शैक्षणिक – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Fri, 24 Jan 2020 17:43:33 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 शैक्षणिक – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 स्कॉलरशिप घोटाळा : ED च्या नोटीसला तब्बल 780 ‘नामांकित’ शिक्षणसंस्थांची केराची ‘टोपली’ https://policenama.com/scholarship-scam-at-pune-ed-notice-maharashtra/ Fri, 24 Jan 2020 17:43:33 +0000 https://policenama.com/?p=219403 scholarship scam
scholarship scam

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीला तब्बल 780 महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. ईडी मार्फत या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश फडणवीस सरकारकडून देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षणसंस्थांना शिष्यवृत्ती वाटपाच्या हिशेबाचे आदेश देण्यात आले होते. परंतू मुदत उलटून गेली तरी या […]

The post स्कॉलरशिप घोटाळा : ED च्या नोटीसला तब्बल 780 ‘नामांकित’ शिक्षणसंस्थांची केराची ‘टोपली’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
scholarship scam
scholarship scam

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीला तब्बल 780 महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. ईडी मार्फत या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश फडणवीस सरकारकडून देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षणसंस्थांना शिष्यवृत्ती वाटपाच्या हिशेबाचे आदेश देण्यात आले होते. परंतू मुदत उलटून गेली तरी या संस्थांनी शिष्यवृत्ती वाटपाचा हिशेब सादर न केल्याची माहिती समोर आली आहे.

शिष्यवृत्ती घोटाळ्याचे प्रकरण नक्की काय आहे –
पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात घोटाळा झाल्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवून देखील तब्बल 780 शिक्षण संस्थांनी आपला हिशेब दिला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती हडप झाली का? असे असल्यास ईडी कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

समाज कल्याण खात्याकडून वर्षाला कोट्यावधी रुपयांची शिष्यवृत्ती वाटली जाते. परंतु 2010 ते 2017 च्या काळात मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याला कारण आहे की शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृतीच मिळाली नाही. समाज कल्याण खात्याकडून संबंधित महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळाली नाही.

याकारणाने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली होती. या चौकशीत शिष्यवृत्ती वाटपात अनियमितता आढळून आल्याने हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले. त्यानंतर ईडीने समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षण संस्थांना शिष्यवृत्तीचे हिशेब सादर करण्याचे आदेश दिले. आता नोटीसीला उत्तर देण्याची मुदत संपली तरी या शिक्षण संस्थांनी आपले हिशेब सादर केले नाहीत.

समाज कल्याण खात्याने देखील घोटाळ्याची बाब मान्य केली. परंतु कारवाईबाबत विचारताना त्यांनी ईडी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. ईडीच्या नोटीशीला केराची टोपली दाखवणाऱ्या 780 महाविद्यालयांमध्ये पुण्यातील अनेक संस्थांना समावेश आहे.

2010 – 17 सालचा मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटप घोटाळा –
भारती विद्यापीठ, मराठवाडा मित्र मंडळ, फर्ग्युसन कॉलेज, सिंहगड शिक्षण संस्था, डीवाय पाटील कॉलेज, गरवारे महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, डेक्कन शिक्षण संस्था, GFX OUT, सिम्बॉयसिस या नामांकित कॉलेजचा समावेश आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक शिक्षण संस्था देखील या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारावर आहेत. त्यांच्यावर शिष्यवृत्तीची रक्कम ही परस्पर इतरत्र वळल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे सरकार या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post स्कॉलरशिप घोटाळा : ED च्या नोटीसला तब्बल 780 ‘नामांकित’ शिक्षणसंस्थांची केराची ‘टोपली’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
219403
श्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न https://policenama.com/annual-prize-distribution-at-shri-mahavir-vidyalaya-lasalgaon/ Thu, 23 Jan 2020 13:30:44 +0000 https://policenama.com/?p=218693

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देतांना अभ्यासालाही महत्व द्यावे. परिस्थितीचा कधीही विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. अशा प्रतिकूलतेत मिळविलेल्या यशाचा आनंद जगावेगळा असतो. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा असे प्रतिपादन निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी केले. लासलगाव येथील श्री महावीर […]

The post श्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देतांना अभ्यासालाही महत्व द्यावे. परिस्थितीचा कधीही विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. अशा प्रतिकूलतेत मिळविलेल्या यशाचा आनंद जगावेगळा असतो. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा असे प्रतिपादन निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी केले.

लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर नाशिक येथील प्रशांत शेळके होते. प्रमुख अतिथी म्हणून लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, येवला येथील युवा सेना नेते कुणाल दराडे, नाशिकचे नामवंत डॉ. तुषार संकलेचा, वाकी ब्रु.चे सरपंच दत्ताजी वाकचौरे, प्रसिध्द व्यापारी अनिल ब्रम्हेचा, बिपीन ब्रम्हेचा, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ निकम, निफाड पं.स चे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, प्रसिध्द व्यापारी ऋषभ भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी विद्यार्थ्यांनी आई, वडील व शिक्षक यांना आदर्श मानून वाटचाल केल्यास जीवनात यश नक्कीच मिळते असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात संगत चांगली ठेवावी, आपले सामान्य ज्ञान वाढवावे व आपले ध्येय निश्चित करून अभ्यास करावा असेहि सांगितले. प्रशांत शेळके, तुषार संकलेचा, कुणाल दराडे यांनी विद्यालयाच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. पुढील वर्षापासून विद्यालयात योग व ध्यानधारणा यांचे वर्ग सुरु करण्यांत येतील असे संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा व श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड यांनी सांगितले.

या वेळी इ.५ वी ते १२ वी मधील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यात इ.१० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध बाह्य परीक्षा, चित्रकला, वकृत्व, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम इ.मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे आदर्श विद्यार्थी म्हणून पूजा भाऊसाहेब सानप, कृष्णा मुकेश बागुल यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचीव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय टी आय चे अध्यक्ष मोहन बरडीया, संस्थचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमित जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडीया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड व श्री महावीर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी शिंदे, आय.टी.आय चे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृह अधीक्षक श्री धनपाल कोल्हापुरे, विभागप्रमुख कैलास भारती, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र जाधव उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी केले. तसेच सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र बनसोडे, ज्ञानेश्वर मोहन व पर्यवेक्षक मधुकर बोडके, विभाग प्रमुख कैलास भारती यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post श्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218693
सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न https://policenama.com/snehbandh-program-in-shirur/ Thu, 23 Jan 2020 10:46:14 +0000 https://policenama.com/?p=218456

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा चौथा स्नेहबंध कार्यक्रम उत्साहात पार पडला. कित्येक वर्षांनी झालेल्या एकमेकांच्या भेटीने अनेकजण गहिवरून गेले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अमित लुंकड यांनी केले. यावेळी बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, डी. फार्मसी चे […]

The post सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा चौथा स्नेहबंध कार्यक्रम उत्साहात पार पडला. कित्येक वर्षांनी झालेल्या एकमेकांच्या भेटीने अनेकजण गहिवरून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अमित लुंकड यांनी केले. यावेळी बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष बाबाजी गलांडे यांनी संघटनेच्या उद्देशाबद्दल मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित सदस्यांची निवड व सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे –
बाबाजी गलांडे अध्यक्ष, उमेश छाजेड उपाध्यक्ष, अमित लुंकड सचिव, मिनाक्षी वाजे खजिनदार, सदस्य- सोमनाथ साकोरे, आशिष मुथा, ईश्वर सोनवणे, संदीप पोळ आणि मोनाली परभणे. या कार्यक्रमासाठी महेशजी झगडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून मोलाची उपस्थिती लाभली. जगातील सर्व रुग्णांचा पालक म्हणजे फार्मासिस्ट असतो, हे सर्व फार्मासिस्टला माहिती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित सर्वांना विचारत आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच उपस्थितांसमोर फार्मसी चे ह्या देशातील स्थान काय आहे हे स्पष्ट केले. त्यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील वेगवेगळे अनुभव सांगितले. औषध निर्माण शास्त्र संशोधन आणि त्याची गरज याविषयी मार्गदर्शनही केले. कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय शशिकांतजी शाह यांच्या स्मरणार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून अश्विनी वाघ आणि सचिन चेडे यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास १८० हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच या कार्यक्रमात डी. फार्मसी चे बातमीपत्रक व बी. फार्मसीच्या मंथन नियतकालिकेचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे व व्यवस्थापक शिवाजी पडवळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल देशपांडे यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218456
पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल स्कूल’ https://policenama.com/kadam-wasti-school-to-be-model-school/ Thu, 23 Jan 2020 09:47:03 +0000 https://policenama.com/?p=218528 kadamvasti-school
kadamvasti-school

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) – पुरंदर तालुक्यातील एक मॉडेल स्कूल म्हणून कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा निर्माण होऊ शकते. आपण स्वतः याबाबत शाळेला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे (तत्कालीन) मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी शाळा भेटीच्यावेळी दिले. पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी […]

The post पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल स्कूल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
kadamvasti-school
kadamvasti-school

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) – पुरंदर तालुक्यातील एक मॉडेल स्कूल म्हणून कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा निर्माण होऊ शकते. आपण स्वतः याबाबत शाळेला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे (तत्कालीन) मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी शाळा भेटीच्यावेळी दिले.

पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझडे, गटसमन्वयक संजय चव्हाण, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, सतीश कुदळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, इंग्रजीलेखन, वाचन, शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक अनंता जाधव आणि सहशिक्षिका सुरेखा जाधव यांनी माहिती दिली.

विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सदस्य झुरंगे यांची दोन्ही मुले जिल्हा जाधव परिषदेच्या शाळेत शिकत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलेच, शिवाय येथील ग्रामस्थांचा शाळेबाबतचा असलेला सहभाग, ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीसाठी दिलेली ११ गुंठे जागा, शाळेला भौतिक सुविधांबाबत ग्रामस्थांचे होणारे सहकार्य आणि दोन वर्षांत १२ वरून ४८ पर्यन्त विद्यार्थ्यांची झालेली संख्या पाहता ही शाळा पुरंदरची एक मॉडेल स्कूल बनू शकते.

शाळेला हव्या असणाऱ्या सोयी सुविधांबाबतचे प्रस्ताव ताबडतोब जिल्हा परिषदेकडे पाठवावेत, अशा सूचनाही त्यांनी गटशिक्षणधिकारी वालझडे यांना केल्या आहेत. ग्रामस्थांनीही शाळेला जागा दिली आहे. जिल्हा परिषदेने अद्ययावत इमारत द्यावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेकडून शाळेला वर्गखोल्या व संरक्षक भिंत बांधन दिली जाईल. त्याचबरोबर वस्तीपर्यंतच्या रस्त्याचे कामही मार्गी लावू, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी सांगितले.

यावेळी शाळा दत्तक घेणारे ज्येष्ठ पत्रकार बी. एम. काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर कदम, ग्रामस्थ संपत गरुड, हनुमंत कदम, बबन कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी स्वागत केले. सहशिक्षिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल स्कूल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218528
UPSC कडून ‘सिव्हिल सर्व्हिस 2019’ च्या मुलाखतीचं वेळापत्रक जारी, जाणून घ्या https://policenama.com/upsc-civil-services-2019-interview-schedule-released/ Thu, 23 Jan 2020 09:05:55 +0000 https://policenama.com/?p=218500 upsc
upsc

The post UPSC कडून ‘सिव्हिल सर्व्हिस 2019’ च्या मुलाखतीचं वेळापत्रक जारी, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
upsc
upsc

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही UPSC चा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) सिविल सेवा परीक्षा 2019 च्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य परिक्षेतनंतर आयोगाद्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. UPSC मुख्य परिक्षेत पात्र ठरणारे उमेदवार या मुलाखतीत सहभागी होतील.

UPSC ची पूर्व परिक्षा पास झालेल्या उमेदवारांची 20, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2019 ला मुख्य परीक्षा पार पडली होती. त्यानंतर आता आयोगाकडून मुलाखत 2019 चे आयोजन करण्यात आले असून या मुलाखतींना 17 फेब्रुवारी 2020 पासून सुरुवात होणार आहे.

UPSC ने सिविल सेवा मुख्य व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर आयोगाकडून यासंबंधित वेळापत्रक तपासण्याचे उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे. https://www.upsc.gov.in/sites/default/files/Interview-CSM-2019-Engl.pdf या लिंकवर जाऊन उमेदवार व्यक्तीमत्व चाचणीच्या वेळापत्रकांची माहिती घेऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post UPSC कडून ‘सिव्हिल सर्व्हिस 2019’ च्या मुलाखतीचं वेळापत्रक जारी, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218500
‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये १७०० विद्यार्थ्यांची नोंदणी https://policenama.com/registration-of-1700-students-in-des-startup-club/ Thu, 23 Jan 2020 08:09:09 +0000 https://policenama.com/?p=218436

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये पुणे, मुंबई, सांगलीतील १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन मोठा प्रतिसाद दिल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली. ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’चे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक सतीश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. कुंटे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. […]

The post ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये १७०० विद्यार्थ्यांची नोंदणी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये पुणे, मुंबई, सांगलीतील १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन मोठा प्रतिसाद दिल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

‘डीईएस स्टार्ट अप क्लब’चे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक सतीश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. कुंटे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कुंटे पुढे म्हणाले, ‘उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. इनक्युबेशन, स्टार्ट-अप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अशी या विभागाची रचना असाणार आहे. ग‘ामीण अर्थव्यवस्थेवर आधारित व्यवसायांना प्राधान्य दिले जाणार आहे.’

श्री. मेहता म्हणाले, ‘स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नम‘ता हे गुण महत्त्वाचे आहेत. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थाकडे लक्ष दिले पाहिजे.’ यशश्री साने यांनी स्वागत, आदेश गोखले यांनी प्रास्ताविक केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये १७०० विद्यार्थ्यांची नोंदणी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218436
जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! https://policenama.com/annual-convention-of-jain-primary-education-temple/ Thu, 23 Jan 2020 06:23:44 +0000 https://policenama.com/?p=218361

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राहुल ढिकले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या वेदिका होळकर या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी नाशिकचे प्रसिध्द उद्योजक विनोद ब्रम्हेचा, के.टी.एच.एम.कॉलेजचे प्राध्यापक डॉ.भास्कर ढोके, ग्रामपंचायत सदस्या श्वेता सचिन मालपाणी, माजी.पं.स.सदस्य गोकुळ पाटील, […]

The post जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राहुल ढिकले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या वेदिका होळकर या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी नाशिकचे प्रसिध्द उद्योजक विनोद ब्रम्हेचा, के.टी.एच.एम.कॉलेजचे प्राध्यापक डॉ.भास्कर ढोके, ग्रामपंचायत सदस्या श्वेता सचिन मालपाणी, माजी.पं.स.सदस्य गोकुळ पाटील, आ.राहुल ढिकले यांचे स्वीय सहाय्यक मनोज कोकरे, सामाजिक कार्यकर्ते किरण बरडिया, सोनाली ब्रम्हेचा, आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी खा.नरेंद्र जाधव यांच्या निधीतून दिलेले सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनचे उदघाटन श्वेता सचिन मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. राहुल ढिकले यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलागुणही जोपासावेत. दांडगी इच्छाशक्ती असेल तर जीवनात काहीही अशक्य नाही असे विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा वेदिका होळकर यांनी जैन प्राथमिक शाळा हि विज्ञान युगातही मुलांवर संस्कार घडविणारी शाळा आहे. विविध शालेय उपक्रम राबविण्यात शाळेचा नावलौकिक आहे असे प्रतिपादन केले. शाळेचे माजी विद्यार्थी प्रा.भास्कर ढोके यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. व संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. श्वेता मालपाणी, जव्हेरीलाल ब्रम्हेचा, सुनील आब्बड यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे भन्नाट व अफलातून अशा विविध गीतांवर, विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटात विविध नृत्ये सादर केली. यात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटीका, मुकाभिनय, एकांकिका या कार्यक्रमांचा समावेश होता.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचीव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय टी आय चे अध्यक्ष मोहन बरडीया, संस्थचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमित जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडीया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड व श्री महावीर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी शिंदे, आय.टी.आय चे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृह अधीक्षक धनपाल कोल्हापुरे, विभागप्रमुख गणेश महाले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका नलिनी शिंदे यांनी केले. या स्नेहसंमेलनाचे परीक्षण सुवर्णा क्षिरसागर, अजहर पठाण यांनी केले. तर सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र बनसोडे, महेश खैरनार व उपशिक्षिका लीनिता अहिरे, त्रिवेणी जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218361
सरस्वती, निर्मला विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व बक्षीस वाटपाचे आयोजन https://policenama.com/organizing-inter-school-sports-competition-and-prize-distribution-at-saraswati-nirmala-vidyalaya/ Thu, 23 Jan 2020 06:12:25 +0000 https://policenama.com/?p=218372

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरस्वती विद्या मंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मला, सरस्वती कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे संजय होळकर (मविप्र. क्रीडा प्रशिक्षक), डॉ.मनीषा रौंदळ (समाजसेविका), अक्षय देशमुख (आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू), रसिका शिंदे (रणजी महिला खेळाडू), […]

The post सरस्वती, निर्मला विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व बक्षीस वाटपाचे आयोजन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरस्वती विद्या मंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मला, सरस्वती कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे संजय होळकर (मविप्र. क्रीडा प्रशिक्षक), डॉ.मनीषा रौंदळ (समाजसेविका), अक्षय देशमुख (आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू), रसिका शिंदे (रणजी महिला खेळाडू), यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष अशोक होळकर, सदस्य- गुणवंत होळकर, डॉ. चांदर, बाळासाहेब बोरसे, मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले.

संजय होळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरु हेच मित्र, अनुभवाच्या जोरावर यश, जीवनात पुढे जाण्यासाठी प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द, धाडस असावे, वेळेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी सायकलचा वापर करावा, सायकल चालवणे उत्तम व्यायाम, जीवनरुपी ज्योत पेटवण्यासाठी ज्ञानाची गरज, शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द,चिकाटी, मेहनत असावी, खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होतो. आशा विविध विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कबड्डी मुलांमध्ये क. भा. पा. शाळा विंचूर-प्रथम, कलगिधर इंग्लिश स्कूल- द्वितीय, जि. प. शाळा सुभाष नगर- तृतीय. मुलींमध्ये जि. प. शाळा, सुभाष नगर- प्रथम, सरस्वती विद्यामंदिर- द्वितीय, कलगिधर इंग्लिश स्कूल- तृतीय. लांब उडी मुले रोशन गाडे- गोल्ड, अक्षय कुटे- सिल्वर, आकाश गायकवाड- ब्रांझ. मुलींमध्ये मेघा खारतोडे- गोल्ड, साक्षी आवारे- सिल्वर, तनुजा आहेर- ब्राँझ. या विद्यार्थ्यांनी नंबर मिळविणे तसेच शाळा अंतर्गत विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षक कैलास पातळे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post सरस्वती, निर्मला विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व बक्षीस वाटपाचे आयोजन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
218372
श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! https://policenama.com/shri-mahavir-school-annual-function-news/ Tue, 21 Jan 2020 14:40:35 +0000 https://policenama.com/?p=217697 annual functin lasalgaon
annual functin lasalgaon

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन(राकेश बोरा) – लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुहास कांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कृ.उ.बा.समिती लासलगावचे माजी सभापती जयदत्त होळकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी प्रसिध्द सिनेअभिनेत्री मिनाक्षी राठोड, नाशिक सिंहस्थ कमिटी मेंबर पंकज काळे, प्रसिध्द कवी प्रमोद अंबडकार, ना.म.को.बँकेचे […]

The post श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
annual functin lasalgaon
annual functin lasalgaon

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन(राकेश बोरा) – लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुहास कांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कृ.उ.बा.समिती लासलगावचे माजी सभापती जयदत्त होळकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी प्रसिध्द सिनेअभिनेत्री मिनाक्षी राठोड, नाशिक सिंहस्थ कमिटी मेंबर पंकज काळे, प्रसिध्द कवी प्रमोद अंबडकार, ना.म.को.बँकेचे संचालक महेंद्र बुरड, सुभाष नहार,सरस्वती विद्या प्रसारक मंडळ वाघदर्डीचे अध्यक्ष प्रकाश जैन, प्रसिध्द व्यापारी संजय धाडीवाल, राजेंद्र कांकरिया,पाचोरे ब्रु.मा.सरपंच बाळासाहेब उगलमुगले, ना.म.को.बँकेचे अध्यक्ष सोहनशेठ भंडारी, सामाजिक कार्यकर्ते फराह खान, शीतल साबद्रा, सुरेश कुमावत, अरुंधती पंकज काळे, तसेच स्टार न्यूजचे पत्रकार कल्पेश लचके, दिशा न्यूजचे पत्रकार रविना चांडोले, आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी संस्था व शाळेस मा.पंकज काळे व अरुंधती काळे यांच्या वतीने १०० खुर्च्या भेट देण्यात आल्या. पंकज काळे व अरुंधती काळे यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी आ. सुहास कांदे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांच्या हातात विद्यार्थ्यांचे भविष्य आहे. यामुळे शिक्षकांनी मनापासून ज्ञानार्जनाचे कार्य करावे व विद्यार्थी घडवावे असे आवाहन केले. प्रसिध्द सिनेअभिनेत्री मिनाक्षी राठोड यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या ज्ञानदानाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्वेता घोडके दिवाणी न्यायाधीश झाल्याबद्दल कौतुक केले. प्रमोद अंबडकार यांनी व-हाडी भाषेतून विनोदी कविता सादर केल्या व विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळेस जयदत्त होळकर, सुभाष नहार, जव्हेरीलाल ब्रम्हेचा, सुनील आब्बड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इ.५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. यात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटीका, मुकाभिनय, समूह गायन, वैयक्तिक गायन, विविध वेशभूषा या कार्यक्रमांचा समावेश होता.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचीव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय टी आय चे अध्यक्ष मोहनलाल बरडीया, संस्थचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमितजी जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषजी ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडीया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड व श्री महावीर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी शिंदे, आय.टी.आय चे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृह अधीक्षक धनपाल कोल्हापुरे, विभागप्रमुख कैलास भारती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी केले. या स्नेहसंमेलनाचे परीक्षण संगीता जगताप, अनुजा घोडके, गोरखनाथ आढांगळे यांनी केले. तर सूत्रसंचालन उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन, विद्यार्थी स्वराली देवरे, गायत्री पाटील, अभिषेक शेलार, मंगेश घीगे यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
217697
56 इंच छाती, ‘भाईजान’ सलमानपेक्षा मोठे ‘बायसेप्स’, तिहारचा ‘हा’ अधिकारी ‘बॉडी बिल्डर’ https://policenama.com/deepak-sharma-assistant-superintendent-tihar-jail-know-about-him-tedu/ Tue, 21 Jan 2020 09:27:45 +0000 https://policenama.com/?p=217442

The post 56 इंच छाती, ‘भाईजान’ सलमानपेक्षा मोठे ‘बायसेप्स’, तिहारचा ‘हा’ अधिकारी ‘बॉडी बिल्डर’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहार जेलमध्ये असिस्टेंट सुपरीटेंडेंट  दीपक शर्माची  छाती 56 इंच आहे आणि बायसेप्स तर बॉलिवूड स्टार सलमान खानपेक्षाही मोठा आहे. गुन्हेगार त्यांचा देह पाहूनच कापू लागतात. तिहारमध्ये असिस्टंट सुपरीटेंडेंट बनण्याआधी ते अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये सिलेक्ट झाले आहेत. त्यांची स्टोरीही इंटरेस्टींग आहे.

मध्यवर्ती कारागृहामध्ये जेल अधिक्षक दीपक शर्मा मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. 32 वर्षीय दीपक यांनी शालेय शिक्षण गुजराती समाज सीनियर सेकेंड्री स्कुलमधून पूर्ण केलं आहे.

12 वीनंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील रामजस कॉलेजमधून पदवी घेतली. येथे ते विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2007 – 2009 मध्ये बीएड केलं. यानंतर त्यांचं पहिल्यांदा भारतीय हवाई दलात सिलेक्शन झालं होतं. याच वर्षी केंद्रीय पोलीस दलाचे असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांची निवड झाली.

2008 मध्ये बीएड दरम्यान त्यांची शिक्षक म्हणूनही निवड झाली होती. याच वर्षी त्यांना दिल्ली सेवा बोर्डमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली होती. त्यांनी आपली तयारी सुरुच ठेवली. 2009 साली ते मध्यवर्ती कारागृहात जेल अधिक्षक बनले. तेव्हापासून दहा वर्षे होत आली ते तिहारमध्ये आहेत. बॉडी बिल्डींगच्या छंदामुळे त्यांचा तुरुंगात वेगळाच दरारा आहे.

दीपक शर्मांचे वडिल दिल्ली विद्यु बोर्डातले सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांची आई गृहिणी आहे. दीपक शर्मांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांचे आदर्श त्यांचे मोठे भाऊ आणि मोटीवेशनल स्पीकर शिव खेरा आहेत.

छंदामुळे मिळाली ओळख :
जिमिंग दीपक शर्मांचा आवडता छंद आहे. ते त्यांचा रिकामा वेळ वर्कआऊटमध्ये घालवतात. दीपिक सांगतात की ते जीमसाठी 5 तास वेळ देतात. यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. याशिवाय एअर पिस्टल शुटींग ही देखील त्यांची खास हॉबी आहे.

असं आहे दीपक शर्मांचं बॉडी बिल्ड
बायसेप्स – 19 इंच
चेस्ट – 56 इंच
वेस्ट – 30 इंच
वजन – 92 किलो

अशी आहे कामगिरी, कमावले आहेत हे मेडल्स
मिस्टर दिल्ली – सिल्व्हर
मिस्टर युपी – सिल्व्हर
मिस्टर हरियाणा – गोल्ड
स्टील मॅन ऑफ इंडिया – सिल्व्हर
आयरन मॅन ऑफ इंडिया – सिल्व्हर
मिस्टर इंडिया – गोल्ड
दिल्ली श्री – सिल्व्हर
ऑल इंडिया सिव्हील सर्व्हीसेस – ब्राँज

मिळाले आहेत ‘हे’ अवॉर्ड
स्वाभिमान खेलरत्न अवॉर्ड 2019
द ग्लोबल युथ अचीव्हमेंट अवॉर्ड 2020

‘हे’ आहे गोल
ऑल इंडिया सिव्हील सर्व्हीसेस गेम्स 2020 आणि ऑल इंडिया पोलिस गेम्स इन 2020 मध्ये भाग घेण्याचं दीपक शर्मांचं गोल आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post 56 इंच छाती, ‘भाईजान’ सलमानपेक्षा मोठे ‘बायसेप्स’, तिहारचा ‘हा’ अधिकारी ‘बॉडी बिल्डर’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
217442