क्राईम स्टोरी – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Tue, 23 Apr 2019 17:37:39 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 क्राईम स्टोरी – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 158698162 २० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात https://policenama.com/sarpanch-caught-red-hand-while-taking-twenty-thousand-rupees-bribe/ Tue, 23 Apr 2019 17:37:39 +0000 https://policenama.com/?p=108574 लाच
लाच

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावच्या सरपंचाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. धर्मराज गोपाळ राठोड (वय ४६ पद – सरपंच, हत्तुर गाव, रा हत्तुर, ता दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ६१ वर्षीय तक्रारदाराने अन्टी करप्शनकडे […]

The post २० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
लाच
लाच

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावच्या सरपंचाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

धर्मराज गोपाळ राठोड (वय ४६ पद – सरपंच, हत्तुर गाव, रा हत्तुर, ता दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ६१ वर्षीय तक्रारदाराने अन्टी करप्शनकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांची हत्तुर गाव शिवारात बिगरशेती प्लॉट आहे. त्यांना त्याचा व्यावसायिक हेतूसाठी वापर कारायचा होता. त्यावेळी त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी सरपंच राठोड याने त्यांना २० हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी यासंदर्भात अँटी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने त्याला सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले.

The post २० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108574
‘त्या’ प्रकरणात चंदा कोचर यांना हजर राहण्याचे समन्स https://policenama.com/icici-videocon-case-summons-appear-ed-chanda-kochhar-and-deepak-kochhar/ Tue, 23 Apr 2019 17:02:27 +0000 https://policenama.com/?p=108566

मुंबई  : वृत्तसंस्था – आयसीआयसीआय – व्हिडीओकॉनप्रकरणी चंदा कोचर यांना ३ मे रोजी सक्तवसूली संचलनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे वेणूगोपाल धूत यांना आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर यांनी ३ हजार […]

The post ‘त्या’ प्रकरणात चंदा कोचर यांना हजर राहण्याचे समन्स appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई  : वृत्तसंस्था – आयसीआयसीआय – व्हिडीओकॉनप्रकरणी चंदा कोचर यांना ३ मे रोजी सक्तवसूली संचलनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत.

व्हिडीओकॉन समुहाचे वेणूगोपाल धूत यांना आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर यांनी ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज बेकायदा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इडीने गेल्या काही महिन्यांपुर्वी धूत आणि चंदा कोचर यांच्या घराची झडती घेतली होती. मागील महिन्यात त्यांच्या तपासाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आता ३ मे रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. तसेच त्यांचे पती आणि दीर यांना ३० मे रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.

The post ‘त्या’ प्रकरणात चंदा कोचर यांना हजर राहण्याचे समन्स appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108566
खंडाळा जमीन प्रकरण : लकडवालाशी कनेक्शन असलेल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बेड्या https://policenama.com/land-acquisition-officer-arrested-in-connection-with-yusuf-lakadwala/ Tue, 23 Apr 2019 15:57:10 +0000 https://policenama.com/?p=108550 अटक
अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खंडाळ्यातील ५० कोटी रुपयांची बेवारस जमीन बळकाण्याच्या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूमी अभिलेख विभागातील एका अधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक लकडवालाने या जमीनीसाठी तब्बल साडेअकरा लाख रुपये सरकारी अधिकाऱ्याला व दलालाला देण्यासाठी खर्च केले. भूमी अभिलेखमधील अधिकारी […]

The post खंडाळा जमीन प्रकरण : लकडवालाशी कनेक्शन असलेल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बेड्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
अटक
अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खंडाळ्यातील ५० कोटी रुपयांची बेवारस जमीन बळकाण्याच्या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूमी अभिलेख विभागातील एका अधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक लकडवालाने या जमीनीसाठी तब्बल साडेअकरा लाख रुपये सरकारी अधिकाऱ्याला व दलालाला देण्यासाठी खर्च केले.

भूमी अभिलेखमधील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापुर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने युसुफ लकडवाला आणि शौकल घौरी यांना अटक केली आहे.

युसुफ लकडवाला याने ही जमीन बळकावण्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपये खर्च केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने बनावट डीडी आणि करारपत्र तयार करून जमीन कशी बळकावता येईल. बनावट कागदपत्रे कशी तयार करता येतील, अशा पळवाटा भूमी अभिलेखचा अधिकारी ढेकळे याने सांगितल्या होत्या. त्यानंतर यासाठी लकडवालाने गुप्ताला १ कोटी, घोरीला दीड कोटी, तर मोहन नायर याला ४ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यात सर्वात मोठा वाटा ५ कोटी रुपये ढेकळे याला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान नायर तेव्हापासून पसार आहे.

The post खंडाळा जमीन प्रकरण : लकडवालाशी कनेक्शन असलेल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बेड्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108550
खळबळजनक ! पुण्यात बोगस मतदान, गुन्हा दाखल https://policenama.com/loksbha-fir-registered-in-maeket-yard-police-station-for-bogus-voting-in-pune/ Tue, 23 Apr 2019 15:18:24 +0000 https://policenama.com/?p=108534 fir
fir

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नी मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या आधी कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान करून गेले होते. त्यानंतर […]

The post खळबळजनक ! पुण्यात बोगस मतदान, गुन्हा दाखल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
fir
fir

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नी मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या आधी कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान करून गेले होते. त्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिनेश अगरवाल यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली. पुणे लोकसभा मतदार संघातील बिबवेवाडीतील बुथ क्रमांक २८७ कामगार राज्य विमा महामंडळ पंचदीप भवन येथे सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिक येत होते. त्यावेळी सकाळी आठ वाजता दिनेश अगरवाल व त्यांच्या पत्नी असे दोघे मतदान करण्यासाठी बुथवर गेले. त्यावेळी त्यांना निवडणूक कर्मचाऱ्याने त्यांच्या नावावर मतदान झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पुन्हा पडताळणी केली. तेव्हा त्यांच्या नावावर कुणीतरी आधीच मतदान करून गेले होते. अगरवाल यांना मतदानाचा हक्क त्यामुळे बजावता आला नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात मार्केट यार्ड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

The post खळबळजनक ! पुण्यात बोगस मतदान, गुन्हा दाखल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108534
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे अटकेत https://policenama.com/lcb-pune-rural-police-arrested-three-for-theft-of-mobile-tower-batteries/ Tue, 23 Apr 2019 15:03:36 +0000 https://policenama.com/?p=108518

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १४ बॅटरी चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. इकबाल मनुलाल शेख, इम्तियाज कदीर शेख, सचिन दिलीप सपाटे (रा. कसबा पेठ) अशी तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात थेऊर […]

The post मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे अटकेत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १४ बॅटरी चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

इकबाल मनुलाल शेख, इम्तियाज कदीर शेख, सचिन दिलीप सपाटे (रा. कसबा पेठ) अशी तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात थेऊर गावातील जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरमधून ६ बॅटरी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यावेळी पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इक्बाल शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इम्तियाज आणि सचिन यांच्याशी संगनमत करुन ग्रामीण भागातील मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

चोरट्यांकडून ४ बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी भीमा-कोरेगाव, थेऊर, लोणीकंद, चिखली, ताथवडे, भवानी पेठ, निगडी, हडपसर, कुंजीरवाडी, तळवडे, खराडी, ताथवडे आणि सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातील मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने केली.

The post मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे अटकेत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108518
जमिनीच्या व्यवहारात फसवणूक : माजी नगरसेवक कोऱ्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल  https://policenama.com/cheating-in-land-deal-former-corporator-korhale-against-case/ Tue, 23 Apr 2019 14:53:23 +0000 https://policenama.com/?p=108528 fraud
fraud

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एका जमिनीसाठी पैसे घेऊन ती दुसऱ्याला विकली, त्यानंतर दूसरी जमीन घेऊन देतो असे सांगून एका डॉक्टरची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत कोऱ्हाळे यांच्यासह नऊ जणांवर सोमवारी (दि.22) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलानी, प्रदीप वाघमारे, […]

The post जमिनीच्या व्यवहारात फसवणूक : माजी नगरसेवक कोऱ्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
fraud
fraud

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एका जमिनीसाठी पैसे घेऊन ती दुसऱ्याला विकली, त्यानंतर दूसरी जमीन घेऊन देतो असे सांगून एका डॉक्टरची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत कोऱ्हाळे यांच्यासह नऊ जणांवर सोमवारी (दि.22) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलानी, प्रदीप वाघमारे, अनुप सिंग, स्वप्नील काटे, भिवा दास, माणिक रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (33, रा.ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली असून आरोपी व फिर्यादी यांच्यात चिखली गट क्रमांक 383 येथील जमिनीबाबत व्यवहार झाला होता. तसेच त्या जमिनीबाबत खरेदीखत करण्यात आले होते. दरम्यान ही जमीन दुसऱ्याच्याच नावावर असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.

याबाबत विचारले असता तुम्हाला दुसरी जागा देतो. मात्र त्यासाठी आणखी थोडी रक्कम द्यावीलागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीकडून 22 लाख 50 हजार रुपये घेतले. हा व्यवहार 19 मे 2015 ते 20 एप्रिल 2019 च्या कालावधीत झाला आहे. मात्र अद्याप फिर्यादी यांना जमीन किंवा रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

The post जमिनीच्या व्यवहारात फसवणूक : माजी नगरसेवक कोऱ्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108528
खळबळजनक ! पुण्यातील हिल्स ग्रीन हायस्कूलच्या आवारात बदनामीकारक मजकूर लिहून चोरी https://policenama.com/theft-in-hills-green-highschool/ Tue, 23 Apr 2019 14:35:21 +0000 https://policenama.com/?p=108510

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील उंड्री परिसरातील हिल्स ग्रीन हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे कुलुप तोडून आत घुसलेल्या चोरट्याने आवारात ठिकठिकाणी बदनामीकारक मजकूर लिहून शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीवर स्प्रे पॅट मारले. त्यानंतर शाळेतील २५ हजार रुपये किंमतीचा प्रोजेक्टर चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकऱणी शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार […]

The post खळबळजनक ! पुण्यातील हिल्स ग्रीन हायस्कूलच्या आवारात बदनामीकारक मजकूर लिहून चोरी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील उंड्री परिसरातील हिल्स ग्रीन हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे कुलुप तोडून आत घुसलेल्या चोरट्याने आवारात ठिकठिकाणी बदनामीकारक मजकूर लिहून शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीवर स्प्रे पॅट मारले. त्यानंतर शाळेतील २५ हजार रुपये किंमतीचा प्रोजेक्टर चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकऱणी शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री-पिसोळी परिसरात हिल्स ग्रीन हायस्कूल व ज्यूनीअर कॉलेज ही इंग्रजी माध्यमाची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने ती बंद होती. मध्यरात्री अज्ञाताने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलप तोडले. त्यानंतर आत घूसून शाळेतील पाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन नुकसान केले.

शाळेच्या परिसरात शाळेची बदनामी करणारा मजकूर लिहिला आणि त्यानंतर शाळेतील वर्गात असलेला २५ हजार रुपये किंमतीचे प्रोजेक्टर यंत्र अज्ञाताने चोरुन पोबारा झाला. सोमवारी सकाळी शाळा उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिला तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत. शाळेतील व्यवस्थेविरोधात अज्ञाताने बदनामीकारक मजकूर लिहीला असून पोलिसांकडून असे कृत्य करणाºयाचा शोध घेण्यात येत आहे.

The post खळबळजनक ! पुण्यातील हिल्स ग्रीन हायस्कूलच्या आवारात बदनामीकारक मजकूर लिहून चोरी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108510
३० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल https://policenama.com/vavi-poilce-soldier-arrested-by-acb/ Tue, 23 Apr 2019 14:30:27 +0000 https://policenama.com/?p=108517 police
police

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वावी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजित किशोर जगधने याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अजित जगधने हे नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्य़रत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वावी पोलीस ठाण्यातील […]

The post ३० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
police
police

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वावी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजित किशोर जगधने याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अजित जगधने हे नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्य़रत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वावी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अडागळे यांना गुन्ह्यात मदत करण्यास सांगण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच जगधने याने मागितली. तक्रारदार यांनी २८ मार्च २०१९ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्य़ालयात तक्रार दिली होती. पथकाने तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये जगधने याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. जगधने याने लाच स्विकारण्याचा प्रतत्न केला. मात्र त्याला संशय आल्याने लाच स्विकारली नाही.

जगधने याने लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडगे करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

The post ३० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108517
Video : निवडणूक कर्मचारीच सांगत होता ‘ते’ बटन दाबा ; भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण https://policenama.com/bjp-workers-beat-election-official-in-muradabad/ Tue, 23 Apr 2019 07:33:05 +0000 https://policenama.com/?p=108302

मुरादाबाद : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुरादाबाद येथील बुथ क्रमांक २३१ वरील निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केली. बुथवरील मतदान कर्मचारीच मतदारांना समाजवादी पक्षाचे सायकल चिन्हासमोरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे. देशभरातील ११७ लोकसभा मतदारसंघांचे मतदान पार पडत आहे. यादरम्यान काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या घटना […]

The post Video : निवडणूक कर्मचारीच सांगत होता ‘ते’ बटन दाबा ; भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुरादाबाद : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुरादाबाद येथील बुथ क्रमांक २३१ वरील निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केली. बुथवरील मतदान कर्मचारीच मतदारांना समाजवादी पक्षाचे सायकल चिन्हासमोरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे. देशभरातील ११७ लोकसभा मतदारसंघांचे मतदान पार पडत आहे. यादरम्यान काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या घटना समोर येत आहेत. परंतु मुरादाबाद येथे बुथवरील निवडणूक अधिकारीच मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकलसमोरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. यानंतर तेथे प्रचंड गदारोल माजला होता. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पोलिसांनी मध्यस्थी करत निवडणूक कर्मचाऱ्याला सोडवले.

The post Video : निवडणूक कर्मचारीच सांगत होता ‘ते’ बटन दाबा ; भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108302
पोलिस ठाण्यातच राडा ; ‘त्याने’ पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी https://policenama.com/news-about-nagar-district-kotwali-police-station/ Tue, 23 Apr 2019 07:23:10 +0000 https://policenama.com/?p=108297 police
police

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्याने पोलीस ठाण्यातच त्याच्याविरोधात तक्रारीसाठी आलेल्या बहिणीसोबत वाद घालून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडली. तसेच पोलिस ठाण्यातील प्रिंटर व संगणक खाली पाडून नुकसान केले. कोतवाली पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. तसेच पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस […]

The post पोलिस ठाण्यातच राडा ; ‘त्याने’ पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
police
police

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्याने पोलीस ठाण्यातच त्याच्याविरोधात तक्रारीसाठी आलेल्या बहिणीसोबत वाद घालून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडली. तसेच पोलिस ठाण्यातील प्रिंटर व संगणक खाली पाडून नुकसान केले. कोतवाली पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. तसेच पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्‍वर रामचंद्र जाधव (रा.लिंक रोड, केडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याचे बहीण व पत्नी सोबत वाद झाले होते. त्यांना मारहाण करून पळून जाताना तो दुचाकीवरुन पडून जखमी झाला होता. पत्नी व बहिण मारहाणीची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी जाधव हाही पोलीस ठाण्यात आला. त्याने पोलीस ठाण्यातच बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठमोठ्याने आरडाओरडा करून माझी अगोदर फिर्याद घ्या, असे तो म्हणू लागला.

पोलीस ठाण्यातील संगणक व प्रिंटर टेबलावरून खाली टाकून नुकसान केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे सदर घटनेची माहिती घेत असताना जाधव याने त्यांची गचांडी पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. मी आत्महत्या करतो, असे म्हणून त्याने पोलिस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून जाधव याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातच सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

The post पोलिस ठाण्यातच राडा ; ‘त्याने’ पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
108297