर एक मुलगा वाट पहात होता. खूप घामाघूम झाला होता. मला पाहताच इकडे तिकडे पाहू लागला. मी आता जुना खेळाडू झालो होतो. तरीही कोणी ओळखू नये म्हणून काळजी घ्यायचो. नंतर मला लक्षात आलं की, ओळख लपवण्याचा प्रयत्न करणारी माझ्यासारखी अनेक मुले होती.

‘ते ऐकून सुन्न झालो’

पॉकेटमनीसाठी स्पर्म डोनर बनलो होतो. हळूहळू सवय झाली. समवयस्क मित्र माझ्यासारख्या मुलांची टर उडवत असे. एकदा एक मित्र म्हणाला की, लग्न झाल्यानंतर बघा. पूर्ण जगाला मुलं देत आहेत, नंतर स्वत:लाच मूल होणार नाही. ते ऐकून मी पूर्ण दिवस सुन्न झालो होतो. इंटरनेटवर वाचण्यातच रात्र घालवली. काही दिवसांनंतर मी पुन्ही स्पर्म बँकेत होतो.

‘आता पैशांसाठी नाही, तर यासाठी काम करू लागलो’

सुरुवातीला प्रत्येक हप्त्यात जायचो. ५ दिवस खूप काळजी घ्यायला लागायची. दारू नाही, सिगारेट नाही, फिजीकल इंटिमेट नाही व्हायचं. असे केल्याने वॉल्युम कमी होतो आणि सँपल खराब येतं. जर तुम्हाला कॉल आणि तुम्ही हो म्हटलात तर ५ दिवस तुम्हाला वाट पहावीच लागणार सगळ्याच गोष्टींसाठी. आता काही रुपयांसाठी नाही, तर एका न पाहिलेल्या कपलसाठी काम करू लागलो होतो.

कॉलेज संपलं आणि…

कॉलेज संपलं नंतर बँकेत नोकरी मिळाली. एका वर्षापूर्वीच लग्न झालं. आताही मी डोनेट करत असतो. परंतु खूपच कमी. असा जातो की, बायकोला चाहूल नको लागायला. तिला कळलं तर लग्नच तुटू शकतं. भीती वाटते खूप परंतु कॉल आला तर नाही म्हणवत नाही. ५ वर्षांपूर्वी मिळालेला तो डोनर नंबर माझ्या ओळखीपेक्षाही मोठा झाला आहे. पहिल्यांदा जायचो तेव्हा सर्वात आधी डायरी लिहायचो. दिनांकही लिहायचो कारण लक्षात रहावं. नंतर नेहमीच जायला लागलो. डायरी मागे पडू लागली. आता दिल्ली सोडून सोनीपतमध्ये रहातो. डायरी कुठे आहे आठवत नाही.

‘१०० हून अधिकवेळा स्पर्म डोनेट केलं, त्यातील अर्धे जरी यशस्वी झाले असतील तर कमीत कमी ५० मुलांचा पिता असेल’

कोणाचे डोळे माझ्यासारखे असतील तर कोणाचे केस माझ्यासारखे असतील. कोणी माझ्यासारखं चालत असेल तर कोणी माझ्यासारखं शॉर्ट टेंपर्ड असेल. बँकेत जेव्हा कॉम्प्युटर समोर बसलेलो असतो तेव्हा अनेकदा त्यांचा विचार येतो. ती मुलं ज्यांना मी कधी ओळखतही नाही, जे मला कधी भेटणारही नाही.”

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

 

The post #HumanStory : पॉकेटमनीसाठी ‘स्पर्म डोनेशन’ला केलं सुरू नंतर पुढं झालं असं काही, स्वतः ‘स्पर्म डोनर’नं सांगितली संपुर्ण ‘स्टोरी’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
139001
चहातील कॅफीनमुळे होऊ शकते अ‍ॅडिक्शन, ही आहेत लक्षणे https://policenama.com/more-than-3-cup-of-tea-dangre-for-health/ Mon, 10 Jun 2019 10:23:03 +0000 https://policenama.com/?p=125266 tea
tea

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवसभरात एक किंवा दोन वेळा चहा प्यायल्यास ते खूप नुकसानकारक नाही. परंतु, दिवसभर सतत चहा पिणे हे एक व्यसन आहे. तंबाखू, सिगारेट ऐवढेच हे व्यसन घातक आहे. त्यामुळे तुम्ही दोन ते तीन कपापेक्षा जास्त चहा पित असाल तर हे अ‍ॅडिक्शन होण्याची शक्यता आहे. चहातील कॅफीनमुळे अ‍ॅडिक्शन होऊ शकते. असे अ‍ॅडिक्शन झाल्यास […]

The post चहातील कॅफीनमुळे होऊ शकते अ‍ॅडिक्शन, ही आहेत लक्षणे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
tea
tea

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवसभरात एक किंवा दोन वेळा चहा प्यायल्यास ते खूप नुकसानकारक नाही. परंतु, दिवसभर सतत चहा पिणे हे एक व्यसन आहे. तंबाखू, सिगारेट ऐवढेच हे व्यसन घातक आहे. त्यामुळे तुम्ही दोन ते तीन कपापेक्षा जास्त चहा पित असाल तर हे अ‍ॅडिक्शन होण्याची शक्यता आहे. चहातील कॅफीनमुळे अ‍ॅडिक्शन होऊ शकते. असे अ‍ॅडिक्शन झाल्यास चहा न मिळाल्यावर डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवतो. तसेच जास्त गरम चहा प्यायल्याने तोंडाला पोटापर्यंतच्या नलिकांचे नुकसान होते. यामुळे कर्करोग होऊ शकतो.

एका दिवसात तीन कपापेक्षा जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते, असे यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या अहवालातही नमूद करण्यात आले आहे. चहामध्ये असलेले कॅफीन व अन्य अनेक पोषकद्रव्ये जास्त प्रणामात घेतल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळे चहा योग्य प्रमाणात पिणे आरोग्यासाठी ठिक आहे. जास्त चहा प्यायल्यास कोणते नुकसान होऊ शकते. चहामध्ये अ‍ॅल्युमिनियम सारखे अनेक टॉक्सिन्स असतात. यामुळे बारीक पुरळ, मुरूम यासारख्या त्वचेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. चहामध्ये कॅफीन असते. त्यामुळे जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थता वाढते. तसेच चहामध्ये असलेल्या टॅनिन, टायलिनमुळे पचन होत नाही. त्यामुळे पोटाची समस्या वाढू शकते. शिवाय, चहामध्ये फ्लोराइड अधिक प्रमाणात असते. यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात.
चहामध्ये असलेल्या फायटोकेमिकल्समुळे जास्त चहा प्यायल्याने झोप न येण्याची समस्या होऊ शकते. ५ कपापेक्षा जास्त चहा प्यायल्याने यूरिन ४००-५०० टक्के वाढते. यामुळे किडनीवर जास्त जोर पडते आणि किडनीच्या समस्या होऊ शकते. तसेच जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते. यामुळे सोडियम, पोटॅशियमसारखे शरीराला आवश्यक असणारे खनिजद्रव्ये बाहेर पडतात. अशक्तपणा वाढतो. बॉडीमधून पाणी बाहेर निघून गेल्याने डिहायडरेशनची समस्या होऊ शकते.

The post चहातील कॅफीनमुळे होऊ शकते अ‍ॅडिक्शन, ही आहेत लक्षणे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125266
वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी अशी सोडवा ‘इरेक्शन’ची समस्या https://policenama.com/what-to-do-for-erection-problem/ Mon, 10 Jun 2019 09:33:21 +0000 https://policenama.com/?p=125230 erection
erection

पोलीसनामा ऑनलाइन टीम- काही पुरूषांना आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना इरेक्शन (ताठरता) ची समस्या जाणवते. असे होण्यामागे काही कारणे असतात. मात्र, समस्येमुळे दोन्ही व्यक्तींच्या लैंगिक जीवनासह भावनिक नात्यावरही परिणाम होतो. पुरूषांमध्ये तणावही अधिक वाढण्याची शक्यता असते. शिवाय काही वेळा नात्यात नकारात्मकताही येण्याची शक्यता असते. ही समस्या काही उपाय केल्यास व कारणे जाणून घेतल्यास दूर होऊ […]

The post वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी अशी सोडवा ‘इरेक्शन’ची समस्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
erection
erection
पोलीसनामा ऑनलाइन टीम- काही पुरूषांना आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना इरेक्शन (ताठरता) ची समस्या जाणवते. असे होण्यामागे काही कारणे असतात. मात्र, समस्येमुळे दोन्ही व्यक्तींच्या लैंगिक जीवनासह भावनिक नात्यावरही परिणाम होतो. पुरूषांमध्ये तणावही अधिक वाढण्याची शक्यता असते. शिवाय काही वेळा नात्यात नकारात्मकताही येण्याची शक्यता असते. ही समस्या काही उपाय केल्यास व कारणे जाणून घेतल्यास दूर होऊ शकते.
लाइफस्टाईल, तणाव, मेडिकल किंवा सिच्युएशनल व स्थितीशी संबंधित इरेक्शनची समस्या असू शकतात. ही समस्या जर दूर करण्यासाठी प्रथम आधी कारण शोधणे आवश्यक आहे. पौष्टीक आहार न घेणे, झोप पुरेशी न होणे, एक्सरसाइज न करणे, स्मोकिंग इत्यादी लाइफस्टाईलशी निगडीत सवयी सेक्स डाइव्हला प्रभावित करण्यासोबतच इरेक्शनमध्येही समस्या निर्माण करतात. यासाठी पौष्टीक आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यायाम करणे हे उपाय केल्यास काही दिवसात चांगला फरक दिसून येतो. विविध कारणांमुळे येणारा मानसिक तणाव मेंदूवर खूप परिणाम करतो. असा तणाव असल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे इरेक्शनसंबंधी समस्या होते.
तणाव कमी करण्यासाठी योगाचा आधार घेतल्यास ही समस्या दूर होते. इरेक्शनची समस्या सिच्युएशनलही असू शकते. बेडरूमची सेंटींग, शारीरिक संबंधावेळील पार्टनरची एखादी सवय, खोलीचे तापमान यामुळेही इरेक्शनमध्ये समस्या येऊ शकते. दोघांमध्ये काही समस्या असल्यास इच्छा असूनही शरीर संबंध ठेवता येत नाहीत. अशावेळी समुपदेशन घेतल्यास नाते सुधारते. आणि इच्छांमध्येही बदल होतो. इरेक्शनची समस्या कोणत्याही शारीरिक समस्येमुळे येऊ शकते. ही समस्या जाणवत असल्यास काळजी करण्याचे कारण नसते. काही उपचारानंतर तुम्ही पुन्हा वैवाहिक जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. यासाठी डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावेत. काही टेस्ट केल्यावर किंवा थेरपींच्या माध्यमातून ही समस्या होऊ शकते.

The post वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी अशी सोडवा ‘इरेक्शन’ची समस्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125230
चांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास https://policenama.com/sleeping-deficiency-can-be-harmful-blood-pressure/ Mon, 10 Jun 2019 09:15:00 +0000 https://policenama.com/?p=125214 blood-pressure
blood-pressure

पोलीसनामा ऑनलाइन टीम –झोप आणि रक्तदाब यांचा थेट संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यासाठी रात्री उत्तम झोप ही किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. झोपेच्या वेळाही बदलल्या असल्याने त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर दिसून येतात. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोप घेणे गरजेचे आहे. कमी […]

The post चांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
blood-pressure
blood-pressure
पोलीसनामा ऑनलाइन टीमझोप आणि रक्तदाब यांचा थेट संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यासाठी रात्री उत्तम झोप ही किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. झोपेच्या वेळाही बदलल्या असल्याने त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर दिसून येतात. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोप घेणे गरजेचे आहे. कमी झोप घेणे किंवा पुरेशी झोप घेणे याचा संबंध थेट ब्लड प्रेशरशी आहे.
यापूर्वी झोप आणि ब्लड प्रेशर याचा काही संबंध असल्याचे माहित नव्हते, मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनातून ते उघड झाले आहे.
हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की, अनेक आजार आहेत ज्यांचां थेट संबंध झोपेशी असतो. यासाठी आम्ही झोप ब्लड प्रेशरला कशी कंटोल करते हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. या संशोधनात शास्त्रज्ञांच्या पथकाने ३०० लोकांच्या समूहाला एकत्र आणले होते. या समूहात २१ ते ७० वयोगटातील पुरूष आणि महिलांचा समावेश होता. यातील कुणालाही हार्टसंबंधी काही समस्या असू नये याची काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनाच दोन दिवस पोर्टेबल ब्लड प्रेशर कफ देण्यात आला.
या कफच्या माध्यमातून दररोज ४५ मिनिटाच्या अंतराने ब्लड प्रेशरचे रीडिंग घेण्यात आले. या सहभागी लोकांनी रात्रभर रिस्ट वॉचप्रमाणे एक्टिग्राफी (झोपेची गुणवत्ता मोजणारे यंत्र) घातले होते. या यंत्राने त्यांच्या झोपेची गुणवत्ता मोजली गेली. तसेच जे लोक चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते, असे आढळले. यातून हे स्पष्ट झाले की, जे लोक पुरेशी झोप घेऊ शकले नाहीत किंवा चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते. एका रात्रीची पूर्ण आणि चांगली झोप ब्लड प्रेशरला नियंत्रित करू शकते, हेदेखील या प्रयोगातून सिद्ध झाले. नव्या संशोधनात कमी झोप घेणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब असल्याने होणाऱ्या समस्यांची शक्यता सांगितल्या आहेत. स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट संबंधी समस्या वाढून मृत्युचा धोका वाढण्यासंबंधी शक्यताबाबत माहिती देण्यात आली आहे. 

The post चांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125214
धक्कादायक ! बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने १९ मुलांचा मृत्यू https://policenama.com/died-due-to-encephalitis-in-muzaffarpur/ Mon, 10 Jun 2019 08:00:58 +0000 https://policenama.com/?p=125163 Syndrome
Syndrome

तिरुवनंथपुरम : वृत्तसंस्था– केरळात निपाहने पुन्हा तोंड वर काढलेले असताना आता बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (आयईएस) या आजाराने तब्बल १९ मुलांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मागील पाच दिवसांत या आजाराने येथे थैमान घातले आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात १५ तर अन्य खासगी रुग्णालयांमध्ये ४ मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलांवर उपचार सुरू असल्याचे येथे […]

The post धक्कादायक ! बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने १९ मुलांचा मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Syndrome
Syndrome

तिरुवनंथपुरम : वृत्तसंस्था– केरळात निपाहने पुन्हा तोंड वर काढलेले असताना आता बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (आयईएस) या आजाराने तब्बल १९ मुलांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मागील पाच दिवसांत या आजाराने येथे थैमान घातले आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात १५ तर अन्य खासगी रुग्णालयांमध्ये ४ मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलांवर उपचार सुरू असल्याचे येथे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने २२ मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याचे लोकांनी सांगितले. २०१४ पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस आजाराने ग्रस्त ३८ मुलांना दाखल करण्यात आले. अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या आजाराने १९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी दिली.

इन्सेफेलाईटिसची लक्षणे
हा आजार पाच ते दहा वयोगटातील मुलांना होतो. ताप येणे, डोकं दुखणे, अशक्तपणा येणे, उलट्या होणे, भूक न लागणे, अतिसंवेदनशील होणे ही या आजाराची लक्षणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अशी घ्या काळजी
या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. अस्वच्छ पाण्यापासून दूर राहावे, आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. मच्छारांचा उपद्रव असल्यास त्यावर उपाययोजना करावी.

The post धक्कादायक ! बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने १९ मुलांचा मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125163
बंदी असतानाही शाळांच्या परिसरात खुलेआम तंबाखू विक्री https://policenama.com/tobacco-free-campaign-school/ Mon, 10 Jun 2019 07:31:13 +0000 https://policenama.com/?p=125150 tobaco-ban
tobaco-ban

पोलीसनामा ऑनलाइन टीम-मुंबई एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये छोट्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळा परिसरापासून १०० मीटर यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असूनदेखील शाळांच्या बाहेर राजरोस तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसते. राज्यभरात सर्वत्र हिच परिस्थिती आहे. लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लावल्यास बाल […]

The post बंदी असतानाही शाळांच्या परिसरात खुलेआम तंबाखू विक्री appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
tobaco-ban
tobaco-ban

पोलीसनामा ऑनलाइन टीम-मुंबई एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये छोट्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळा परिसरापासून १०० मीटर यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असूनदेखील शाळांच्या बाहेर राजरोस तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसते. राज्यभरात सर्वत्र हिच परिस्थिती आहे. लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लावल्यास बाल न्याय कायदा (काळजी आणि संरक्षण) कलमान्वये ६ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी मुलांना तंबाखूचे व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावणार
तंबाखू सेवनाच्या व्यसनामुळे मुलांना कॅन्सरसारखा गंभीर होऊ शकतो. याची दखल घेत सरकारने शाळेच्या परिसरात १०० यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याचे फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचा निर्णय सध्या घेतला आहे. मुलांमधील तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत असल्याने शाळांपासूनच तंबाखूमुक्ती मोहीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात आणि मुलांना तंबाखूमुक्त वातावरण असावे यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबवले जाणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा जीआर काढला आहे. या अभियानात तंबाखूमुक्तीसाठी काम करणाऱ्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनची मदत घेतली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सर्व शाळांना पाठवले आहे. या अभियानात सहभागी होण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
शासनाच्या परिपत्रकातील ठळक मुद्दे
सरकारी परिपत्रकात नमूद केल्यानुसार, शाळेच्या परिसरात १०० यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याचे फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावेत. मुलांनी तंबाखूचं व्यसन करू नये यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनाची बंदी असल्याची नोटीस काढावी. ही नोटीस सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व्यवस्थापन समिती यांना वाचून दाखवावी. धूम्रपान आणि तंबाखू सेवन करणे गुन्हा आहे हे विद्यार्थ्यांना सांगणारे फलक शाळेत महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. शाळेत डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे चर्चासत्र ठेवून त्यात तंबाखू आणि त्यामुळे होणारा कॅन्सर याबाबत माहिती द्यावी. दंत चिकित्सकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मुख तपासणी करून घ्यावी. शाळेतील जे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तंबाखू नियंत्रणासाठी काम करत आहेत त्यांचा सत्कार करावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

The post बंदी असतानाही शाळांच्या परिसरात खुलेआम तंबाखू विक्री appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125150
लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदार राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान ! https://policenama.com/challenge-to-congress-to-keep-traditional-voters/ Tue, 02 Apr 2019 08:46:29 +0000 https://policenama.com/?p=101658 congress
congress

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -(मल्हार जयकर) – अखेर काँग्रेसचा पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार जाहीर झाला. मोहन जोशी यांना ही उमेदवारी जाहीर झालीय. पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं सतत काँग्रेसचाच खासदार निवडून येत असे. फक्त एकदाच समाजवादी काँग्रेसच्या छुप्या पाठींब्यानं भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. त्यानंतर जनता पक्षाची […]

The post लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदार राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
congress
congress

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -(मल्हार जयकर) – अखेर काँग्रेसचा पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार जाहीर झाला. मोहन जोशी यांना ही उमेदवारी जाहीर झालीय. पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं सतत काँग्रेसचाच खासदार निवडून येत असे. फक्त एकदाच समाजवादी काँग्रेसच्या छुप्या पाठींब्यानं भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. त्यानंतर जनता पक्षाची लाट, आणि नरेंद्र मोदींची लाट या काळातच विरोधीपक्षाचे खासदार निवडून आले. कोणतीही लाट नसेल आणि सरळ जरी लढत झाली तर काँग्रेसचाच खासदार निवडून येतो. हे सिद्ध झालंय. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसला सक्षम नेतृत्वच लाभलेलं नाही. राहुल गांधींची आक्रमकता, प्रियांका वाद्रा यांचं पक्षांत झालेलं आगमन यामुळं कार्यकर्त्यांत सध्या उत्साह संचारलाय. त्यामुळेच उमेदवार जाहीर झाला नसतानाही प्रचार कार्यकर्त्यांनी सुरू केलाय! कार्यकेत्यांनी विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. इच्छुकांमध्ये प्रामुख्यानं अभय छाजेड, प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे यांची नावं घेतली गेली. दरम्यान भाजपचे राज्यसभेतले सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी थेट राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसच्या वतीनं लोकसभा लढविण्याचा चालविलेला प्रयत्न, यामुळं सध्या तरी या चौघांची नावं चर्चेत होती, पण पक्षश्रेष्ठींनी मोहन जोशींना उमेदवारी दिलीय.

काँग्रेसपक्ष आणि शहराच्या राजकारणावर स्वातंत्र्योत्तर काळात बाबुराव सणस यांचं वर्चस्व होतं. त्यानंतर पक्षाची आणि महापालिका राजकारणाची सूत्रं ही शिवाजीराव ढेरे यांच्याकडं आली त्यांच्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे ती आली. त्यांनी प्रकाश ढेरे यांना नेमून आपलं राजकारण शहरांत केलं. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं सुरेश कलमाडी यांनी उचल खाल्ली आणि पक्षाचा ताबा घेतला. त्यांनी त्यावर जबरदस्त वर्चस्व गाजवलं. यावेळी मोहन जोशी कलमाडी यांच्यामागे भक्कमपणे उभे होते. कॉमनवेल्थ प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर कलमाडी यांना पक्षातून निलंबित केलं गेलं. शहरातला काँग्रेस पक्ष विस्कळीत झाला, नेतृत्वहीन बनला. तो आजतागायत सुस्थिर झालेला नाही. गटबाजींनी पोखरलेली काँग्रेस असंच त्याचं स्वरूप राहिलं आहे. सध्याचे शहराध्यक्ष हे कलमाडी यांचे खंदे समर्थक असले तरी ते गतवैभव पक्षाला अद्याप मिळालेलं नाही. मोहन जोशींच्या उमेदवाराने काँग्रेस भवनात पुन्हा ‘जान’ आलीय. सारी मरगळ उडून गेलीय.

मोहन जोशी हे शहराच्या राजकारणात एक वजनदार नाव आहे. युवक काँग्रेसचा साधा कार्यकर्ता ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचा प्रांताध्यक्ष अशी त्यांची गाजलेली कारकीर्द आहे. जनता पक्षाच्या राजवटीत प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या मोटारीसमोर रस्त्यावर आडवं पडून केलेलं आंदोलन, याच काळात समाजवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेलं काँग्रेस भवन महिलाध्यक्षा ऍड. शालिनी राणे यांच्या मदतीने काँग्रेस भवनाचा ताबा इंदिरा काँग्रेससाठी जोशींनी घेतला त्यामुळं काँग्रेस भवन हे काँग्रेसकडं राहीलं. अशी अनेक आंदोलनं जोशींनी केली आहेत. सतत कार्यकर्त्यांत वावरणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून २००८ ते २०१४ दरम्यान त्यांनी काम केलं आहे. शिवाय दिल्लीतील अनेक वरिष्ठांशी त्यांचे संबंध आहेत. मोहन जोशींनी विठ्ठल तुपे, प्रदीप रावत या तिरंगी लढतीत रावतांचा विजय झाला असला तरी काँग्रेसचे उमेदवार म्हणून दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन जबरदस्त लढत दिलेली आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.

शहर लोकसभा मतदारसंघात मोहन जोशी-गिरीश बापट अशी सरळ लढत होईल. गेली अनेक वर्षे भाजपची शहरात अडीच लाख मतं ही त्यांच्या हक्काची होती. मोदी लाटेत त्यात दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळं इथं भाजपची उमेदवारी ज्याला मिळेल तो निवडून येण्याची शक्यता असल्यानं भाजपत इच्छुकांची संख्या मोठी होती. पण पुण्याची खासदारकी खेचून आणून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करू अशी काँग्रेसी कार्यकर्त्यांची जिद्द आहे.

The post लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदार राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
101658
मनसेच्या शहराध्यक्षांची राजकीय अपरिपक्वता ! https://policenama.com/mns-city-presidents-political-immaturity/ Mon, 01 Apr 2019 08:49:24 +0000 https://policenama.com/?p=101276 mns
mns

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन (मल्हार जयकर) – मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांचा पराभव करा अशी पक्षाची भूमिका पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर केली असताना पुण्यातील मनसेच्या शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रक काढून भाजपला म्हणजेच मोदी-शहा यांना पूरक अशी भूमिका घेतलीय. त्यांची ही पत्रकबाजी म्हणजे राजकीयदृष्ट्या अपरिपक्वताच म्हटली पाहिजे. असं मत मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने पोलिसनामाशी बोलताना […]

The post मनसेच्या शहराध्यक्षांची राजकीय अपरिपक्वता ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
mns
mns

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन (मल्हार जयकर) – मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांचा पराभव करा अशी पक्षाची भूमिका पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर केली असताना पुण्यातील मनसेच्या शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रक काढून भाजपला म्हणजेच मोदी-शहा यांना पूरक अशी भूमिका घेतलीय. त्यांची ही पत्रकबाजी म्हणजे राजकीयदृष्ट्या अपरिपक्वताच म्हटली पाहिजे. असं मत मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने पोलिसनामाशी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, पक्षसंघटनेकडे नेहमीच दुर्लक्ष करणारे मनसेचे शहरप्रमुख कधी नव्हे ते वृत्तपत्रात झळकले. त्यांनी मनसेची लोकसभेतील भूमिका पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आधी जाहीर करून टाकली. वास्तविक मनसेची लोकसभा निवडणुकीत भूमिका काय असेल याची थोडी कल्पना राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दिली होती, ती ‘मोदी आणि शहा’ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राज्यातल्या त्या त्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवाराच्या पाठीशी मनसैनिकांनी उभं राहायचं, असं सांगितलं होतं. मात्र पुण्यात मोदी-शहांचा उमेदवार असलेल्या गिरीश बापट यांच्या विरोधात सध्यातरी काँग्रेसचा उमेदवारच तुल्यबळ असणार आहे, हे स्पष्ट आहे. मग प्रवीण गायकवाड असो नाहीतर अरविंद शिंदे असो. त्यांनाच पाठींबा मनसैनिकांना द्यावा लागणार आहे. अशावेळी मनसैनिकांनी काय करायचं हे शहराध्यक्ष शिंदे यांनी सांगायला हवं होतं. पण त्यांनी तसं न करता काँग्रेसजनांना बोधामृत पाजलंय! काँग्रेसनं मनसेचे नाव घेऊ नये, असं त्यांना बजावलं. त्यामुळं मनसैनिकांच्या मनाचा गोंधळ उडालाय. नेमकी काय आणि कोणती भूमिका घ्यावी हे समजेनासे झालंय. राजसाहेबांचं ऐकायचं की शहराध्यक्ष यांचं?

मनसेची राजकीय विचारसरणी आणि लोकसभेसाठीची भूमिका ही शहराध्यक्ष शिंदे यांना समजलेलीच दिसत नाही. आपल्या नेहमीच्या भाजपपुरक भूमिका घेण्याचा मानसिकतेतुन हे पत्रक त्यांनी काढले असावे अशी टीका करून हे मनसेचे माजी पदाधिकारी म्हणाले, ‘मनसेच्या स्थापनेपासून आजतागायत प्रत्येकवेळी विचारपीठावर नेहमी छत्रपती शिवरायांबरोबरच प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा असतात. या सर्वांच्या पुरोगामी विचारांची बांधिलकी प्रारंभीच्या काळात मनसेनं स्वीकारली होती. मध्यंतरीच्या काळात वैचारिकदृष्ट्या दूर गेलेल्या राजसाहेब ठाकरे यांनी पुन्हा आपलं इंजिन रुळावर आणलंय आणि भाजपला विरोध केलाय! ही राजसाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि भूमिका पुण्याच्या मनसेच्या शहराध्यक्षांना समजलेलीच दिसत नाही. त्यांनी आपली निष्ठा मनसे, राजसाहेब ठाकरे यांच्याऐवजी भाजपेयींशी असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय! अद्यापि मतदारसंघातील उमेदवार ठरलेले नाहीत, कोण निवडणुकीच्या रिंगणात आहेत? कुणाशी लढत आहे, मोदी-शहा यांच्या विरोधात तुल्यबळ कोण आहे? हे स्पष्ट झालेलं नाही. अशावेळी मनसेच्या शहरप्रमुखांनी पत्रक काढून भूमिका सांगणं ही राजकीय अपरिपक्वताच म्हणायला हवी!

राजसाहेब ठाकरे हे येत्या ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मराठी नववर्षानिमित्त शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत कुणाचा प्रचार करायचा, कसा करायचा हे सांगणार आहेत. त्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तसे निमंत्रण ठाकरे यांनी पवारांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले आहे. त्यामुळं या मेळाव्याकडे मनसैनिकांबरोबरच राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

The post मनसेच्या शहराध्यक्षांची राजकीय अपरिपक्वता ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
101276
विधानसभा निवडणुकीत शरद पवार-राज ठाकरे एकत्र येणार ! https://policenama.com/sharad-pawar-and-raj-thakrey-will-be-get-together/ Fri, 22 Mar 2019 06:40:46 +0000 https://policenama.com/?p=98145 sharad pawar and raj thackeray
sharad pawar and raj thackeray

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (हरीश केंची) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आणि भाजप-मोदी-शहा यांचा पराभव करण्याचा निर्धार व्यक्त केला. या त्यांच्या निर्धारात राज्यात आकाराला येणाऱ्या नव्या युतीची बीजे आहेत. मनसेचा येत्या ६ तारखेला मराठी नववर्षानिमित्त मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे शरद […]

The post विधानसभा निवडणुकीत शरद पवार-राज ठाकरे एकत्र येणार ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sharad pawar and raj thackeray
sharad pawar and raj thackeray

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (हरीश केंची) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आणि भाजप-मोदी-शहा यांचा पराभव करण्याचा निर्धार व्यक्त केला. या त्यांच्या निर्धारात राज्यात आकाराला येणाऱ्या नव्या युतीची बीजे आहेत. मनसेचा येत्या ६ तारखेला मराठी नववर्षानिमित्त मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेनंतर होणाऱ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-मनसे अशी युती होणार आहे. त्याचे संकेत या मेळाव्यात दिसून येतील. मराठीच्या मुद्द्यावर पूर्वी बाळासाहेब ठाकरे-शरद पवार हे एकत्र आले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती होतेय. ठाकरे-पवार त्याच शिवतीर्थावर एकत्र येत आहेत.

राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुका प्रत्यक्षपणे न लढविता मनसैनिकांनी भाजप, नरेन्द्र मोदी, अमित शहा यांच्याविरोधात काम करा असा थेट आदेश दिला आहे. त्याचा अप्रत्यक्ष अर्थ हा काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असाच होतो. मराठी प्रसिद्धीमाध्यमांनी २०१४ च्या निवडणुकीनंतर ‘मोदी लाटेत मनसेचे सर्वत्र डिपॉझिट जप्त’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु मोदीलाटेतही अनेक लोकसभा मतदारसंघात लाख-सव्वालाख ते ८०-९० हजार मतं पडली होती. सफॉलोजीच्यादृष्टीने याचा अर्थ असा होतो की, मनसेनं स्वतःची आपली मतदारपेटी हळुवारपणे निर्माण केलीय. ज्यांच्यावर मोदीलाटेचा काहीच प्रभाव झाला नाही. मनसेची हीच मतं आणि जी मतं २०१४ मधील निवडणुकीत मोदीलाटेमुळे सेना-भाजपकडे वळली होती, पण सेना-भाजपच्या सत्ता काळाचा अनुभव पाहून पुन्हा मनसे किंवा त्यांच्या अप्रत्यक्ष सहयोगी मित्रांकडे वळल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला साहजिकच होणार आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज ठाकरे विधानसभा मतदारसंघात दौरे करतील आणि पक्षाच्या मतदारांच्या संपर्कात राहतील. ज्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल.

sharad-pawar-&-Raj-Thackeray

काँग्रेस, हिंदी भाषकांचा दबाव ठोकरणार
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा, राजकारणाचा विचार करता, असं लक्षांत येईल की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राज्यात नावपुरताच राहिला आहे. त्यांच्या स्थानिक नेतृत्वाचा राज्यभरात काडीचाही उपयोग होताना दिसत नाही. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. मात्र ते राज्यात काँग्रेसपक्षाच्या जाळ्यात अडकल्याने त्यांचा पक्षविस्तार खुंटला आहे. त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षासोबत राज्यात अजून काही वर्षे नाईलाजाने चिकटून राहिल्यास राष्ट्रवादीचं भवितव्यही अवघड आहे. त्यात राज्यात काँग्रेसकडं चेहराच नाही. राज्यातील मतदार राहुल गांधी किंवा सध्याच्या गांधी परिवाराकडे आकर्षित होत नाहीत. शिवाय उत्तर भारतीय समाजाचा कांगावा करत काँग्रेस पक्ष स्वतःसोबत राष्ट्रवादीला देखील पुढं जाऊ देत नाही. वास्तविक राष्ट्रवादी पक्षाचा उत्तरप्रदेशात काहीच राजकारण नाही. बिहारमधील राष्ट्रवादी नेते तारिक अन्वर यांनी देखील पक्षाला रामराम केल्यानं तिथंही पक्षाला काहीच अस्तित्व नाही. त्यामुळं या हिंदीपट्ट्यातील मतांचा राष्ट्रवादीला कसलाच फायदा नाही. सध्या राष्ट्रवादीला महाराष्ट्र आणि गोव्याच्या राजकारणात भविष्य आहे. त्यामुळं शरद पवारांनी विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी मोहरा स्वतःकडे खेचून विधानसभेच्यावेळी मोठा राजकीय भूकंप घडविण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या जास्तीतजास्त ४-५ जागा निवडून येतील असं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील काँग्रेसचं दखल घ्यावी असं महत्व राहणार नाही. हे शरद पवारांनी अचूक ओळखलं आहे त्यामुळं त्यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचलं आहे.

इतर छोट्या पक्षांना सोबत घेणार
या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा आकडा १०-१२ पर्यंत नेऊन दिल्लीत पक्षाचं स्थान मजबूत करण्याची योजना पवारांनी आखली आहे. त्यानंतर २-४ महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवतील असं सध्याचं वातावरण आहे. या नव्या युतीचा अनौपचारिक शुभारंभ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात होईल. या मेळाव्यात शरद पवार यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मेळाव्याचं निमंत्रण दिलंय. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासारखे धुरंधर राजकारणी एकाच व्यासपीठावर येऊन प्रचार करू लागले तर ग्रामीण आणि शहरी भागात कमीतकमी १०० जागा जिंकणं सहजशक्य आहे. त्यानंतर इतर लहान पक्षांना तसेच अपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याची वेगळीच गणितं शरद पवार राज ठाकरे यांच्यासोबत आखत आहेत. असं राज्यातल्या आगामी राजकारणाचं चित्र असेल!

ग्रामीणभागात राष्ट्रवादी तर शहरात मनसे
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात महत्वाचा असला तरी महत्वाच्या मुंबई महापालिका, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रबळ बनण्यासाठी राज ठाकरेंसोबत भविष्यातील रणनीती आखताना दिसत आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राज ठाकरे जातात तर अजित पवार हे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर जातात याला एक वेगळाच राजकीयदृष्ट्या संदर्भ आहे तो इथं घेतला पाहिजे. त्यामुळं उत्तरभारतीयांच्या मुद्द्यापेक्षा मराठीचा मुद्दा राष्ट्रवादी पक्षाला भविष्यात अधिक फायद्याचा ठरणारा आहे. राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा अनेकांना चुकीचा वाटत असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादीसाठी खूप फायद्याचं ठरणारं आहे हे निश्चित !

The post विधानसभा निवडणुकीत शरद पवार-राज ठाकरे एकत्र येणार ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
98145
आजोबा….आता रिटायर व्हाच ! https://policenama.com/grandfather-now-retire/ Wed, 20 Mar 2019 11:42:58 +0000 https://policenama.com/?p=97570 Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (मल्हार जयकर) – ‘आ ई रिटायर होते’ असं एक नाटक काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर खूप चाललं होतं. भक्तीचा हा प्रभाव होता. म्हणजे भक्ती बर्वे आणि मराठी माणसाची मातृभक्ती. ‘नाटक छान होतं. खूप खूप रडायला येतं,’ असं कौतुकानं सांगणारा उदंड प्रेक्षक असल्यावर कुठलीही आई थोडंफार यश पदरात बांधून घेणारच! या ‘आई […]

The post आजोबा….आता रिटायर व्हाच ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (मल्हार जयकर) – ‘आ ई रिटायर होते’ असं एक नाटक काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर खूप चाललं होतं. भक्तीचा हा प्रभाव होता. म्हणजे भक्ती बर्वे आणि मराठी माणसाची मातृभक्ती. ‘नाटक छान होतं. खूप खूप रडायला येतं,’ असं कौतुकानं सांगणारा उदंड प्रेक्षक असल्यावर कुठलीही आई थोडंफार यश पदरात बांधून घेणारच! या ‘आई रिटायर होते’ नाटकावर मला काही लिहायचं नाही, पण एक आजोबा आता रिटायर का होत नाहीत? असा प्रश्न मला पडलाय. बरंच कर्तृत्व गाजवून झालंय, मुलं विविध क्षेत्रात नावांजलीत, आपल्या विचारानं आचार करू लागली. परिवार चांगला फळफळला, पण आजोबांना स्वस्थ बसवत नाही. आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सांगितलाय. आजोबा मात्र उगाचच बाळसं आल्यासारखं दाखवत मुलांच्याच पायात लुडबुड करत आहेत. वयोपरत्वे आजोबांचे काही निर्णय चुकताहेत असं दिसून येतंय. ज्यांनी आजोबांच्या कुटुंबाला आपलं मानलं, त्यांच्या वाढविस्ताराला हातभार लावला त्या कौटुंबिक संबंधाची जाणीव न ठेवता आजोबांनी त्या कुटुंबातील नातवांना दूर लोटलंय! याने केवळ या घराण्यांचंच नव्हे तर राजकीय पक्षाचं, वैचारिक बांधिलकीचं आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालंय. मात्र आजोबांना त्याची जाणीव झालेली नाही. त्यामुळं आता आजोबांना सांगावं लागतं.. आजोबा, बस्स झालं….आता रिटायर व्हाच…!!

नातवांना जातीयवाद्यांचे भोई व्हावं लागलं’
जातीयवादी गिधाडं गावाच्या वेशीबाहेरच अडवा…. त्यांना गावात येऊ देऊ नका!’ असा पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांनी रुजवला त्या आजोबांनीच आता आपल्या निर्णयांनी नातवांवर त्या ‘जातीयवादी गिधाडां’च्या पालखीचे भोई होण्याची वेळ आणलीय. महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदार अशा विखेपाटील आणि मोहितेपाटील घराण्यातील नातवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. याला कारणीभूत ठरले आहेत ते आजोबा शरद पवारसाहेब…!

विखेपाटील नातवासमोर अडचणी उभ्या केल्या
नगर जिल्ह्याचे बाळासाहेब विखेपाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे शंकरराव मोहितेपाटील या घराण्यांचे बारामतीच्या शरद पवार घराण्याचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. शरदरावांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार हे प्रारंभी विखेपाटीलं यांच्या साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यावेळी शरदराव यांचं तिकडे सतत येणं जाणं होतं. त्यामुळे बाळासाहेब विखेपाटीलांशी त्यांचे प्रारंभीच्या काळात मैत्रीचे, सलोख्याचे संबंध होते. वैचारिक जडणघडण सारखीच होती. जातीयवादी विचारांना त्यांचा विरोध होता. पण नंतरच्या काळात राजकीय महत्वाकांक्षी स्वभावाने ते संबंध दुरावले. नंतर ते टोकाचे बनले! दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात शरदआजोबांनी घेतलेल्या निर्णयाने अखेर विखेपाटीलांच्या नातवाला डॉ. सुजयला भाजपनं आपल्याकडं ओढलं.

मोहितेपाटील नातवाची गोची केली 
सोलापूर जिल्ह्याच्या मोहितेपाटील घराण्याशीही पवारांचे आत्मीयतेचे संबंध होते. शंकरराव मोहितेपाटील यांच्या साखर कारखान्यातही काही काळ आप्पासाहेब पवार हे व्यवस्थापकीय संचालक होते. शिवाय बारामतीपासून अकलूज खूपच जवळ असल्यानं शरदरावांचं तिथं अनेकदा जात येत, त्यातूनच विजयसिंह मोहितेपाटील यांच्याशी मैत्रीही झालेली. शंकरराव मोहितेपाटील यांचे संघाच्या लोकांशी संपर्क होता पण त्यांनी कधी त्यांना अकलूजमध्ये थारा दिलेला नव्हता. पण शरदआजोबांच्या निर्णयामुळे त्यांच्याही नातवाला रणजितसिंहाला भाजपेयीं व्हावं लागलं.

नवख्या पार्थला मतदारांसमोर उभं केलं
आजोबांनी मावळ मतदारसंघातही असाच घोळ घातला. आपला नातू पार्थ याला आधीपासूनच तयारी करायला सांगितली. नंतर मात्र आपण स्वतः माढा मतदारसंघातुन उभं राहणार असल्यानं पवार कुटुंबातून केवळ एकच जण उभं राहिलं असं सांगत पार्थला उमेदवारी नाकारली. पण अजित पवारांनी पार्थची उमेदवारी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला अखेर नाईलाजानं त्यांनाच निवडणुकीतून माघार घ्यावी लागली अन पार्थला उमेदवारी देण्याची नामुष्की ओढवली. शरदआजोबांच्या या चुकलेल्या निर्णयानं सुजय आणि रणजितसिंह यांना भाजपला जवळ करावं लागलं. तर पार्थसारख्या नवख्या नातवाला निवडणुकीच्या राजकारणात ढकलावं लागलं.

चुकीच्या निर्णयानं भाजपला पायघड्या
शरद पवारांवर त्यांची आई शारदाबाई पवार यांचे संस्कार झालेले आहेत. त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची विचारसरणी ही पुरोगामी होती. मूल्याधिष्ठित राजकारण हे शारदाबाई पवारांचं जीवनध्येय होतं. हे सारं पाहूनच शरद पवार घडले. महाराष्ट्र हा शरद पवारांकडे पुरोगामी नेता म्हणूनच ओळखतो. त्यामुळंच महाराष्ट्रातला तरुण त्यांच्याकडे आकर्षिला गेला. रा.स्व.संघाचं मुख्यकेंद्र महाराष्ट्रात असलं तरी महाराष्ट्रात तो विचार फारसा रुजला नाही. पण सध्या त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून होताना दिसतोय. त्यांच्या सध्याच्या काही निर्णयामुळे राज्यातल्या अनेकांना भाजपेयीं होण्यास भाग पाडले गेले आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकांनी जातीयवादी विचार स्वीकारला. आता या नातवांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तो आजोबांच्या चुकीच्या निर्णयामुळे! तेव्हा आजोबा, आता आपलं राजकारण बस्स झालं…. आता रिटायर व्हा…!!

The post आजोबा….आता रिटायर व्हाच ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
97570