महत्वाच्या बातम्या – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Tue, 26 May 2020 09:18:40 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 महत्वाच्या बातम्या – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 LIC नं पुन्हा लॉन्च केली मोदी सरकारची स्कीम, 12000 पर्यंत मिळणार पेन्शन, जाणून घ्या https://policenama.com/lic-pmvvy-or-pm-vaya-vandana-extended-senior-citizens-low-interest-rate-know-about-scheme/ Tue, 26 May 2020 09:18:40 +0000 https://policenama.com/?p=279837 LIC
LIC

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) सुरू केली. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती, परंतु भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ती पुन्हा एकदा सुरु केली आहे. आपण आजपासून म्हणजेच मंगळवारपासून या योजनेत सामील होऊ शकता. सुधारित प्रधानमंत्री वय वंदन योजनेत […]

The post LIC नं पुन्हा लॉन्च केली मोदी सरकारची स्कीम, 12000 पर्यंत मिळणार पेन्शन, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
LIC
LIC

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) सुरू केली. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती, परंतु भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ती पुन्हा एकदा सुरु केली आहे. आपण आजपासून म्हणजेच मंगळवारपासून या योजनेत सामील होऊ शकता. सुधारित प्रधानमंत्री वय वंदन योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या योजनेच्या व्याज दर, गुंतवणूक आणि पेन्शनच्या रकमेमध्येही बदल झाला आहे. एलआयसी अंतर्गत या योजनेत निवृत्तीवेतन म्हणून सुमारे 12 हजार रुपये प्राप्त होत आहेत. त्याचबरोबर या योजनेची अंतिम मुदत मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जाणून घेऊया या योजनेसंदर्भात….

पेन्शन योजनेमुळे वयाच्या 60 व्या वर्षांनंतरच तुम्हाला लाभ मिळू शकेल. या योजनेअंतर्गत, दरमहा 12,000 रुपये पेन्शनसाठी सुमारे 15.66 लाख रुपये आणि किमान 1000 रुपये निवृत्तीवेतनासाठी 1.62 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर पेन्शनसाठी गुंतवणूकदारास निश्चित तारीख, बँक खाते व कालावधी निवडायचा आहे. म्हणजेच, जर आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पेन्शन पाहिजे असेल तर ही तारीख निवडली जावी. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना हवे असल्यास निवृत्तीवेतनाचा पर्यायदेखील निवडता येतो. म्हणजे तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन हवे असल्यास आपण हा पर्याय निवडू शकता. आपण मासिक पर्याय निवडल्यास, पेन्शन दरमहा बँक खात्यात येईल. मात्र तिमाही निवडीवर दर तीन महिन्यांनी एकत्र पेन्शन मिळते.

त्याचप्रमाणे सहामाही किंवा वार्षिक निवडीनंतर तुम्हाला अनुक्रमे 6 किंवा 12 महिन्यांनंतर एकत्र पेन्शन मिळेल. दरम्यान योजनेतील गुंतवणूकीच्या 1 वर्षानंतर निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्राप्त मिळतो. ही योजना चालविण्याचा एकाधिकार एलआयसीचीला आहे. हे एलआयसी वेबसाइटवरून ऑफलाइन तसेच ऑनलाईनही खरेदी करता येईल. या योजनेचा मुदतपूर्व कालावधी 10 वर्षे आहे. यामध्ये पहिल्या वर्षी 7.40 टक्के हमी परतावा देण्यात येईल.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपण 022-67819281 किंवा 022-67819290 वर कॉल करू शकता. या व्यतिरिक्त टोल फ्री क्रमांकावर 1800-227-717 आणि onlinedmc@licindia.com या ईमेल आयडीच्या माध्यमातून योजनेचे फायदे जाणून घेऊ शकता. https://licindia.in/Products/Pradhan-Mantri-Jan-Dhan- Yojana या वेबसाइटला भेट देऊन माहिती देखील मिळवू शकता.

The post LIC नं पुन्हा लॉन्च केली मोदी सरकारची स्कीम, 12000 पर्यंत मिळणार पेन्शन, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279837
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा ठाकरे सरकारवर ‘हल्लाबोल’, म्हणाले… https://policenama.com/there-is-no-leadership-remarks-piyush-goyal-as-he-quashes-maharashtra-governments-baseless-claims-shramik-railway/ Tue, 26 May 2020 07:40:21 +0000 https://policenama.com/?p=279767 piyush goyal
piyush goyal

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनोच्या लढ्यात महाराष्ट्रात प्रशासन कोलमडले असून राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा हल्लाबोल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाकयुद्ध आता पेटले आहे. कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे काही श्रमिक कामगारांनी राज्याची पायी वाट धरली होती. सरकारने त्यांच्यासाठी रेल्वेसेवा सुरू करत त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु गेल्या काही […]

The post केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा ठाकरे सरकारवर ‘हल्लाबोल’, म्हणाले… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
piyush goyal
piyush goyal

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनोच्या लढ्यात महाराष्ट्रात प्रशासन कोलमडले असून राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा हल्लाबोल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाकयुद्ध आता पेटले आहे. कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे काही श्रमिक कामगारांनी राज्याची पायी वाट धरली होती. सरकारने त्यांच्यासाठी रेल्वेसेवा सुरू करत त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र सरकारने श्रमिक रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याच्या केलेल्या आरोपाचे गोयल यांनी खंडन केले हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही. याव्यतिरिक्त ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्य सचिव आणि नोडल अधिकार्‍यांच्या संपर्कात होते. महाराष्ट्राला त्वरित 125 रेल्वेगाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला असतानाही आम्हाला त्वरित यादी मिळावी यासाठी राज्य सरकारला यादी तयार ठेवण्याचीही विनंती केली. महाराष्ट्राला हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या पुरवण्याची आमची तयारी आहे. परंतु सरकारडे यादी तयार नाही ही वाईट बाब आहे. सध्या हे श्रमिक प्रवासी कुठे आहेत याबाबतही माहिती नाही. रेल्वे प्रशासानाने सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रेल्वेगाड्या हव्या आहेत यासाठी यादी सोपवण्याची विनंती केली. परंतु राज्य सरकारकडून कोणतेही एकत्रित उत्तर मिळाले नाही, असा दावा त्यांनी केला.

The post केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा ठाकरे सरकारवर ‘हल्लाबोल’, म्हणाले… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279767
केंद्र सरकारने आखली योजना ! 30 % हजेरीसोबत शाळा सुरु होण्याची शक्यता https://policenama.com/coronavirus-lockdown-schools-to-reopen-zone-wise-in-india-in-july-with-30-attendance/ Tue, 26 May 2020 07:15:16 +0000 https://policenama.com/?p=279768 coronavirus lockdown
coronavirus lockdown

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा कहर सुरु असतानाही आता केंद्र सरकार झोन प्रमाणे शाळा पुन्हा सुरु कऱण्याचा विचार करत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. सातवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांनाच बोलावले जाऊ शकते. प्राथमिक वर्गाच्या (पहिली ते सातवी) विद्यार्थ्यांना जोपर्यंत शाळा पूर्णपणे सुरु होत नाहीत तोपर्यंत घरीच थांबण्यास […]

The post केंद्र सरकारने आखली योजना ! 30 % हजेरीसोबत शाळा सुरु होण्याची शक्यता appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
coronavirus lockdown
coronavirus lockdown

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा कहर सुरु असतानाही आता केंद्र सरकार झोन प्रमाणे शाळा पुन्हा सुरु कऱण्याचा विचार करत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. सातवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांनाच बोलावले जाऊ शकते. प्राथमिक वर्गाच्या (पहिली ते सातवी) विद्यार्थ्यांना जोपर्यंत शाळा पूर्णपणे सुरु होत नाहीत तोपर्यंत घरीच थांबण्यास सांगितले जाणार असल्याची शक्यता आहे.

कोरोनात लहान मुलांकडून सुरक्षेचे कडक नियम पाळण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. यासाठी सुरक्षेच्या हेतूने त्यांना घरातच थांबवण्यास सांगितलं जाणार आहे. घरातूनच त्यांना अभ्यास करण्यास सांगितले जाणार आहे. शाळा पुन्हा सुरु करण्यासंबंधी अधिकृत सूचना पुढील आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व संबंधित मंत्रालयांचं एकमत झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शाळा सुरु होण्यासाठी तारीख ठरवण्यात आली असून जुलै महिन्यात विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो. 30 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत शाळा सुरु कऱण्यात येतील. शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु झाल्यानंतर मोठे कार्यक्रम घेण्यावर बंधने राहणार आहेत. सोशल डिस्टन्स नियमांंचे पालन व्हावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुरक्षेचे नियम पाळत शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले होते.

The post केंद्र सरकारने आखली योजना ! 30 % हजेरीसोबत शाळा सुरु होण्याची शक्यता appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279768
Lockdown : आर्थिक संकटात अडकलं जगातील सर्वात ‘धनवान’ तिरूपती बालाजी मंदिर, ‘संपत्ती’ लिलाव करण्यासाठी बनवली योजना https://policenama.com/business-tirupati-temple-trust-to-auction-immovable-properties/ Mon, 25 May 2020 16:16:48 +0000 https://policenama.com/?p=279664 tirupati-balaji-mandir
tirupati-balaji-mandir

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिरुपती बालाजी मंदिर चालवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या मते, कोरोना विषाणू लॉकडाऊनमुळे मंदिर व्यवस्थापनाला आतापर्यंत 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंदिरातील 8 टन सोन्याचे आणि 14,000 कोटींच्या एफडीला स्पर्श न करता कर्मचार्‍यांचे पगार कसे द्यायचे यावर व्यवस्थापन काम करीत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आपल्या 50 स्थावर मालमत्तांचा लिलाव […]

The post Lockdown : आर्थिक संकटात अडकलं जगातील सर्वात ‘धनवान’ तिरूपती बालाजी मंदिर, ‘संपत्ती’ लिलाव करण्यासाठी बनवली योजना appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
tirupati-balaji-mandir
tirupati-balaji-mandir

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिरुपती बालाजी मंदिर चालवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या मते, कोरोना विषाणू लॉकडाऊनमुळे मंदिर व्यवस्थापनाला आतापर्यंत 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंदिरातील 8 टन सोन्याचे आणि 14,000 कोटींच्या एफडीला स्पर्श न करता कर्मचार्‍यांचे पगार कसे द्यायचे यावर व्यवस्थापन काम करीत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आपल्या 50 स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. या मालमत्ता तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आहेत. टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की लिलावासाठी चिन्हित केलेल्या मालमत्तांमध्ये छोटी घरे, प्‍लॉट आणि शेतजमीन यांचा समावेश आहे. ते म्हणाले की या मालमत्ता अनेक दशकांपूर्वी भक्तांनी मंदिराला दान केल्या होत्या.

टीटीडीला यांची देखभाल करणे अवघड होत आहे आणि त्यांपासून कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. त्यामुळे टीटीडीने त्यांचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिर व्यवस्थापनाला या लिलावातून सुमारे 24 कोटींचा महसूल मिळणार आहे, ज्याचा उपयोग कर्मचार्‍यांना पगार व इतर कामांसाठी करण्यात येणार आहे. सामान्य दिवसात मंदिरात 60 ते 80 हजार आणि सणाच्या दिवशी दररोज 1 लाख भाविक दर्शनासाठी येतात. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे मंदिराच्या व्यवस्थापनासाठी व संचलनासाठी वार्षिक 2500 कोटीचे बजेट आहे. दरमहा मंदिराचे उत्पन्न 200 ते 220 कोटी रुपये आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने मंदिरात कोणतेही उत्पन्न झाले नाही. टीटीडीने सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 3309.89 कोटी बजेट ठेवले आहे, परंतु मार्चमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे मंदिर बंद झाल्यानंतर देणगी म्हणून मिळणारी रक्कम, जी 150 ते 175 कोटी रुपये आहे, त्या रकमेचे नुकसान झाले आहे.

याशिवाय विशेष सेवा तिकिटे, विशेष दर्शनाची तिकिटे, प्रसाद आणि गेस्ट हाऊस देखील मंदिराच्या मोठ्या उत्पन्नाचे स्रोत आहेत, परंतु लॉकडाऊनमुळे यामधून मिळणारे उत्पन्नही जवळपास शून्य झाले आहे. या मंदिरात केस अर्पण करण्याची परंपरा आहे आणि केसांच्या लिलावातून मंदिर व्यवस्थापनाला वर्षाकाठी 400 कोटींची कमाई होते. हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये व इतर खर्चामध्ये दरवर्षी 1385.09 कोटी रुपये खर्च केले जातात. टीटीडीला आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारावर दरमहा 120 कोटी रुपये खर्च करावे लागतात. लॉकडाऊनच्या वेळी मिळणारे उत्पन्न हे शून्य आहे परंतु खर्च तेवढाच होत आहे. याशिवाय टीटीडीकडून चालवण्यात येणाऱ्या मोफत रुग्णालयांना वर्षाकाठी 400 कोटींचे अनुदान द्यावे लागते.

The post Lockdown : आर्थिक संकटात अडकलं जगातील सर्वात ‘धनवान’ तिरूपती बालाजी मंदिर, ‘संपत्ती’ लिलाव करण्यासाठी बनवली योजना appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279664
पृथ्वीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आगामी काळात बंद होतील तुमचे मोबाइल फोन ! https://policenama.com/your-mobile-phone-may-stop-working-as-earth-s-magnetic-field-is-weakening/ Mon, 25 May 2020 15:46:13 +0000 https://policenama.com/?p=279648 earth
earth

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पृथ्वीच्या एका भागात असलेले मॅग्नेटिक फिल्ड म्हणजेच चुंबकीय क्षेत्र कमजोर होत आहे. यामुळे तुमच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुमचा फोन काम करणे बंद करू शकतो. मॅग्नेटिक फिल्ड कमजोर झाल्याने सॅटेलाइटपासून अंतराळयानापर्यंत अनेक गोष्टी काम करणे बंद करू शकतात. शास्त्रज्ञांना अजून समजलेले नाही की, हे का होत […]

The post पृथ्वीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आगामी काळात बंद होतील तुमचे मोबाइल फोन ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
earth
earth

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पृथ्वीच्या एका भागात असलेले मॅग्नेटिक फिल्ड म्हणजेच चुंबकीय क्षेत्र कमजोर होत आहे. यामुळे तुमच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुमचा फोन काम करणे बंद करू शकतो. मॅग्नेटिक फिल्ड कमजोर झाल्याने सॅटेलाइटपासून अंतराळयानापर्यंत अनेक गोष्टी काम करणे बंद करू शकतात. शास्त्रज्ञांना अजून समजलेले नाही की, हे का होत आहे.

कमजोर झाली पृथ्वीची मॅग्नेटिक फिल्ड
पृथ्वीच्या एका मोठ्या भागात चुंबकीय शक्ती कमजोर झाली आहे. हा भाग सुमारे 10 हजार किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. या भागाच्या 3000 किलोमीटर खाली पृथ्वीच्या आऊटर कोरपर्यंत चुंबकीय क्षेत्राची शक्ती कमी झाली आहे. अफ्रिकापासून दक्षिण अमेरिकापर्यंत सुमारे 10 हजार किलोमीटर दूरपर्यंत पृथ्वीच्या आत मॅग्नेटिक फिल्डची ताकद कमी झाली आहे. सामान्यपणे ती 32 हजार नॅनोटेस्ला असायला हवी. परंतु, 1970 ते 2020 पर्यंत ती कमी होऊन 24 हजारवरून 22 हजार नॅनोटेस्ला पर्यंत पोहचली आहे. नॅनोटेस्ला हे चुंबकीय क्षमता मोजण्याचे परिमाण आहे.

आकडे पाहून शास्त्रज्ञांची चिंता वाढली
शास्त्रज्ञांना जो सॅटेलाईट डाटा मिळाला आहे, त्याने त्यांना चिंतेत टाकले आहे. अफ्रिका आणि साऊथ अमेरिकेच्यामध्ये कमजोर होणारी मॅग्नेटिक फिल्ड त्यांना अस्वस्थ करत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, मागच्या 200 वर्षांत पृथ्वीची चुंबकीय शक्ती कमी झाली आहे. अफ्रिकापासून दक्षिण अमेरिकापर्यंत चुंबकीय शक्तीमध्ये खुप कमतरता दिसून येत आहे. शास्त्रज्ञ यास साऊथ अटलांटिक अ‍ॅनोमली म्हणतात. शास्त्रज्ञांनुसार हा बदल दोनशे वर्षांपासून हळुहळु होत होता. यामुळेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची शक्ती कमी होत चालली आहे.

नाही होऊ शकणार सॅटेलाईटवरून कम्युनिकेशन
ही माहिती युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) च्या सॅटेलाईट स्वार्मकडून मिळाली आहे. पृथ्वीच्या या भागात चुंबकीय क्षेत्रात आलेल्या कमजोरीमुळे पृथ्वीच्या वरच्या भागात पाठवलेले सॅटेलाईट आणि उडणार्‍या विमानांसोबत कम्युनिकेशन करणे अवघड होऊ शकते. यामुळे मोबाइल फोन बंद होण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सामान्य लोकांना हे समजू शकत नाही, परंतु हे आपले रक्षण करते. अंतराळात खास करून सूर्याकडून येणारे हानिकारक शक्तिशाली चुंबकीय तरंग आणि इतर धोकादायक गोष्टी याच चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीपर्यंत पोहचत नाहीत. अन्यथा पृथ्वीवर राहणार्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

कसे तयार होते चुंबकीय क्षेत्र
असाच आणखी एक भाग आहे जो अफ्रिकेच्या पश्चिमेमध्ये आहे. म्हणजे याचे असे संकेत आहेत की, साऊथ अटलांटिक अनामोली दोन वेगवेगळ्या सेल्समध्ये विभागला जाऊ शकतो. ईएसएच्या माहितीनुसार, हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली बाहेरील भागात वाहणार्‍या गरम तरल लोखंडामुळे बनते. ईएसए शास्त्रज्ञांनी या भागात नुकतेच काही मोठे बदल स्पष्ट पाहिले आहेत.

The post पृथ्वीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आगामी काळात बंद होतील तुमचे मोबाइल फोन ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279648
‘या’ बँकेच्या 27 लाख ग्राहकांना झटका ! आता बचत खात्यावर इतके टक्के कमी मिळणार व्याज https://policenama.com/kotak-mahindra-bank-slashed-interest-rates-on-savings-account-after-rbi-cuts-repo-rate/ Mon, 25 May 2020 15:12:16 +0000 https://policenama.com/?p=279622 sbi
sbi

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रायव्हेट सेक्टरमधील कोटक महिंद्रा बँकेने सोमवारी सेव्हिंग्स बँक अकाऊंटमध्ये मिळणारे व्याज कमी करण्याची घोषणा केली. कोटक महिंद्राने हे पाऊल आरबीआयने व्याजदरात कपात केल्यानंतर उचलले आहे. बँकेने माहिती दिली की, नवे दर 25 मे 2020, सोमवार म्हणजे आजपासूनच लागू झाले आहेत. किती आहेत नवे व्याजदर कोटक महिंद्रा बँकेने केलेल्या या कपातीनंतर […]

The post ‘या’ बँकेच्या 27 लाख ग्राहकांना झटका ! आता बचत खात्यावर इतके टक्के कमी मिळणार व्याज appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sbi
sbi

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रायव्हेट सेक्टरमधील कोटक महिंद्रा बँकेने सोमवारी सेव्हिंग्स बँक अकाऊंटमध्ये मिळणारे व्याज कमी करण्याची घोषणा केली. कोटक महिंद्राने हे पाऊल आरबीआयने व्याजदरात कपात केल्यानंतर उचलले आहे. बँकेने माहिती दिली की, नवे दर 25 मे 2020, सोमवार म्हणजे आजपासूनच लागू झाले आहेत.

किती आहेत नवे व्याजदर
कोटक महिंद्रा बँकेने केलेल्या या कपातीनंतर आता बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर 1 लाखाच्या डिपॉझिटवर नवीन व्याज दर 3.5 टक्के आहे. तर, 1 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या डिपॉझिटवर 4 टक्के आहे.

याशिवाय, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट/स्मॉल अकाऊंट होल्डर्सना समान व्याज मिळेल. नॉन-रेसिडेंट (एनआरई/एनआरओ) सीनियर आणि नॉन-सीनियर ग्राहकांसाठी दर 3.50 टक्के असेल.

मागच्या आठवड्यातच आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता रेपो रेट कमी होऊन 4 टक्के झाला आहे.

मार्च तिमाहीत 10 टक्के कमी झाले बँकेचे प्रॉफिट
मार्च तिमाहीमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे नेट प्रॉफिट 10 टक्के घसरून 1,266 करोड रुपये झाले आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत ते 1,407.80 करोड रुपये होते. बँकेने माहिती दिली की, आर्थिक वर्षात सरासरी सेव्हिंग डिपॉझिट 21 टक्के वाढून 85,656 करोड रूपये झाले होते. मागच्या आर्थिक वर्षात हे 70,990 करोड रूपये होते.

कोटक महिंद्रा बँकेत सरासरी करन्ट अकाऊंट डिपॉझिट 17 टक्के वाढून 33,699 करोड रुपये होते. आर्थिक वर्ष 2019 मध्ये हे 28,742 करोड होते.

The post ‘या’ बँकेच्या 27 लाख ग्राहकांना झटका ! आता बचत खात्यावर इतके टक्के कमी मिळणार व्याज appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279622
Bank Holiday 2020 : आगामी 3 महिन्यांत बँका 30 दिवस ‘बंद’, इथं पहा सुट्टींची संपूर्ण यादी https://policenama.com/bank-holiday-list-of-june-july-august-2020-know-how-many-days-bank-closed-rbi-holiday-list-sbi-pnb-union-bank/ Mon, 25 May 2020 13:54:56 +0000 https://policenama.com/?p=279575 bank
bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये अनेकांनी दुकाने व कार्यालये बंद केली असली तरी बँका सातत्याने सुरू होत आहेत. तथापि बँका सुरू व बंद करण्याच्या वेळेत थोडा बदल झाला आहे. परंतु बँक कर्मचारी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये काम करताना दिसले. बँक सुट्टीबद्दल बघितले तर पुढील तीन महिन्यांत म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये बँका 30 दिवस बंद राहतील. […]

The post Bank Holiday 2020 : आगामी 3 महिन्यांत बँका 30 दिवस ‘बंद’, इथं पहा सुट्टींची संपूर्ण यादी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
bank
bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये अनेकांनी दुकाने व कार्यालये बंद केली असली तरी बँका सातत्याने सुरू होत आहेत. तथापि बँका सुरू व बंद करण्याच्या वेळेत थोडा बदल झाला आहे. परंतु बँक कर्मचारी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये काम करताना दिसले. बँक सुट्टीबद्दल बघितले तर पुढील तीन महिन्यांत म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये बँका 30 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्टीच्या यादीनुसार 3 महिन्यांत रक्षाबंधन, जन्माष्टमी, बकरी ईद यासारख्या सुट्टींचा समावेश आहे. यावेळी, खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच या तारखांविषयी आपल्याला माहिती असणे फार महत्वाचे आहे जेणेकरून आपण वेळेपूर्वी आपले काम पूर्ण करू शकाल. जून 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत कोणत्या दिवस बँका बंद राहतील ते जाणून घेऊया…

कोणत्या तारखेला का आहे बँकेची सुट्टी ?

जून – 7, 13, 14, 17, 23, 24 आणि 31 जूनला शनिवार व रविवार असल्याने सुट्टी असेल. याशिवाय 18 जून रोजी गुरु हरगोविंद जी जयंती निमित्त अनेक राज्यांत सुट्टी असेल.

जुलै – 5, 11, 12, 19, 25 आणि 26 जुलैला शनिवार व रविवार असल्याने सुट्टी असेल. यासह, 31 जुलै रोजी बकरी ईद असल्याने राजपत्रित सुट्टी असेल.

ऑगस्ट – 2, 8, 9, 16, 22, 23, 29 आणि 30 ऑगस्ट ला शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी असेल. रक्षाबंधनमुळे 03 ऑगस्टला सुट्टी आहे, तर 11 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे स्थानिक सुट्टी आहे, 12 ऑगस्ट म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे राजपत्रित सुट्टी असेल, तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, 21 ऑगस्ट तीज (हरितालिका) मुळे स्थानिक सुट्टी, 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक सुट्टी असेल. तर 30 ऑगस्टला मोहरममुळे राजपत्रित सुट्टी आहे, तसेच 31 ऑगस्टला ओणमची स्थानिक सुट्टी असेल.

The post Bank Holiday 2020 : आगामी 3 महिन्यांत बँका 30 दिवस ‘बंद’, इथं पहा सुट्टींची संपूर्ण यादी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279575
‘लॉकडाऊन’मध्ये नोकरी गेली असेल किंवा उत्पन्न कमी झालं तर मग ‘या’ 4 टीप्स पडतील उपयोगी, जाणून घ्या https://policenama.com/savings-job-los-new-job-in-loss-of-income-mart-ways-to-manage-your-finances-smart-ways-to-manage-your-finances/ Mon, 25 May 2020 13:05:00 +0000 https://policenama.com/?p=279538 pradhan mantri awas yojana
pradhan mantri awas yojana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या नोकर्‍या जात आहेत किंवा अनेक लोक असेही आहेत ज्यांचे उत्पन्न कमी झाले आहे, किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही लोक असे आहेत, ज्यांच्या पगारात कपात झाली आहे. जर तुम्ही सुद्धा अशा स्थितीचा सामना करत असाल तर जाणून घ्या आपल्या फायनान्सला मॅनेज करण्यासाठी काय करावे लागेल. पुन्हा […]

The post ‘लॉकडाऊन’मध्ये नोकरी गेली असेल किंवा उत्पन्न कमी झालं तर मग ‘या’ 4 टीप्स पडतील उपयोगी, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
pradhan mantri awas yojana
pradhan mantri awas yojana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या नोकर्‍या जात आहेत किंवा अनेक लोक असेही आहेत ज्यांचे उत्पन्न कमी झाले आहे, किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही लोक असे आहेत, ज्यांच्या पगारात कपात झाली आहे. जर तुम्ही सुद्धा अशा स्थितीचा सामना करत असाल तर जाणून घ्या आपल्या फायनान्सला मॅनेज करण्यासाठी काय करावे लागेल.

पुन्हा एकदा बजेट तयार करा
जर नोकरी जाणे किंवा सॅलरी कमी होण्याने त्रस्त असाल तर सर्वात आधी आपल्या बजेटवर पुन्हा विचार करा. ते पुन्हा तयार करा. तुम्हाला माहिती असले पाहिजे की, तुमचे जुने बजेट या स्थितीत काम करू शकत नाही. तुमची जीवनशैली पुन्हा बदलावी लागेल. खुप विचारपूर्वक पैसे खर्च करा. सर्व खर्चांची एक यादी तयार करा आणि आपल्या उत्पन्नानुसार त्यावर खर्च करा.

आरोग्य आणि जीवन विमा बंद करू नका
कोणत्याही स्थितीत तुमच्या आरोग्याशी तडजोड करू नका, यासाठी जीवन विमा आणि आरोग्य विम्यात कपात करू नका. कोणत्याही महामारीदरम्यान तुमचे आरोग्य आणि जीवनमुल्य सर्वात जास्त महत्वाचे आहे. वेळेवर प्रीमियम भरा. आपली रोकड समस्या कमी करण्यासाठी तुम्ही प्रीमियमचा मासिक हप्ता पर्याय निवडू शकता. स्वताकडे लक्ष द्या.

उधार घेताना सावधान
नोकरी सुटल्यावर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात फसू शकता. जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल आणि तुमची नोकरी सुटली असेल तर तुम्हाला रोजच्या खर्चासाठी उधार घ्यावे लागेल. मात्र, गरजेपेक्षा जास्त उधार घेणे टाळले पाहिजे. तुम्हाला जास्त व्याजाच्या कर्जापासून वाचले पाहिजे. एकापेक्षा जास्त कर्ज घेण्यापेक्षा एकच कर्ज घ्या.

जर तुमच्याकडे पारंपारिक विमा पॉलिसी किंवा पीपीएफ होल्डिंग्ससारखी गुंतवणूक असेल, तर तुम्ही ही गुंतवणूक गहान ठेवून कर्ज घेऊ शकता. पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनसारख्या असुरक्षित लोनच्या तुलनेत एलएएस व्याजदर कमी आहे.

नोकरी सुटल्यानंतर तुम्ही रोख रक्कमेच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी अस्थायी गुंतवणूक थांबवू शकता. हे तुम्हाला रोजचा खर्च करण्यासाठी हातात पैसे ठेवण्यासाठी मदत करेल. जेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल, तेव्हा तुम्ही आपल्या गुंतवणुकीला पुन्हा सुरूवात करू शकता. जर तुम्हाला नियमित उत्पन्नाच्या बाबतीत खात्री नसेल तर आपल्या क्रेडिट कार्डचा उपयोग करू नका.

The post ‘लॉकडाऊन’मध्ये नोकरी गेली असेल किंवा उत्पन्न कमी झालं तर मग ‘या’ 4 टीप्स पडतील उपयोगी, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279538
EPF च्या योगदानात सरकारनं केली कपात, नोकरदारांना ‘फायदा एक अन् नुकसान दोन’, जाणून घ्या https://policenama.com/know-merits-and-demerits-of-epf-contribution-reduced-by-government/ Mon, 25 May 2020 11:28:31 +0000 https://policenama.com/?p=279478

The post EPF च्या योगदानात सरकारनं केली कपात, नोकरदारांना ‘फायदा एक अन् नुकसान दोन’, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-१९ संकटात नोकरदारांना अधिक रोख मिळण्यासाठी सरकारने तीन महिन्यांकरिता ईपीएफच्या योगदानात दोन-दोन टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. दोन टक्के कपात नियोक्त्याकडून आणि तेवढीच कर्मचार्‍यांकडून केली जाईल. अशा प्रकारे ईपीएफचे योगदान २४ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत येईल.

मात्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना मोठ्या पगाराचा लाभ मिळणार आहे. परंतु परिणामी त्यांना दुहेरी झटका बसू शकतो. ईपीएफ योगदानाच्या कपातीचा परिणाम त्यांच्या निवृत्ती फंडावरच होणार नाही तर वाढीव पगारावरील कर दायित्त्व देखील वाढेल.

अधिक कर दायित्व टाळण्यासाठी त्यांना इतर गुंतवणूकीचे पर्याय शोधावे लागतील. सरकारचा हा निर्णय केंद्रीय कर्मचार्‍यांना लागू नाही.

तीन महिन्यांपर्यंत मिळणार वाढलेले वेतन
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना तीन महिने अधिक पगार मिळणार आहे. समजा बेसिक पगार आणि महागाई भत्ता मिळून तुमचे मासिक वेतन ५०,००० आहे. आता नव्या घोषणेनंतर हा पगार दरमहा १ हजार रुपयांनी वाढून ५१,००० रुपये होईल, जो तुमच्या बेसिक पगाराचा आणि महागाई भत्त्याच्या दोन टक्के असेल.

१. सेवानिवृत्ती निधीवर मोठा परिणाम
५०,००० मासिक पगारावर तुमचे ईपीएफ योगदान ६,००० रुपये (१२ टक्के) आहे आणि तेवढीच रक्कम नियोक्ता देखील जमा करतो. अशाप्रकारे दरमहा १२,००० रुपये जमा होते, आता दोन टक्के कपातीसह ही रक्कम १०,००० रुपये झाली. अशात तीन महिन्यांनंतर त्यात ६,००० रुपयांची घट झाली आहे, त्याचा परिणाम कर्मचार्‍याच्या सेवानिवृत्ती फंडावर होईल. यामुळे २० वर्षांत ३०,६७२,२८ रुपये, २५ वर्षात ४६,१२०,५७ रुपये आणि ३० वर्षांत ६९,३४९,५१ रुपये खर्च होतील.

२. सूट कमी झाल्यास कर देय वाढेल
प्राप्तिकर अधिनियम-१९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ईपीएफ योगदानात सूट देण्यात आली आहे. पण, आता गुंतवणूकीचे इतर पर्याय शोधावे लागतील. समजा ५०,००० रुपये मासिक वेतनावर जुन्या पर्यायासह तीन महिन्यांचे तुमचे ईपीएफ योगदान १८,००० रुपये आहे. उच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये आल्यावर ५,४०० चा डिडक्शन क्लेम करू शकता. मात्र, कपातीनंतर ईपीएफचे योगदान कमी होऊन १५,००० रुपयांवर आल्यावर डिडक्शन क्लेमची रक्कमही कमी होऊन ४,५०० रुपयांवर येईल. यात ३००० च्या अतिरिक्त उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी गुंतवणूक देखील वाढवावी लागेल.

भरपाईसाठी व्हीपीएफमध्ये योगदान वाढवा
नुकसान भरपाईसाठी व्हीपीएफचे योगदान वाढवा, जेणेकरुन गुंतवणूक आणि डिडक्शन कमी होणार नाही किंवा आरोग्य विमा खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असेल तर त्याचा सुपर टॉप-अप घ्या, ज्यामुळे व्याप्ती देखील वाढेल. कर वाचवण्यासाठी आवश्यकतेनुसार ईएलएसएस, पीपीएफ किंवा एनएमसीमध्येही गुंतवणूक करू शकता.

The post EPF च्या योगदानात सरकारनं केली कपात, नोकरदारांना ‘फायदा एक अन् नुकसान दोन’, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279478
11 दिवसानंतर दुसर्‍यांसाठी धोकादायक नाही बनू शकत कोणताही ‘कोरोना’चा रूग्ण, संशोधनात समोर आली माहिती https://policenama.com/other-most-coronavirus-patients-not-infectious-after-11-days-study-report/ Mon, 25 May 2020 11:21:54 +0000 https://policenama.com/?p=279472 corona-Boy
corona-Boy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंगापूरमधील राष्ट्रीय संसर्ग रोग केंद्रा (एनसीआयडी) ने केलेल्या अभ्यासात दावा केला गेला आहे की, ११ दिवसांनंतर बहुतेक रूग्णांपासून इतरांमध्ये हा संसर्ग पसरण्याची शक्यता कमीच होते. रुग्णालयातील ७३ कोरोना संक्रमित रुग्णांवर संशोधकांनी हे संशोधन केले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की लक्षण उद्भवल्यानंतर सात दिवसांपर्यंत रुग्णामध्ये विषाणू वाढण्याची […]

The post 11 दिवसानंतर दुसर्‍यांसाठी धोकादायक नाही बनू शकत कोणताही ‘कोरोना’चा रूग्ण, संशोधनात समोर आली माहिती appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
corona-Boy
corona-Boy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंगापूरमधील राष्ट्रीय संसर्ग रोग केंद्रा (एनसीआयडी) ने केलेल्या अभ्यासात दावा केला गेला आहे की, ११ दिवसांनंतर बहुतेक रूग्णांपासून इतरांमध्ये हा संसर्ग पसरण्याची शक्यता कमीच होते. रुग्णालयातील ७३ कोरोना संक्रमित रुग्णांवर संशोधकांनी हे संशोधन केले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की लक्षण उद्भवल्यानंतर सात दिवसांपर्यंत रुग्णामध्ये विषाणू वाढण्याची आणि हवेमध्ये पसरण्याची शक्यता अधिक असते. पण, आठव्या ते दहाव्या दिवशी हे कमकुवत होऊ लागते आणि ११ व्या दिवसापासून ते पूर्णपणे नष्ट होऊ लागते.

सिंगापूरमधील नियमांनुसार, संक्रमित रुग्णाला दोन तासांच्या चाचणीनंतर २४ तासांच्या कालावधीत स्वॅब चाचणी निगेटिव्ह आल्यास सोडण्यात येते. एनसीआयडीच्या मते, जर स्वॅब टेस्टचा अहवाल पॉजिटीव्ह असेल तर याचा अर्थ असा नाही की संक्रमित व्यक्ती इतरांमध्ये व्हायरस पसरवू शकते. खरतर स्वॅब चाचणी सार्स-कोव्ह-२ च्या जीनोमची उपस्थिती ओळखते, पण संक्रमित रूग्णात विषाणू किती आहे याची माहिती मिळू शकत नाही. तसेच यातून हे देखील समजत नाही की, जर संक्रमित व्यक्तीमध्ये या विषाणूचे घटक असतील तर त्यांच्यात पुढे पसरवण्याची क्षमता असते की नसते.

एनसीआयडीचे संचालक लिओ यी म्हणतात की, संसर्ग होण्याच्या ११ दिवसांनंतर रुग्ण इतरांसाठी धोकादायक नसतो. असे मानले जाते की, या संशोधनानंतर सिंगापूरमधील कोरोना संक्रमितां संबंधीचे नियम बदलले जाऊ शकतात. या संशोधनात सामील असलेले भारतीय वंशाचे डॉक्टर अशोक कुरूप यांच्या मते, या संशोधनाचे निकाल अत्यंत अचूक आहेत. त्यांना कोविड-१९ ने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर लागू करणे सुरक्षित आहे, जरी ते गंभीर परिस्तिथीत संक्रमित असतील. मात्र, गंभीर रूग्णांना दीर्घ काळापर्यंत वैद्यकीय काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच, त्यांना वेगळे ठेवण्याची आवश्यकता नसताना ११ दिवसानंतर सोडणे योग्य नाही, कारण जरी ते इतरांमध्ये संसर्ग पसरवत नसले तरीही त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका असू शकतो. यापूर्वी असेच एक संशोधन जर्मनीमध्येही केले गेले होते. येथील कोरोना संक्रमित नऊ रुग्णांवर केलेल्या संशोधनातही असेच काही आढळले होते. संशोधनात असे आढळले होते की, संसर्ग होण्याच्या पहिल्या ७ दिवसात रुग्णाच्या घशात आणि फुफ्फुसांमध्ये व्हायरसची संख्या झपाट्याने वाढताना दिसली, पण नंतर त्याचा प्रसार कमी झाला आणि ११ दिवसांनी संपला.

The post 11 दिवसानंतर दुसर्‍यांसाठी धोकादायक नाही बनू शकत कोणताही ‘कोरोना’चा रूग्ण, संशोधनात समोर आली माहिती appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279472