जरा हटके – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Wed, 19 Feb 2020 11:39:53 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 जरा हटके – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 काय सांगता ! होय, स्टेजवर गाणं गाताना गायकाच्या केसांना लागली ‘आग’, तरी देखील वाजवत राहिला ‘वाद्य’ https://policenama.com/cover-band-musicians-hair-catches-fire-keeps-playing-kiss-detroit-rock-city/ Wed, 19 Feb 2020 11:39:53 +0000 https://policenama.com/?p=231030 bobby
bobby

The post काय सांगता ! होय, स्टेजवर गाणं गाताना गायकाच्या केसांना लागली ‘आग’, तरी देखील वाजवत राहिला ‘वाद्य’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
bobby
bobby

अमेरिका (लोआ) : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या लोआ शहरामध्ये एक गायक मंचावर गाणं सादर करत होता. तो गाणं म्हणण्यात तो इतका हरवून गेला की त्याच्या केसांना आग लागली याची त्याला कल्पनाच नव्हती. गायक आग लागल्यानंतर देखील आपल्या सुरात गाणं गात राहिला आणि मागे बँडमध्ये काम कारणाऱ्या त्यांच्या सहकार्यांनी त्याच्या केसांची आग विझवली. गायक यामुळे जराही घाबरला नाही उलट गिटार वाजवतच राहिला.

हे प्रकरण लोआ शहराच्या के डेट्राइट रॉक सिटीचे आहे. जेथे हिप हॉप सिंगर बॉबी जेनसन आपल्या बॅंडसह ‘किस क्लासिक शो’ करत होते. या दरम्यान गायक आणि गिटार वादक बॉबी सादरीकरण करत होते. अचानक मागे लावण्यात आलेल्या फायर वर्क्सची ठिणगी उडून गायकाच्या केसांवर पडली.

आग लागल्यानंतर देखील गायक बॉबी गातच राहिला आणि त्याला याची माहिती देखील नव्हती. परंतु त्यांच्या बॅंडमधील लोकांनी गायकांच्या डोक्यावरील आग विझवली. हे होत असताना देखील तो तल्लीन होऊ गाणं गात होता.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रम संपल्यानंतर गायक जेनसनने सांगितले की त्याच्या केसाला आग लागली होती आणि त्याने कोणत्याही प्रकारचे विग लावलेले नव्हते. यावर बोलताना पुढे तो म्हणाला की, शो मध्ये घडलेली घटना चांगलीच होती. आता माझ्याकडे एलिस कूपर पेक्षा चांगला हेअर कट आहे

The post काय सांगता ! होय, स्टेजवर गाणं गाताना गायकाच्या केसांना लागली ‘आग’, तरी देखील वाजवत राहिला ‘वाद्य’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
231030
काय सांगता ! होय, स्वप्नात डोनाल्ड ट्रम्प आल्यानं ‘कृष्णा’नं मंदिरच बांधलं, आता करतोय 6 फुट मूर्तीची ‘पुजा’ https://policenama.com/shiv-telangana-donald-trump-superfan-urges-centre-to-fulfill-his-dream-of-meeting-us-president/ Wed, 19 Feb 2020 10:11:07 +0000 https://policenama.com/?p=230913 trump
trump

हैद्राबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. सर्वत्र सध्या ट्रम्प यांच्या नावाचीच चर्चा सुरु आहे. ते या दौऱ्यात मोदींच्या अहमदाबाद शहराला सुद्धा भेट देणार आहेत. ही चर्चा सुरू असतानाच तेलंगणातील एका ‘ट्रम्प भक्ताची कहाणी’ आता समोर आली आहे. या भक्ताने ट्रम्प यांचे एक मंदिर बांधले असून […]

The post काय सांगता ! होय, स्वप्नात डोनाल्ड ट्रम्प आल्यानं ‘कृष्णा’नं मंदिरच बांधलं, आता करतोय 6 फुट मूर्तीची ‘पुजा’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
trump
trump

हैद्राबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. सर्वत्र सध्या ट्रम्प यांच्या नावाचीच चर्चा सुरु आहे. ते या दौऱ्यात मोदींच्या अहमदाबाद शहराला सुद्धा भेट देणार आहेत. ही चर्चा सुरू असतानाच तेलंगणातील एका ‘ट्रम्प भक्ताची कहाणी’ आता समोर आली आहे. या भक्ताने ट्रम्प यांचे एक मंदिर बांधले असून त्यात त्याने ६ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापन केली आहे. तो व्यक्ती रोज त्या मूर्तीची पूजा करतो आणि ट्रम्प हे माझे दैवत आहे असे सांगत असतो.

ही गोष्ट आहे तेलंगणातील कोन्ने गावातील बुसा कृष्णाची. तो एक रियल इस्टेट एजंट आहे. तो आता ट्रम्प भक्तीमुळे त्याच्या परिसरात प्रसिद्ध झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी व्यावसायिक होते आणि त्यांची रिअल इस्टेट मध्ये त्यांची मोठीच उलाढाल आहे.

तू ट्रम्प यांचा भक्त कसा झालास ? हे कृष्णाला विचारताच त्याने एक मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, ट्रम्प माझ्या स्वप्नात आले होते आणि मग त्यांच्या प्रेमातच पडलो आणि मी माझ्या घराच्या अंगणातच त्यांचे मंदिर बांधले व सहा फुटांचा पुतळा बसवला आहे. तो सकाळ – संध्याकाळ त्यांची पूजा करतो व दुग्धाभिषेक सुद्धा करतो असे कृष्णाने सांगितले.

या गोष्टीला कृष्णाच्या घरातील नातेवाईकांनी विरोध केला आहे. पण तो सध्या कुणाचेच ऐकत नाही, तुम्ही जसे शिवाची आणि इतर देवांची पूजा करता तसेच ट्रम्प हे माझ्यासाठी माझे देव असल्याचे त्याने सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ आणि २५ तारखेला भारत भेटीवर येत आहेत तर, कृष्णाला आपल्या दैवताला भेटायचे असून त्यासाठी त्याने केंद्र सरकारकडे परवानगी देखील मागितली आहे.

The post काय सांगता ! होय, स्वप्नात डोनाल्ड ट्रम्प आल्यानं ‘कृष्णा’नं मंदिरच बांधलं, आता करतोय 6 फुट मूर्तीची ‘पुजा’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
230913
जापानमध्ये झाला Naked Festival, कडाक्याच्या थंडीत कपड्यांविना धावले लोक https://policenama.com/japan-annual-naked-festival-hadaka-matsuri-celebrated/ Wed, 19 Feb 2020 05:52:33 +0000 https://policenama.com/?p=230760 Naked Festival
Naked Festival

टोकियो : वृत्तसंस्था – जापानमधील होन्शु बेटावर शनिवारी एक असा कार्यक्रम झाला, ज्याबाबत जाणून घेतल्यास कुणालाही आश्चर्य वाटेल. या बेटावर एक नेकेड फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भाग घेण्यासाठी जगभरातूनही लोक आले होते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या इव्हेंटचे नाव Hadaka Matsuri आहे. हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी सायदायजी कन्नोनिन मंदिरात आयोजित […]

The post जापानमध्ये झाला Naked Festival, कडाक्याच्या थंडीत कपड्यांविना धावले लोक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Naked Festival
Naked Festival

टोकियो : वृत्तसंस्था – जापानमधील होन्शु बेटावर शनिवारी एक असा कार्यक्रम झाला, ज्याबाबत जाणून घेतल्यास कुणालाही आश्चर्य वाटेल. या बेटावर एक नेकेड फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भाग घेण्यासाठी जगभरातूनही लोक आले होते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या इव्हेंटचे नाव Hadaka Matsuri आहे.

हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी सायदायजी कन्नोनिन मंदिरात आयोजित केला जातो. या कार्यक्रमात पुरुष कमीतकमी कपड्यांमध्ये आले. बहुतांश पुरूषांनी जापानी लंगोट घातले होते.

या गेममधून बाहेर येता-येता जखमी होतात लोक
हा एक शेतातील पिकाच्या संदर्भातील उत्सव आहे. तरूण पीढीमध्ये शेती आणि शेतकरी यांच्याबाबत आवड निर्माण करणे, हा यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमात पुरुष मंदिराच्या चारही बाजूने धावतात आणि स्वताला थंड पाण्याने शुद्ध करतात. यानंतर ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातात. नंतर सर्वांना दोन लकी स्टीक शोधाव्या लागतात, ज्या मंदिराचे पुजारी 100 अन्य बंडल्ससोबत फेकतात. या स्टिक्स शोधण्याच्या दरम्यान अनेकजण जखमी होतात, तसेच गेममधून बाहेर पडता-पडता जखमी होतात. या कार्यक्रमाशी संबंधित एका प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ही परंपरा पुढेही सुरू ठेऊ. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जपानच्या नागरिकांसह जगभरातून लोक येतात.

The post जापानमध्ये झाला Naked Festival, कडाक्याच्या थंडीत कपड्यांविना धावले लोक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
230760
IAS ‘वर’ आणि IPS ‘वधू’ला मिळत नव्हता ‘वेळ’, ऑफिसमध्येच उरकलं ‘लग्न’ https://policenama.com/unable-to-get-time-out-of-their-work-schedules-couple-decided-to-get-married-in-office/ Mon, 17 Feb 2020 15:17:09 +0000 https://policenama.com/?p=229939 Tushar Singla
Tushar Singla

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. असेही सगळ्यांनीच आपल्या लग्नाविषयी प्रचंड स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या लग्नात इतरांपेक्षा वेगळं काय करता येईल याचाच विचार बऱ्यापैकी जोडपी करत असतात. मात्र एका अधिकारी जोडप्यानं एक आगळं वेगळं लग्न केलं आहे. आयएएस अधिकारी तुषार सिंगला यांनी आपली प्रेयसी आयपीएस नवजोत सिम्मी […]

The post IAS ‘वर’ आणि IPS ‘वधू’ला मिळत नव्हता ‘वेळ’, ऑफिसमध्येच उरकलं ‘लग्न’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Tushar Singla
Tushar Singla

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. असेही सगळ्यांनीच आपल्या लग्नाविषयी प्रचंड स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या लग्नात इतरांपेक्षा वेगळं काय करता येईल याचाच विचार बऱ्यापैकी जोडपी करत असतात. मात्र एका अधिकारी जोडप्यानं एक आगळं वेगळं लग्न केलं आहे.

आयएएस अधिकारी तुषार सिंगला यांनी आपली प्रेयसी आयपीएस नवजोत सिम्मी यांच्याशी ऑफिसमध्येच लग्न केलं आहे. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विवाहासाठी त्यांना वेळ भेटत नसल्याने त्यांनी व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधून ऑफिसमध्येच रजिस्टर पद्धतीने झटपट लग्न केलं आहे.

Geplaatst door Tushar Singla op Vrijdag 14 februari 2020

आयएएस अधिकारी तुषार सिंगला हे २०१५ च्या बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत. तर आयपीएस अधिकारी नवजोत सिम्मी या २०१७ बॅचच्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. तुषार सिंगला हे सध्या उलुबेरियामध्ये एसडीओ म्हणून काम पाहत आहेत. तर नवजोत सिम्मी या पाटण्यामध्ये डीएसपी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान नवजोत या लग्नासाठी पाटण्याहून बंगालला आल्या होत्या.

तुषार आणि नवजोत हे पंजाब येथील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र विविध अडथळ्यांमुळे त्यांना विवाहबद्ध होता आले नाही. त्यांच्या व्यस्त असणाऱ्या शेड्युलमुळे त्यांना वेळ काढणे फार कठीण जात होते. अखेर त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वेळात वेळ काढला आणि ऑफिसमध्येच विवाहबंधनात अडकले. यापुढे एकत्र राहता यावे यासाठी दोघे केडर बदलणार असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान या झटपट झालेल्या लग्नामुळे त्यांच्या मित्रमंडळींना लग्नाला येता आले नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमधील २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांना लग्नाची पार्टी देण्यात येणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

The post IAS ‘वर’ आणि IPS ‘वधू’ला मिळत नव्हता ‘वेळ’, ऑफिसमध्येच उरकलं ‘लग्न’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
229939
73 वर्षाचा वर अन् 67 ची वधू ! ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहिले 50 वर्ष, आता मुलांनी लावलं ‘लग्न’ https://policenama.com/kawardha-groom-of-73-bride-of-67-50-years-live-in-relationship-now-children-got-them-married/ Mon, 17 Feb 2020 07:59:48 +0000 https://policenama.com/?p=229673 marriage
marriage

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात एक आगळेवेगळे लग्न झाले. येथे, ७३ वर्षीय वराने एका ६७ वर्षीय वधू बरोबर लग्न केले आहे. जी इच्छा ५० वर्षांपूर्वी त्यांना होती, ती इच्छा आता मुलाने पूर्ण केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करताना मुलाने हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचे ऐतिहासिक पद्धतीने लग्न लावून दिले. शेकडो लोक या […]

The post 73 वर्षाचा वर अन् 67 ची वधू ! ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहिले 50 वर्ष, आता मुलांनी लावलं ‘लग्न’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
marriage
marriage

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात एक आगळेवेगळे लग्न झाले. येथे, ७३ वर्षीय वराने एका ६७ वर्षीय वधू बरोबर लग्न केले आहे. जी इच्छा ५० वर्षांपूर्वी त्यांना होती, ती इच्छा आता मुलाने पूर्ण केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करताना मुलाने हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचे ऐतिहासिक पद्धतीने लग्न लावून दिले. शेकडो लोक या लग्नाचे साक्षीदार झाले आहेत. कवर्धा जिल्ह्यातील खैरझीती गावात राहणाऱ्या ७३ वर्षीय सुकाल निषाद आणि ६७ वर्षीय गौतरहीन बाई निषाद यांचे १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे वर प्रेम विवाह झाला. या जोडप्याला तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी असून त्या तिघांचे लग्नही झाले आहे.

खरं तर सुकाल राम यांना वाईट वाटत होते की त्यांचे लग्न रितीरिवाजाने आणि धुमधडाक्यात झाले नव्हते. या संदर्भात गावात अशी चर्चा होती की, मृत्यूनंतर त्यांना मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणूनच त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या आणि परिवारातील सगळ्यांच्या मर्जीने गावात चालू असलेल्या नवधा रामायण स्थळावर सर्वांच्या सहमतीने वरमाळांचा कार्यक्रम केला. त्यानंतर हळद लावण्यात आली आणि परंपरेनुसार त्यांचे लग्न लावण्यात आले. या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

एक जगावेगळी प्रेमकहाणी
या प्रेमकथेची सुरुवात ५० वर्षांपूर्वी सुरू झाली होती, जेव्हा सुकाल राम आपल्या मित्रासाठी मुलगी पाहण्यासाठी बेमेतरा जिल्ह्यातील बिरसिंघी या गावी गेले होते. ज्या मुलीला पाहण्यासाठी ते गेले होते, त्या मुलीचीच धाकटी बहीण गौतरहीन निषाद होती, जी की सुकाल यांना आवडली होती. पण त्यावेळी सुकाल यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने दोघांचे लग्न होऊ शकले नाही. मात्र नंतर सुकालने लग्न न करताच गौतरहीनला पत्नी म्हणून घरी आणले होते.

सुकाल राम यांचा मुलगा धन्नू निषाद याने सांगितले की, लग्न न केल्यास मोक्षप्राप्ती होत नाही. त्यामुळे गावातील आणि कुटुंबातील सगळ्यांच्या मर्जीने हे लग्न लावण्यात आले. सर्वांनी या लग्नात हजेरी लावली आणि रितीरिवाजाप्रमाणे वरात काढून धुमधडाक्यात हे लग्न लावण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की, आधी काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नव्हते. गावात चर्चा होती की ते जर लग्न न करताच मृत्यू पावले तर त्यांचा आत्मा गावात वास करणार. त्यामुळे सगळ्यांच्या मर्जीने पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे लग्न लावण्यात आले.

The post 73 वर्षाचा वर अन् 67 ची वधू ! ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहिले 50 वर्ष, आता मुलांनी लावलं ‘लग्न’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
229673
‘या’ महिलेनं वर्षभरात पाणी ‘पिलं’ नाही, शरीरात झाले ‘हैराण’ करणारे ‘बदल’ https://policenama.com/indonesia-woman-claims-not-to-drink-water-for-a-year-says-its-changed-her-life/ Fri, 14 Feb 2020 15:33:30 +0000 https://policenama.com/?p=228495 Sophie Partik
Sophie Partik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पाणी हे जीवन’ असे कायमच म्हणले जाते. परंतु तुम्हाला विश्वास बसेल का की एका महिलेने मागील 1 वर्षांपासून पाणीच प्यायले नाही आणि तरी ती जिवंत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे की तिने मागील 1 वर्षांपासून पाणीच प्यायले नाही आणि त्यामुळे तिच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. […]

The post ‘या’ महिलेनं वर्षभरात पाणी ‘पिलं’ नाही, शरीरात झाले ‘हैराण’ करणारे ‘बदल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Sophie Partik
Sophie Partik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पाणी हे जीवन’ असे कायमच म्हणले जाते. परंतु तुम्हाला विश्वास बसेल का की एका महिलेने मागील 1 वर्षांपासून पाणीच प्यायले नाही आणि तरी ती जिवंत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे की तिने मागील 1 वर्षांपासून पाणीच प्यायले नाही आणि त्यामुळे तिच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत.

या 35 वर्षीय महिलेचे नाव सोफी पार्तिक आहे. ती व्यवसायाने योगा टीचर आणि न्यूट्रीशियनिस्ट (आहार तज्ज्ञ) आहे. सोफीचा दावा आहे की तिने मागील एक वर्षांपासून पाणीच प्यायले नाही. यामुळे तिच्या आरोग्यात बरीच सुधारणा झाली आणि ती पहिल्यापेक्षा जास्त तंदुरुस्त झाली. पाण्याऐवजी ती फळं खाते आणि ज्यूस पिते. याशिवाय ती नारळ पाणी देखील पिते.

सोफी सांगते की ती पहिल्यांदा चेहऱ्यावर सूज, फूड अ‍ॅलर्जी, त्वचा आणि पचन क्रियेमुळे त्रस्त होती. बरेच उपाय केले परंतु फायदा झाला नाही. यानंतर एका मैत्रिणीने तिला ड्राय फास्टिंग करण्यास सांगितले. ड्राय फास्टिंग म्हणजे पाण्याशिवाय राहायचे. ती म्हणाली की यामुळे तिला बराच आराम मिळाला.

ती आतापर्यंत कोणताही द्रवपदार्थ न घेता 52 तास राहिली आहे. आता तिला कोणत्याही द्रव पदार्थशिवाय 10 दिवस राहायचे आहे. पाण्याबद्दल सोफीचा विचार पूर्ण बदलला आहे. तिचे म्हणणे आहे की लोकांच्या मनाचा हा भ्रम आहे की लोक पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. जर आपण संयम ठेवला तर आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो.

सोफी म्हणाली की तिचे कुटूंब देखील हैराण आहे की ती इतके दिवस पाण्याशिवाय कशी जिवंत राहते. सोफी म्हणते की ड्राय फास्टिंग करुन तिला जाणीव झाली की तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता नाही, आपण पाण्याशिवाय जगू शकतो.

The post ‘या’ महिलेनं वर्षभरात पाणी ‘पिलं’ नाही, शरीरात झाले ‘हैराण’ करणारे ‘बदल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
228495
23 जणांना मिळाला ‘ड्रीम’ जॉब ! 9 तास झोपल्यावर मिळणार 1 लाख रूपये https://policenama.com/23-people-clinch-that-dream-job-sleep-9-hours-for-100-nights-earn-1-lakh-rupees/ Fri, 14 Feb 2020 13:32:01 +0000 https://policenama.com/?p=228585

The post 23 जणांना मिळाला ‘ड्रीम’ जॉब ! 9 तास झोपल्यावर मिळणार 1 लाख रूपये appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बेंगळुरू (Bengaluru) मधील स्टार्टअप कंपनी वेकफिटने ड्रॉच्या माध्यमातून १.७ लाख अर्जांपैकी २१ भारतीय आणि दोन परदेशी यांची झोपण्याच्या नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. या निवड करण्यात आलेल्या लोकांना १०० दिवसांसाठी रात्री ९ तास झोपावे लागेल आणि यासाठी कंपनी एक लाख रुपये देणार आहे. ही निवडलेली लोकं कंपनीच्या गादीवर झोपतील. तसेच ते स्लीप ट्रॅकर्स आणि तज्ञ यांच्यासमवेत समुपदेशन सत्रातही सहभागी होतील. या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या लोकांना व्हिडिओ पाठवावा लागेल. आणि त्यांना हे देखील सांगावे लागणार आहे की त्यांना झोपायला किती आवडते.

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, ‘आपण फक्त झोपण्याचे काम करा, जितका वेळ तुम्हाला झोपता येईल, तितका वेळ तुम्ही झोपू शकता. तुम्ही फक्त आराम करा, बाकी सर्व आमच्यावर सोडा.’

या लोकांना काय करावे लागेल
निवडण्यात आलेल्या २३ लोकांना एक स्लीप ट्रॅकर देखील देण्यात येईल. यांना कंपनीद्वारा देण्यात आलेल्या गादीवर १०० दिवसांसाठी ९ तास आणि आठवड्यातून ७ रात्री झोपावं लागणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की २१ भारतीय हे मुंबई, बेंगळुरू, आग्रा, नोएडा, दिल्ली, गुरुग्राम, चेन्नई, पुणे, भोपाळ येथून निवडण्यात आलेले आहेत. तसेच एक व्यक्ती अमेरिका आणि एक स्लोवाकिया येथून निवडण्यात आला आहे.

या नोकरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला आपली आधीची परमनंट नोकरी सोडण्याची आवश्यकता नाही. तसेच घरी राहूनच रोजमितीचे काम उरकून ही नोकरी करता येणार आहे. तसेच लिंक्डिन (Linkedin) वर झोपण्याच्या या ड्रीम जॉब ला सर्वात जास्त सर्च केले गेले आहे. २६ नोव्हेंबर २०१९ ला या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. लाखो अनुप्रयोगांद्वारे प्राप्त झालेले व्हिडिओ पाहून या लोकांना निवडले गेले आहे.

शेवटच्या फेरीत चार जज, अभिनेते व लेखक शिवांकित सिंग परिहार, अभिनेता नवीन कौशिक, टीव्ही अँकर सायरस ब्रोचा (टीव्ही अँकर) आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांना निवडण्यात आले.

वेकफिट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडने लोकांच्या झोपेच्या पद्धतींवर नजर ठेवण्यासाठी ‘स्लीप इंटर्नशिप’ सुरू केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या इंटर्नशिपसाठी एक गणवेश देखील आहे, तुमचा ड्रेस कोड ‘पायजामा’ आहे. वेकफिटचे संचालक आणि सहसंस्थापक चैतन्य रामलिंग गौडा म्हणाले की झोपेची इंटर्नशिप ही निरोगी झोपेकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ते म्हणाले की झोप ही आपल्या जीवनात कार्य संतुलन राखण्यासाठीचा एक अविभाज्य घटक आहे.

The post 23 जणांना मिळाला ‘ड्रीम’ जॉब ! 9 तास झोपल्यावर मिळणार 1 लाख रूपये appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
228585
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेन्डला दिलं 1200 कोटींचं अलिशान घर https://policenama.com/amazon-ceo-jeff-bezos-broken-california-record-most-expensive-home-purchase-165-us-dollar-million-beverly-hills-mansion/ Thu, 13 Feb 2020 14:55:36 +0000 https://policenama.com/?p=228134 jeff bezos
jeff bezos

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सर्वात श्रीमंत आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) चे संस्थापक-सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) ने अमेरिकेच्या लॉस अँजेलिस मध्ये १६.५ कोटी डॉलर (जवळपास १२०० कोटींपेक्षा अधिक) चे आलिशान घर खरेदी केले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जेफ बेझोस ची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेज नवीन घर घेण्याच्या तयारीत होती. तिने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे घर […]

The post जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेन्डला दिलं 1200 कोटींचं अलिशान घर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
jeff bezos
jeff bezos

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सर्वात श्रीमंत आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) चे संस्थापक-सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) ने अमेरिकेच्या लॉस अँजेलिस मध्ये १६.५ कोटी डॉलर (जवळपास १२०० कोटींपेक्षा अधिक) चे आलिशान घर खरेदी केले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जेफ बेझोस ची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेज नवीन घर घेण्याच्या तयारीत होती. तिने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे घर पसंत केले होते.

एका अहवालात म्हटले आहे की हा लॉस अँजेलिस मधील संपत्तीच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. याअगोदर २०१९ मध्ये लाशन मर्डोक ने बेल एअर इस्टेट ला खरेदी करण्यासाठी जवळपास १५ कोटी डॉलर मोजले होते. अमेरिकेची मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) चे सीईओ जेफ बेझोस यांची संपत्ती १३ फेब्रुवारी रोजी १३१.३ अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे समोर आले. सध्या तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

काय खास आहे
हे घर जवळपास नऊ एकरा मध्ये पसरलेले आहे. एका अहवालात म्हटले आहे की आर्किटेक्चरल डायजेस्टच्या १९९२ च्या एका कथेत वॉर्नर इस्टेटचा उल्लेख आहे. त्यानुसार, ही हवेली १३,६०० चौरस फूट जॉर्जियन स्टाईलमध्ये तयार केली गेली आहे.

यामध्ये एक विस्तीर्ण टेरेस आणि गार्डन आहे. याशिवाय वॉर्नर इस्टेटमध्ये दोन गेस्ट हाऊस, नर्सरी आणि तीन हॅथहाउस, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, ९ होल गोल्फ कोर्स, मोटर कोर्ट, सर्व्हिस गॅरेज आणि गॅस पंप आहेत.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, हे लॉस अँजेलिस मधील प्रॉपर्टीच्या बाबतचे नवीन रेकॉर्ड आहे. या आलिशान घराचे नाव ‘वॉर्नर इस्टेट’ आहे. हे वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी १९३० मध्ये बांधले होते.

The post जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेन्डला दिलं 1200 कोटींचं अलिशान घर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
228134
‘या’ मजूराची रात्रीतून बदलली ‘लाईफ’, बनला करोडपती अन् मिळाले 12 कोटी https://policenama.com/kerala-tribal-man-wins-12-crore-rupees-bumper-lottery/ Wed, 12 Feb 2020 10:52:23 +0000 https://policenama.com/?p=227548 p rajan
p rajan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील कन्नूर येथील एका मजुराचे आयुष्य रात्रीतून पालटले आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या पेरून्नन राजनला एक-दोन नव्हे तर 12 कोटींची लॉटरी लागली आहे. टॅक्स कपात झाल्यानंतरही त्यांना किमान 7 कोटी मिळणार आहे. जिंकलेल्या पैशातून राजनला आपल्या कुटूंबानंतर गरजूंसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. पेरुन्नन राजन (वय 58) हा कन्नूरमधील मालूरमधील थोलांबरा परिसरातील […]

The post ‘या’ मजूराची रात्रीतून बदलली ‘लाईफ’, बनला करोडपती अन् मिळाले 12 कोटी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
p rajan
p rajan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील कन्नूर येथील एका मजुराचे आयुष्य रात्रीतून पालटले आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या पेरून्नन राजनला एक-दोन नव्हे तर 12 कोटींची लॉटरी लागली आहे. टॅक्स कपात झाल्यानंतरही त्यांना किमान 7 कोटी मिळणार आहे. जिंकलेल्या पैशातून राजनला आपल्या कुटूंबानंतर गरजूंसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.

पेरुन्नन राजन (वय 58) हा कन्नूरमधील मालूरमधील थोलांबरा परिसरातील रहिवासी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही तो दररोज लॉटरी खरेदी करतो. एक दिवस नशीब नक्कीच आपली साथ देईल, असा त्याचा विश्वास होता. शेवटी, त्याचे नशिब 10 फेब्रुवारी रोजी चमकले आणि त्याला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली.

राजन यांनी ‘केरळ ख्रिसमस न्यू इयर बम्पर’ लॉटरी खरेदी केली. सोमवारी याचा ड्रॉ लागला. ज्यामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. राजन म्हणाले कि, ‘जेव्हा लॉटरीचा निकाल जाहीर झाला, तेव्हा माझ्या नावावर पहिले बक्षीस मिळेल, अशी मला मुळीच अपेक्षा नव्हती. बँकेत तिकिट जमा करण्यापूर्वी मी अनेक वेळा निकाल तपासला होता. यानंतर राजन लॉटरीच्या पुरस्कारासाठी सहकारी बँकेत गेला, तेथे अधिकाऱ्यांनी त्याला लॉटरीचे तिकीट कन्नूर जिल्हा बँकेत जमा करण्यास सांगितले. काही दिवसांत संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर लॉटरीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

पैशांनी चुकवणार कर्ज :
लॉटरीच्या पैशापूर्वी राजनला कर्ज फेडण्याची इच्छा आहे. तो म्हणाला, माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. पहिल्यांदा मी तो हिशेब चुकता करेल. मग कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीन. थोड्या पैशांनी मला गरजूंसाठी काहीतरी करावेसे वाटते. राजन म्हणाला की, घामाचे मूल्य माहित आहे आणि पैसे मिळवणे सोपे नाही हेही त्यांना माहित आहे. म्हणून ते पैसे वाया घालवणार नाहीत.

The post ‘या’ मजूराची रात्रीतून बदलली ‘लाईफ’, बनला करोडपती अन् मिळाले 12 कोटी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
227548
अनेक वर्षांनी संपला ‘बरेली’च्या झुमक्याचा शोध, शेवटी तो मिळालाच…! https://policenama.com/bareilly-jhumka-installed-in-bareilly-by-the-help-of-bareilly-development-authority-uphs-upns/ Mon, 10 Feb 2020 06:20:37 +0000 https://policenama.com/?p=226343 barelli
barelli

बरेली : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षांपूर्वी आलेल्या मेरा साया चित्रपटातील गाणे झुमका गिरा रे…आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या सुपरहिट गाण्यामुळे बरेली जिल्ह्याचे नाव लोकांच्या मनावर ठसले. या गाण्यात बरेलीच्या ज्या झुमक्याचा शोध घेतला जाता होता, तो शोध आता संपला आहे. बरेलीमध्ये एनएच-24च्या झिरो पॉईंटवर ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात तेथे झुमका चौक बनवण्यात […]

The post अनेक वर्षांनी संपला ‘बरेली’च्या झुमक्याचा शोध, शेवटी तो मिळालाच…! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
barelli
barelli

बरेली : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षांपूर्वी आलेल्या मेरा साया चित्रपटातील गाणे झुमका गिरा रे…आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या सुपरहिट गाण्यामुळे बरेली जिल्ह्याचे नाव लोकांच्या मनावर ठसले. या गाण्यात बरेलीच्या ज्या झुमक्याचा शोध घेतला जाता होता, तो शोध आता संपला आहे. बरेलीमध्ये एनएच-24च्या झिरो पॉईंटवर ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात तेथे झुमका चौक बनवण्यात आला आहे. या चौकात एक मोठा झुमका लावण्यात आला आहे. शनिवारी (8 फेब्रुवारी) ला सायंकाळी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी या झुमका चौकाचे लोकार्पण केले. महिलांचे सौंदर्य खुलवणारा झुमका आता बरेलीची शान वाढवत आहे.

बरेली नगरपालिकेने हा झुमका चौक तयार केला आहे, जेथे एक भव्य झुमका लावण्यात आला आहे. मेरा साया चित्रपटातील गाण्याला सिल्व्हर ज्युबली म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाल्याने हा झुमका लावण्यात आला आहे.

नगरपालिकेची ही योजना असून अभिनेत्री साधना यांना श्रद्धांजलीसुद्धा वाहण्यासाठी हा उपक्रम होता, परंतु झुमका लावण्यासाठी येणार्‍या खर्च मोठा असल्याने व बीडीएकडे तेवढा निधी नसल्याने झुमका लावण्यासाठी बरेलीच्या लोकांकडे सहकार्य मागण्यात आले. यानंतर बीडीएने शेवटी झुमका लावला.

The post अनेक वर्षांनी संपला ‘बरेली’च्या झुमक्याचा शोध, शेवटी तो मिळालाच…! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
226343